पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चैत्र गौर

चैत्र गौर


चैत्र मासी, हर्ष मानसी

झाले चैत्र गौरीचे आगमन

परंपरा मराठी माणसाची

करू या आपण जतन.


चैत्र गौरीची स्थापना

चैत्र तृतीयेला होते

महिनाभरासाठी ती

माहेराला येते.


 ऋतु फुललेला,नवसृजनाने

चैतन्याने भारलेला आसमंत

चैत्र गौरीच्या स्वागतासाठी

रंग उधळीत आला वसंत


माहेरवाशीणीचा थाटमाट 

छान झोपाळ्यावर झुलते

गर्भरेशमी खणवस्त्र ते

 मुलायम, अंगावर पांघरते.


सुगंधी मोग-याचा गजरा

दरवळ तिच्या देव्हाऱ्यात

हळदी कुंकू वहाताच

प्रसन्नता मनगाभा-यात


आंबेडाळ आंबटगोड 

कैरी पन्हे गार गार

नैवेद्य गौरीचा असे हो

 चविष्ट अन् सुंदर फार


हळदी कुंकू  गौरीचे

उत्साहात  साजरे होते

सुंदर साडी लोहपेटीच्या पाय-यांवर

खेळणी,वस्तुंची आरास होते


लाल टरबूज पिवळे खरबूज

चकली करंज्यांनी भरली ताटे

आंब्याची पाने,  मोगरा फुले

भिजले चणे , आनंद वाटे.


सुख समृद्धी प्रसन्नता

घेऊन येते चैत्रगौर

माहेरांगणी आनंद  लुटते

मन होते भावविभोर.‌




सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू