पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चैत्रगौर

चैत्र आला की आई सातत्याने आठवते. आठवते ते बालपण, आठवते त्या गोष्टी ज्या आईच्या अनुषंगाने आम्ही भावंड करायचो. आई उत्साही होतीच. कशी ही परिस्थिती असली तरी सणावाराच्या दिवशी तो कसा साजरा करायचा हे जणू तिच्या स्वभावातच होतं. दहा जणी जर घरी आल्या नाही त्यांना हळदकुंकू दिलं नाही तर ती आईच काय. मग तो सण कोणता ही असो. 

त्यातलाच एक सण म्हणजे गुढीपाडवा आणि चैत्र गौरीचे हळदकुंकू. 

चैत्र गौरीच्या हळदीकुंकवाला मात्र आईची मदत मी करीत असे. गौर आणून ठेवण्यासाठी दगडं गोळा करून त्यावर पोतं टाकायचो, त्याला दोन तीन रंग म्हणजे हिरवा आणि भुरकट रंग पोतायचं लाकडी भुसा आणून त्याला रंगवून उद्याने बनवायची, रस्ते रस्त्यावर वीजेचे खांब, त्यावर सिरीज लावायच्या म्हणजे रस्त्यावर उजेड व्हायचा. पहाडावरही झाडांच्या फांद्या तोडून लावायच्या. जनावरांच्या आकृत्या ठेवायच्या. नसेल तर मातीने लगेज वाघ सिंह हरीण इत्यादी बनवायचं. मग खरबूजाला कमळाच्या आकारात कापून दोन वेगवेगळ्या जागी ते ठेवायचं. संध्याकाळी हळदी कुंकवाला येणाऱ्या बायकां साठी बसून रसना तैयार करणं हे ही आमचंच काम. आई दुसऱ्या कामात म्हणजे गुलाबदाणी, अत्तरदाणी निरांजन समई चमकावयाची. नाष्ट्याच्या प्लेट्स लावणे. चण्याच्या डाळी ला दळून मस्त हिंग मोहरीची फोडणी लावायची. करंज्या मोदक बनवायची. गौरी आली की गणपति येणारच तर त्याची सोय आधी होत असे. मग हळदीकुंकवाला बायकांच येण सुरू झालं की माझी एंट्री मात्र बंद होत असे. पण मी मात्र आईच्या मुखात राहात असे. बहिणी जे काही करायच्या आईची मदत. म्हणजे करंजीच्या पात्या लाटणे, सारण भरणं, त्यांना व्यवस्थित बंद करणं हे त्या करायच्या. तळण मात्र आई करीत असे. 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू