पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रामहट्ट

रामहट्ट

काय करू बाई माझा, राम रडतो
आकाशीच्या चंद्रासाठी, हट्ट धरतो :: धृ ::

होती पौर्णिमेची रात्र, राम होता ग सज्जात
अति आनंदे तो, होता दुडूदुडू धावत
एकाएकी आकाशीचा, चंद्र पाही तो :: १ ::

धरून कौसल्येचा हात, दावे बोटाने आकाशात
हवा चंद्र मजला माते, सांगे बाई लाडात
कौसल्येचे काही केल्या, ऐकेना बाई तो :: २ ::

रडू लागला राम जोरात, येती सत्वर दथरथ तात
पिताश्री, मजला चंद्र हवा तो, सांगे राम स्फुंदत
एकसारखा चांदोबाचा, हट्ट करी तो :: ३ ::

काढे कौसल्या समजूत, विविध खेळणी देती तात
आत्ताच चांदोबा हवा मज, सांगे राम परत परत
धाय मोकलून बाई, राम रडतो :: ४ ::

कोलाहल पसरे सर्वत्र, सर्वजण येती धावत धावत
पुन्हा पुन्हा राम दावे, चंद्र सतत सतत
फक्त आणि फक्त , मज चंद्र हवा तो :: ५ ::

येती चतुर सुमंत, देती आरसा हातात
रडणे थांबवी राम, जेव्हा चंद्र दिसे आरशात
प्रतिबिंब चंद्राचे पाहून, राम हासतो :: ६ ::

खुश होती कौसल्या-दशरथ, पसरे आनंद राजवाड्यात
धरूनी आरसा हाती, धावे राम आनंदात
अत्यानंदे किती बाई, राम नाचतो :: ७ ::

काय करू बाई माझा, राम रडतो
आकाशीच्या चंद्रासाठी, हट्ट धरतो

©️®️ ऋजुता देशमुख 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू