पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जीवनाच्या सांध्यसमयी

"जीवनाच्या सांध्यसमयी"

(ज्योतिर्मयी)

अवो ,गुडमॉर्नींग झाली.... सहा वाजले..ऊठा आता...
आणि मी नाईलाजाने डोळे ऊघडते. दोघेही हसून एकमेकांना गुड मॉर्निंग म्हणत असतो. आता गुड मॉर्निंग बरोबरच "श्री गुरुदेव दत्त "श्री स्वामी समर्थ" श्री गजानन महाराज कि जय! हे नावं मुखात येतात...बरं वाटते कधी नव्हे तो आपला नवरा आजकाल देवाचे नाव घेतो...
चहा पाणी झालं ,रोजची काम झाली की मी आंघोळ करून आल्यानंतर आरशासमोर उभी राहून स्वतःला न्याहाळत असतांना...ह्यांचे सुर ऐकु येतात....
"ऐ जाने चमन, तेरा गोरा बदन...जैसे खिलता हुआ गुलाब...."आणि माझ्या गालावर नकळत गुलाब फुलतात..
लग्न झाल्यानंतर हे नेहमीच "हे"त्यांच आवडतं गाणं म्हणायचे. मला थोडा संकोच वाटायचा आपण सावळं असण्याचा. मनात यायच आपल्यालाही गोरा रंग मिळाला असता तर ...मी म्हणायची,
कशाला माझी टिंगल करता!
तेव्हा हे म्हणायचे.. "दुनिया घुमके आया हु मै ,बहोत हसीन चेहरे देखे ,पर तुमसा नही देखा!
तरूणपण सरलं ,पण लग्नाच्या सत्तेचाळीस वर्षानंतरही त्यांच्या मुखातून तेच गाणं बाहेर पडते....
कधी कधी मी स्वयंपाक करत असली की ,म्हणायला लागतात.. तेरे चेहरेमे वो जादु है बिन डोर खिंचा जाता हूँ, जाना होता है ओर कही, तेरी ओर चला आता हुँ....
मी ही त्यांना आता गाण्यातच उत्तर द्यायला शिकलीयं ! त्यांना आंघोळीला पाठवायचे असल्यास मी म्हणते .... जाओ रे जोगी तुम जाओ रे...... आणि ते समजुन जातात ,त्यांच्यासाठी आंघोळीचं पाणी काढून ठेवलेलं आहे.
जेवण तयार झालं किमी गुणगुणते.... आईये मेहरबाँ.... आणि लगेच ते येऊन बसतात जेवणासाठी...
परवा जेवण करून मी छानशी लिंबू कलरची साडी घातली, त्यावर राणी कलरचा ब्लाउज घातला , खांद्यावर पर्स अडकवली पायात चप्पल सरकवली तर हे म्हणाले ,आज तो ऐअर होस्टेस जैसी लग रही हो।
माझी तारीफ ऐकून मी खूष झाले ,पुन्हा एकदा आरशात बघायला गेले ,खरंच आपण याही वयात? आणि माझ्या गालात खुदकन हसू ऊमटले.
मी बुटिक मध्ये जायला निघाले, की रोजचे आमचे संवाद ठरलेले असतात...
"अगं वयाला सांभाळ!!
पायऱ्या ऊतरतांना सावकाश ऊतर.आपल्याला आता घाई नाही.गाडीची चावी घेतलीस,मास्क,लंच बॉक्स, पैसे , मोबाईल आहे ना पर्स मध्ये आणि गाडी हळू चालव! मी आहे दारात दहा मिनीटे काही लागलं तर....आणि "पँनिक " व्हायच नाही...
हो रे बाबा !मी काय लहान आहे.... किती सुचना करता!!
"ओके बाय!"
"बाय टेक केअर!!"
जेव्हापासून जिवनाच्या संध्याकाळची चाहूल लागली तेव्हापासून ऐकमेकांबद्दल काळजी वाढली ...
पायऱ्यावरून ऐक ऐक पाऊल टाकतांना "त्या" शब्दांचा आधार वाटतो, गर्दीतुन गाडी चालवतांना,शब्द आठवतात... "आपल्याला घाई नाही ,सावकाश गाडी चालवं आणि गाडीची स्पीड आपोआपच कमी होते...
सायंकाळ झाली की घरी दोन डोळे आपली आतूरतेने वाट बघत आहे असं जाणवतं. मग घरी निघण्याची घाई होते.दूधाच पँकेट विकत घेताना ,रोज वीस रूपयाचे पेढे घेतले जातात ह्यांना आवडतात म्हणून....
घरी पोहचताच फाटकाचा आवाज ऐकून घराच दार ऊघडल्या जातं...अरे या या! मी वाटच पहात होतो ,म्हणून हसुन स्वागत होतं... आणि दिवसभराचा कामाचा शीण कुठल्या कुठे पळुन जातो..... हातावर पेढे ठेवले की स्वारींचा चेहरा लहानमुला सारखा खुलतो. रात्री जेवण करून मोजक्या दोन तीन सिरीयल पहातांना नऊ वाजतात आणि स्वारी..म्हणते "गुडनाईट" मलाही what's app बघायचे असल्याने मी म्हणते....सजन तुम सो जाओ...सो जाओ, सो जाओ...
कधी कधी दोघेजण निवांत बसलो असता निशब्दपणे डोळेच बोलतात......

जीवनाच्या या सांध्यसमयी दे सखी माझ्या हातात हात , हसुन जगुया मिळुन चालूया या संध्या छायेची वाट!
.............********************.........

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू