पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आयुष्याचे इंद्रधनु

 

 

आपलं जीवन हे अनुभवाच्या वेगवेगळ्या वळणावरून जाऊन व वेगवेगळे अनुभव देऊन आपल्याला संपन्न करत असते.  आणि अशा  अनुभवांच्या वेगवेगळ्या रंगांनी जीवन रंगीत व सुंदर बनते. त्यामुळे मला तरी वेगवेगळे अनुभव देणारा  इंद्रधनुचाच रंग  खूप आवडतो.

तानापिहिनिपाजा म्हणजेच तांबडा (लाल),

नारिंगी (केशरी)

पिवळा 

हिरवा 

निळा 

पांढरा 

आणि 

जांभळा

या रंगांच्या मिश्रणाने बनलेला सुंदर इंद्रधनुषी रंग जीवनाचे खरे चित्र दाखवतो.

 *तांबडा किंवा लाल रंग* हा   ऊर्जेचे प्रतीक आहे. जगण्याची दुर्दम्य इच्छा या रंगातून दिसते माणसांच्या भावनांना उत्तेजित करणे, महत्त्वाकांक्षा ,दृढनिश्चय, ध्येय मजबूत करणे आणि जीवन शक्ती जागवणे या सर्व गोष्टी या रंगातून जाणवतात. हा रंग आणि सफेद रंग यांच्या मिश्रणातूनच उत्पन्न होणारा गुलाबी रंग प्रेम आपलेपणा या भावना निर्माण करतो. ऊर्जा, शक्ती ,धडाडी, बंडखोर वृत्ती, आत्मविश्वास, उत्तेजकता हे सर्व गुण आपल्याला लाल रंगातून जाणवतात. यालाच रक्तवर्ण असे देखील म्हटले जाते.

 

 *हिरवा  रंग* आनंद, प्रसन्नता ,समृद्धी दर्शवणारा, मनाला शांतता देणारा, स्फूर्ती, शीतलता देणारा आहे. प्रवासात असताना हिरवागार निसर्ग  पाहून माझ्याही मनाला अशाच मानसिक शांतीची अनुभूती येते. वसंत ऋतु,  आशा ,नवजीवन, तारुण्य ,विकास ,स्वास्थ्य सौभाग्य, बुद्धी या सर्वांना प्रतीत करणारा हा हिरवा रंग म्हणूनच मला खूप आवडतो.

 

 त्याच बरोबर विशाल सागर, नदी, आकाश ,पाणी अशा भव्य गोष्टींचा संप्रेरक *निळा रंग* तर माझ्या मनावर कायम आच्छादलेला आहे.  समुद्र किनारी  खळाळत येणार्‍या लाटा आणि वर दिसणारे भव्य व शांत निळे आकाश अशा सुंदर सहवासात मी तासनतास घालवले आहेत. त्यामुळे हा ही रंग मला खूप खूप आवडतो.

 या सर्व रंगांबरोबर महत्त्वाचे  स्थान पवित्रता दर्शवणारा आध्यात्मिकतेचा वैराग्याचा निर्लेपतेचा आणि शांतीचा दूत म्हणून वावरणारा *शुभ्र पांढरा किंवा सफेद* रंगाचे आहे.  निर्मळता ,ज्ञान आणि सातही रंगांना आपल्या मध्ये सामील करून घेणारा असा हा रंग ही मला खूप खूप आवडतो.

आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीप्रमाणे मलाही हे जाणवते की रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा. 

 

सुषमा ठाकूर.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू