पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लाल रंग

     लाल रंग

 

     स्वीटी नावाप्रमाणेच स्वीट असलेली बालिका .

घरातील  पहिलेच अपत्य असल्याने सर्वांची

लाडकी .चैतन्याचा जणू ती झराच - -   ! 

विविध रंगांची उधळण , तिच्या रूपाने 

पहायला मिळायची . ,फुलपाखराचे विविध रंग

अंगावर घेऊन ती घरभर वावरायची .तिचे ते

मस्तीत बागडणे बघून सर्व घर आनंदित होत

 असे .तिच्या पाठीवर चार वर्षांनी आकाशचा

जन्म झाला .पण स्वीटी सर्वांसाठी स्वीटच

 राहिली . स्वीटी शाळेत जायला लागली .त्यात

तिला ,इतर विषयांपेक्षा चित्रकला हा विषय जास्त

आवडू लागला .विविध प्रकारचे रंग तिने जमा

केले होते .क्रेयॉनस ,स्केचपेन्स ,वॉटर कलर 

अशा विविध रंगांचा तिच्याकडे खूप साठा होता .

 

आई तिला कंटाळून म्हणायची ,

 

"काय गं स्वीटी किती हा ,कलरचा धिंगाणा करते ."

 

"आई हा काय धिंगाणा आहे का ? हे तर माझे

जीवन आहे ."

 

"आणि हे ,काय ,ही लाल रंग किती आणली आहेत ?"

 

"आई  तुला माहिती आहे ना - - ! मला लाल रंग

किती आवडतो .लाल रंग म्हणजे उत्साह असतो .

लाल रंग म्हणजे क्रांती असते . म्हणून मला हा रंग मला खूप खूप आवडतो ."

 

"पुरे पुरे तुझं लाल ,रंगाचे गुणगान .जगात जसे काही

लाल रंग सोडून दुसरे काही  रंगच नाहीत .लाल

रंगाचे किती ड्रेस घेतले तू .काहीही घ्यायला गेले

तर तुला लाल रंगाची वस्तू सोडून दुसऱ्या रंगांची

वस्तू आवडतच नाही ."

 

"आई या लाल रंगावरच तर आपलं जीवन आहे ना ?"

 

"कसे गं ?"

 

"आपल्या ,अंगात जे रक्त असते त्याचा रंग कोणता ?"

 

"लाल "

 

"लाल रंगाचे रक्त शरीरात आहे म्हणून आपली बॉडी

काम करू शकते .कळलं का ?" 

 

"हो बाई ,कळलं सगळं ,पण तू आता निघ ,शाळेची

वेळ झाली तुझी ."

 

"हो आई निघते मी ."

 

 

 

 

 

    अशी ही लाल रंगांची वेडी असलेली स्वीटी .

बघता बघता तेरा ,चौदा वर्षाची झाली  - - -  

 

   एक दिवस शाळेतून आली आणि आल्या आल्या

आईच्या कुशीत शिरून रडायला लागली .आईने

तिला काळजीने विचारले ,

 

"काय झालं स्वीटी ?शाळेत कुणी बोलले का तुला ?"

 

"नाही "

 

"मग रडायला काय झालं ?"

 

"माझ्या ,पोटात खूप दुखत आहे .आणि - - -  

आणि - - - - " 

 

स्वीटी पुढे काहीच बोलत नव्हती .फक्त रडत होती .

 

आई काय समजायचे ते समजली .

 

"अगं ,असं प्रत्येक मुलीच्या बाबतीत होत असते .

त्यात रडायचे कशाला ?"

 

"पण मला नाही आवडत हे ?सर्व चिपचिप वाटते ."

 

आईने तिला फ्रेश होण्यास सांगितले .ती बाथरूम

मध्ये गेली .लाल रक्त पाहून स्वीटी ला किळस 

आली .बाहेर येऊन तिने आईला त्याबद्दल 

सांगितले .आईने तिला सर्व बाबी समजावून

सांगितल्या .पण तिच्या मनातील किळस काही

केल्या जात नव्हती .चार दिवस स्वीटी अक्षरशः

झोपून होती .पाचव्या दिवशी स्वीटी शाळेत गेली,

पण तिचा मूड जरा ऑफच होता .तिच्यातील

अल्लड बालिका लोप पावली होती .आठ दहा

दिवसात तिची गाडी रुळावर आली .पुन्हा

पंधरा दिवसांनी तोच प्रॉब्लेम .ती वैतागली .

 

"आई आता ,हे असं नेहमी होणार का ?"

 

"हो गं ,स्वीटू ,यालाच तर मासिक पाळी म्हणतात

ना  - - -  ! ती दर महिन्यालाच येणारच ."

 

"मला नको आहे ,ही "

 

"पण ही अटळ आहे .ती टाळता येत नाही .ती

आहे म्हणून तू स्त्री आहेस ."

 

"पण मला तो लाल रंग आवडत नाही ."

 

असे म्हणून स्वीटी ,तिच्या रूम मध्ये गेली .तिने

रूम मधील सर्व लाल वस्तू बाहेर काढल्या .

त्यानंतर तिने एकही लाल रंगाची वस्तू जवळ

ठेवली नाही .दर महिन्याला त्या चार दिवसात

स्वीटी बेचैन व्हायची .गायनिक कडे तिचे

काउन्सलिंग करून आणले ,पण विशेष फायदा

झाला नाही .ते चार दिवस सोडले तर स्वीटी

फ्रेश असायची .पण लाल रंग तिने आयुष्यातून

काढून टाकला होता .एक दिवस ती आईला

म्हणाली ,

 

"आई ,मला या लाल रंगाची आता खूपच चीड

येत आहे ."

 

"पण तो तर आपल्या रक्ताचा रंग आहे .त्यावरच

तर आपले जीवन आहे ."

 

यावर स्वीटी काहीच बोलली नाही .

 

 

    बघता बघता स्वीटी चोवीस वर्षाची झाली .

तिचे लग्न झाले .स्वीटी च्या आईने तिच्या

सासूला ,स्वीटी ला मासिक पाळीच्या वेळी होत

असलेल्या मानसिक त्रासाबद्दल सांगितले .

 

"माझी ,स्वीटी सर्व बाबतीत चांगली आहे हो ,

फक्त ते चार दिवस तुम्ही तिला सांभाळून घेत

जा ."

 

"ताई ,तुम्ही काळजी करू नका .मी पण एक

स्त्री आहे ."

 

 

 

एका वर्षा नंतर ,स्वीटी कडून गुड न्युज कळली .

दोन्ही घरी आनंद झाला .तिचे डोहाळे पुरविण्यात

नऊ महिने भर्रकन निघून गेले .बाळाच्या जन्माची

वेळ आली .तिला ऍडमिट करण्यात आले .

असंख्य कळा सहन करून ,स्वीटीने एक गोड

मुलीला जन्म दिला .जेव्हा ती गोड कळी स्वीट

जवळ आली ,तेव्हा स्वीटी च्या चेहऱ्यावर आनंद

ओसंडून वाहत होता .पण काही क्षणातच तिच्या

चेहऱ्यावर काळजीचे काळे ढग जमा झाले .

 

"आई ,हिला पण माझ्यासारखा पाळीचा त्रास

होईल का गं ?"

 

स्वीटीचे  हे वाक्य डॉक्टरांनी ऐकले .

 

"तो त्रास नसतो ,ती असते ,आनंदाची पर्वणी .

एक स्त्रीच ,सर्व घराला देऊ शकते .तुला पाळी

होती म्हणून तू आई झालीस .या गोड मुलीला

तुझ्यामुळे जग दिसले .तुझ्या आईच्या पोटी तू

आणि तुझ्या पोटी हिचा जन्म झाला .याला त्रास

नाही मानायचे ."

 

   स्वीटी ला ते पटले .तिने लगेच ऑर्डर सोडली

,

"माझ्या परी साठी पहिला ड्रेस लाल रंगाचा आणा - - - - -"

 

 

सौ संगीता ताथोड

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू