पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नवे हरिताचे लेणे

नवे हरिताचे लेणे


गुढ गुढीच्या रुढीचे
रुढ कर्ता तोच जाणे
आम्हा केवळ ठाऊक
नववर्ष गीत गाणे॥धृ॥


नव्या मराठी वर्षाच्या
आली स्वागता कारणे
आम्रतरुत कोकिळा
नवे छेडते तराणे॥१॥


आम्रतरुत जणु का
मधुरस पाझरणे
दाही दिशात ध्वनी तो
अहा! झंकारीत जाणे॥२॥


मला भावते ऋतूत
अशा ऋततच जाणे
मागे वळून कशाला
मग उगीच पहाणे॥३॥


माझ्या वसुंधराईच्या
काय शृंगारास उणे
पाने फुले आणि फळे
नवे हरिताचे लेणे॥४॥


*--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू