पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तुला काय काम असतं?

तुला काय काम असतं गं? दिवसभर घरातच असतेस! असं आपण  कित्येक वेळा जवळपास सर्वच घरात ऐकतो "ती" च्या साठी कारण ती घरी दिसते. 

पण घरात दिसते ह्याचा अर्थ तिला काहीच काम नसत असा होतो का?


मुळात हा प्रश्न आणि हा विचार दोन्ही चुकीचे आहेत. ती घरी असते कारण आपल्याला बाहेर पडता यावं म्हणुन. तिची सकाळ होते आपल्या सगळ्यांची सकाळ होण्या 

आधी आणि दिवस संपतो सगळ्यांच्या नंतर आपण झोपेतून उठण्याआधी आपला नाश्ता, डब्बा तयार ठेवते आणि आयता हातात देते ती . घराच्या साफ सफाई पासून ते स्वयंपाकपर्यंत ती एकटी सर्व करत असते. घरा साठी दिवस भर ती एकटीच राबत असते. घर ते घरातील मानस ह्या सगळ्यांची जबाबदारी ती हसत मुखाने पार पाडत असते. स्वत:चा आनंद बाजूला सारून ती सतत कुटुंबाच्या आनंदासाठी झटत असते आणि हे करत असताना कधी कधी ती स्वतःच दुखणं खुपणं सुद्धा विसरते . घरात जेव्हा एखादा सण असतो तेव्हा किती हि पाहुणे- राउळे असो ती एकटी उभी असते कधी हि कसलीही तक्रार न करता ती हसत मुखाने नांदत असते . कधी कधी गृह कर्तव्य दक्षते साठी स्वतःच अस्तित्व हि ती बाजूला ठेवते , कुटुंब सदस्यांच्या प्रगती साठी ती स्वतः झिजत असते . घरातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची आणि सदस्यांची काळजी ती घेते , कुणाला काय हवं काय नको ते अगदी काटेकोर पणे पाहते . कित्येक वेळा कळत नकळत आपण तिला दुखावतो ती सुद्धा आपले पणाने चुका माफ करते कारण ती मनाने मोठी आहे. ती घराचा काना कोपरा आणि कुटुंबीयांचा मनाचा कोपरा कायम सजवण्याचा प्रयत्नांत असते . 


खरंच तुला काय काम असतं हा प्रश्न चुकीचा आहे कारण घर तिच्या पायावर उभं असतं . ती आहे म्हणुन आपल अस्तित्व असतं . ती दिवस भर घरात असते कारण ती मागे आहे म्हणुनच आपण समोर असतो . 



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू