पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझी माय 01

माझी माय

अनवानी काट्यामधून
माय माझी चालते......
डोक्यावरच्या ओझ्यागत
दु:ख सारं पेलते......

गळ्यात नाही कधी
तिच्या फुटका मणी......
पण आपल्या संसाराची
ती आहे राणी.......

कपाळावर तिच्या आहे
लाल चंद्र मोठा.......
पदराला बांधलेला रूपया
तिच्या संपत्तीचा साठा.......

कष्टाची तिला कधीच
वाटली नाही लाज.......
साक्ष देतात तिच्या
पायाच्या भेगा आज.......

सजवले महालागत तिने
तिच्या झोपडीला.......
दु:खाचेही भाण नसे
कधी त्या वेडीला.......

पिलांना घेऊन पंखाखाली
दिले खूप बळ.......
ऊन,वारा,पावसाची
नाही तिला कधी झळ.......

भाकऱ्या भाजता भाजता
करपुन गेले हात......
चोचित भरवले दाणे
गोड मऊ भात.......

थकले शरीर तरी
काळजी तिची सरत नाही......
रस्त्याकडे डोळे लाऊन
सारखी वाट पिलांची पाही......

सावली सारखी सोबत
सगळ्यांची तू राहीली.......
तूझ्याच उदरी पुन्हा
जन्म मिळावा माऊली.....

✍ श्री. श्रीराम मोरे -महाड(झोडगे)
                        ९८८११७८२०३
                      दि.२६/१२/२०१७

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू