रामनवमी
अलका पुणतांबेकर. वडोदरा गुजरात राम नवमी
सर्व असुनी सर्वच अपूर्ण वाटे l
सर्वत्र मनात अंधारत्व दाटे l
प्रजा जनांना ही त्याचे दुःख सलते l
भाग्याने कधी ही उणीव दूर सरते ll1ll
सर्व सुखे लाभती दशरथाला l
काय कमी असे सार्वभौम राजाला ll
एकच शल्य असे जे टोचे तयाला l
विन्मख असे पुत्रधन प्राप्तिला ll2ll
व्याकुळ, तळमळ अयोध्येची प्रजा l
उदासीन असती त्या तीन राण्या ll
मंत्री गणांची सुव्यवस्था आगळी l
पण मनात सर्वांच्या निर्माण पोकळीll3ll
वशिष्ठ ऋषींना देऊन सन्मान l
राजाने मनोगत त्याचे केले गान ll
कसे होईल पुत्रप्राप्ती चे निदान l
काय करावे त्यासाठी हो विधान ll4ll
पुत्रकामेष्टी यज्ञाचे विधान सांगुनी l
राजा सह पूर्ण करिती श्रुंगी ऋषी मुनी ll
यज्ञी प्रकटले अग्नी देव प्रसन्न होऊनी l
विलुप्त होती दशरथाला पायसदान करुनीll5ll
कौसल्या,सुमित्रा,कैकयी तीन राण्या l
पायस प्राशुनी कृतकृत्य झाल्या ll
तिघींना ही लागले डोहाळे l
केले भाकीत ते घडून आले ll6ll
नव वर्षाचा चैत्र प्रारंभ झाला l
शुक्ल पक्ष नवमी तिथि दिवस आलाll
आदित्य मध्यान्ही माथ्यावर येतो l
प्रभू विष्णूचा अवतार भूवर जन्म घेतो ll7ll
जगमग जगमग आयोध्या नगरी l
नटली आज जणू असे नवी नवरी ll
सर्वत्र आनंदी आनंद व्याप्त झाला l
कौसल्ये पोटी राम जन्मला,राम जन्मलाll8ll
बडोदरा गुजरात
अलका पुणतांबेकर