पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आपला नावडता मेलेनिन

आपला नावडता मेलेनिन*

नमस्कार माणसा,
पत्रास कारण की........
अरे देवा माझी ओळख सांगायलाच विसरलो. मी "मेलेनिन" तुम्हा प्रत्येकात असणारे रंगद्रव्य 'रंगपेशी'. आपण एकाच शरीरात राहतो पण कधी बोलायला वेळ मिळाला नाही म्हणून आज खास वेळ काढून पत्र लिहितोय हेच ते पत्राचे कारण
हम्म !! ....आता लिहायला हरकत नाही
तर....पत्रास कारण की मला तुम्हा लोकांचा खूप राग आलाय .तुम्हा सर्वांनाच मी नको झालोय . पण का?
मी अस काय वाईट केलय की तुम्ही माझ्या नरडीचा घोटच घेत सुटलात? आता एका सुद्धा माणसाच शरीर उरल नाही जिथे मला नाव ठेवत नाही .सगळीकडेच माझा अपमान आणि मृत्यू सुरुच आहे.
तुम्ही म्हणाल , काय बरं बरळतोय हा. सगळं सुरूवातीपासून सांगतो . तर झाल असं की मला ज्या माणसाच शरीर जास्त आवडत किंवा ज्या प्रदेशात सूर्य देवांची प्रखर किरणे असतात त्या भागातील माणसांच्या शरीराच रक्षण करण्यासाठी मी त्यांच्या शरीरात जरा जास्तच प्रमाणात आढळतो. त्याने होत अस की त्या माणसांचा रंग काळा होतो.
बरं ह्याबाबत मला काहीच कल्पना नाही पण खर सांगतो ह्याच काळ्या रंगाने माझा घात केलाय बरं का!
मग माझ्यामुळे काळ्या झालेल्या माणसांना दुसरी माणसं म्हणजे ज्यांच्यात मी जरा कमीच प्रमाणात आढळतो ती गोरीगोमटी ह्यांना चिडवायला ,द्वेष करायला लागली. पूर्वी हा द्वेष, अपमान लोक सहन करायची.पण आता काय बाबा नवीन फॅड निघालय, जरा कुणी म्हटलं की तू काळी दिसतेस की चालले लगेच त्वचारोग तज्ज्ञांकडे. बरं ते डॉक्टर समजावून सांगतात काही गरज नाहीये ट्रिटमेंट ची असेच छान दिसता तुम्ही .
पण नाही इथे तर मुलामुलींचे आईवडील च सांगतात,
"एका महिन्यात आमची मुलगी /मुलगा गोरी/ गोरा झाला पाहिजे. तुम्ही म्हणाल तेवढा खर्च करू पण आम्हांला गोरीच मुलगी हवी आहे."
मग काय डॉक्टर करतात काय ते केमिकल पील आणि स्किन व्हायटनिंग सारख्या ट्रिटमेंट आणि मला त्यांच्या शरीरातून हद्दपार केलं जात.
त्यात त्या मुलामुलींचाही दोष नाही म्हणा. मी बघत आलोय ना तुम्हा माणसांकडे अगदी लहानपणापासूनच वर्णद्वेष आहे.
आता हेच बघा ना तुमची बालगीतं कशी असतात,"गोरी गोरी पान फुलासारखी छान ","मनीमाऊ च बाळ कसं गोरगोर पान " आणि आता ते एक नविन गाण आल आहे काय ते "गोर्‍या गोर्‍या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली." काय हे त्या लहान मुलांच्या आणि लग्नाला आलेल्या मुलामुलींच्या मनावर गोरेपण बिंबवल जातं अक्षरशः.
तुमच्या ह्या अशा वागण्याने त्या मुलामुलींचे मानसिक खच्चीकरण होतं आणी ते स्वतःच स्वतःचा तिरस्कार करू लागतात. ह्या सर्वच गोष्टींचा दुष्परिणाम होऊन त्या मुलामुलींची मानसिक,सामाजिक,भौतिक,व्यवहारीक,शारीरीक आणि शैक्षणिक
वाढ खुंटते. मला घालवण्याच्या नादात तुम्ही स्वतःच स्वताच्या मुलांना गमावून बसता .
पण राजांनो तुम्हाला लक्षात येतय का ! ह्या गोर्‍या होण्याच्या नादात तुम्ही स्वतःच नुकसान करून घेताय.आता म्हणाल ते कसं?
तर थोड संदर्भासहीत सांगतो जसं मी सुरूवातीलाच पत्रात लिहीलं होत की माझ मुख्य काम म्हणजे मनुष्याच्या त्वचेला , डोळ्यांना ,केसांना रंग देणे. एकुणच काय मी मनुष्याच्या शरीरात रंग भरतो.कधी कधी आनुवंशिकते मुळे किंवा नैसर्गिक बदलांमुळे
मी प्रत्येक मनुष्यात एका विशिष्ट प्रमाणात आढळतो. तुमचं शरीर गोरं होणार की काळ हे माझ्या प्रमाणावरूनच ठरतं.माझ प्रमाण वाढलं की रंग काळा आणि कमी झाला की त्याउलट गोरा रंग हे ठरलय.
निसर्गाची घडी विस्कटली की निसर्ग तुमची घडी विस्कटतो. तुम्ही गोरेगोमटे होण्यासाठी मला शरीरातून काढून टाकता मग होत काय की सूर्यापासून उत्सारित होणारी अतिनील किरणे (यूवी) किरणांपासून मी तुमच रक्षण करू शकत नाही. हेच माझ दुसर महत्त्वाच काम परिणामी हिच अतिनील किरणे तुमच्या शरीरात प्रवेश करतात आणि शरीरातील पेशींचे नुकसान होते .मग पुरळ येणे वेगवेगळे त्वचारोग होणे आणि अति गंभीर म्हणजे त्वचेचा कर्क रोग सुद्धा होऊ शकतो तर हे अस आहे सगळं.
जेवताना जशी आपल्याला हाताच्या पाचही बोटांची गरज असते तसाच मीही तुमच्या शरीराचा एक अविभाज्य घटक आहे.मला अस दूर लोटू नका.
प्रत्येक मनुष्याचा एक विशिष्ट रंग असतो त्या रंगात त्याला खूलू द्या,त्याला बहरू द्या. परिणामी मलाही जगू द्या.
पत्र लिहून फार मोकळं वाटतय. मी आशा करतो तुम्हाला माझं म्हणनं पटेल आणि तुम्हा प्रत्येकाच्या शरीरात मी मोकळा श्वास घेऊ शकेन.

*आपला नावडता,मेलेनिन*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू