पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रंगात रंगलो मी

■■ रंगात रंगलो मी■■

1971च्या युद्धात प्रत्यक्षपणे भाग घेतलेले माझे यजमान श्री विनोद अलोणे यांचे मनोगत.
{शब्दांकनसौ.ज्योतीविनोदअलोणे }
" अनादिकालापासून या स्रुष्टीत असणारं माझं अस्तित्व,प्रत्येक युगाची सुरवात आणि त्याच्या अंताचा  प्रत्यक्षदर्शी असलेला मी, प्रुथ्वीतलावरील तीन भागात   आपले अफाट साम्राज्य पसरवून आपली सत्ता स्थापित करणारा म्हणून माझी ओळख.                               होय ,मीच तो  "सागर"! स्रुष्टीतील प्रत्येक सजीव, निर्जीव वस्तुला  त्याला लाभलेल्या रंगापासून ओळख आहे. पण मला? माझं सामर्थ्य असणारं हे 'जल ' रंगहीन आहे. सगळे मला प्रश्न करतात,ज्या "जला"मुळे तुला अस्तित्व प्राप्त झालयं त्याचा खरा रंग तो कोणता?
 स्रुष्टीनिर्मात्याने मला माझा वेगळा असा रंग प्रदानच केलेला नाहीये! जो रंग माझ्यात मिसळल्या जाईल त्याच रंगात माझी ओळख निर्माण होते.पहाटेच्या वेळी प्राचीच्या पडणाऱ्या प्रकाशाने मी सोनेरी रंगाचा दिसतो ,तर सायंकाळी त्याच रविच्या मावळत्या किरणांच्या  पिवळ्या केशरी ,छटांनी मी रंगीबेरंगी होऊन जातो.
अगदी कवि कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळीसारखा….
" आवडतो मज अफाट सागर                     अथांग पाणी निळे।   निळ्या जांभळ्या जळात  केशर  सायंकाळी मिळे।।। फेस फुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे         हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी    ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी"।।
माझ्या ऊदरातील"अम्रुत"  बाहेर काढणाऱ्या देव-असुरांनाही माझी ओळख आहे.तरीही मी असा रंगहिन !

         "अरे थांब थांब सागरा!रंगहीन म्हणुन स्वतःला दोष कां देतोस ! माझ्या सारख्या "सेलरने" जगप्रवास करतांना बघितलेले आहेत तुझे विविध रंग ! तुझं कौतुक करण्याची ,तुझे आभार मानण्याची  मला पण ऐक संधी दे !
स्वतः रंगहिन असलेला तु दुसऱ्याच्या रंगात मिसळून तुझी नवी ओळख निर्माण करतांना,तुझ्यात दडलेल्या ऐका पित्याच्या विशाल ह्रुदयाच दर्शन घडवितोस!
सूर्याच्या पांढऱ्या किरणातून निघालेले सप्तरंग  "ता ना पि हि नी पां जां" हे  तुझ्या पाण्याच्या प्रुष्ठभागातुन आत जाऊन शोषले जातात. ज्याची तरंग मोठी आहे ते तळापर्यंत पोहोचतात, फक्त निळ्या रंगाची तरंग कमी असल्यामुळे तो परिवर्तित होऊन तुझ्या पृष्ठभागावर आल्याने तुझा रंग निळा दिसतो आणि हे जग तुला "निलसागर" म्हणून ओळखते !  प्रुथ्वीवरएका भागात वास्तव्यास असणाऱ्या मानवाने  आपल्या सोईनुसार  हिंद,अटलांटिक व पँसिफिक  "महासागरात" तुझी विभागणी केली.
 ऐकेकाळी ब्रिटिशांनी  तुझ्या पाण्यामधून प्रवास करत जगातील प्रत्येक भागाशी संपर्क करून या संपूर्ण जगावर राज्य प्रस्थापित केले होते.  तुझ्याच सहाय्याने ऐकमेकांच्या संपर्कात आल्याने विविध देशातील, विविध रंगी लोक एकमेकांना ओळखु लागले.या मानव जातीचे तुझ्याशी असलेले ऋणानुबंध कसे विसरता येतील सागरा! वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी मला जगप्रवासाची संधी चालुन आल्यावर तुच तर माझा साथी होतास! त्यावेळेस तुझ्याशी घडलेली माझी पहिली भेट आजही जशीच्या तश्शी माझ्या डोळ्यासमोर येते…..
1962 च ईंडो-चायना वॉर सुरू होतं.दहावी पास होऊन मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि सैनिक भरती साठी असणारी, "JOIN THE NAVY & SEE THE WORLD"   ही जाहिरात वाचली. देशसेवा करण्याबरोबरच ईंडीयन नेव्हीकडून देशविदेश बघण्याची संधी, रंगबिरंगी स्रुष्टीला आपल्या अजाण बाहुंनी कवेत घेऊन असलेल्या तुझ्या साथीने अनायसेच चालुन आली होती.    Every chenging colour of leaf is beautiful & every changing situation of life is meaningful ,both needs a clear vision" 
मी नौसेनेत भरती झालो आणि माझ्या जिवनाची दिशाच बदलली. विशाखापट्टणम येथे 15 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये माझ्यावर देशसेवेचा भगवा रंग चढविण्यात आला आणि  १९६४ मधे मी मुंबईच्या आय.एन.एस या युद्धनौकेवर जॉईन झालो तोच, देशविदेशांना भेटी देण्यासाठी म्हणून आमचे जहाज प्रवासाला निघाले. तुझ्या सोबत प्रवास करायचा असल्याने,तुझ्या त्या निळ्या साम्राज्याच्या दर्शनासाठी म्हणून मी  जहाजाच्या  ब्रिजवर पोहोचून चौफेर नजर फिरवली. अथांग पसरलेल्या तुझ्या पाण्यात बघतांना तुझ्या खोलवर मनाचा थांगपत्ता लागत नव्हता, पण तुझ्या निळ्याशार पाण्यात दडलेला  देशभक्तीचा  ऐक रंग मला दिसुन आला आणि माझ्या कानात  गुंजु लागली ती पारतंत्र्याच्या बेड्यात अडकून पडलेल्या भारतमातेला सोडविण्यासाठी म्हणून, अंदमानच्या काळकोठडीत काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असलेल्या सावरकरांनी, ईंग्रजांच्या तावडीतुन गुपचुपपणे स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर  आपल्या मातृभूमी पर्यंत सुखरुप घेऊन जाण्यासाठी आर्तपणे  तुला घातलेली साद!
 "ने मजसी ने परत मातृभूमीला।                 सागरा प्राण तळमळला ।।।                              त्या हाकेला धावून जात, त्या भारत मातेच्या सुपुत्राला आपल्या बाहूत सुरक्षितपणे घेऊन त्यावेळी पारतंत्र्यात असणाऱ्या  त्यांच्या मायभुमीच्या कवेत आणुन सोडणाऱ्या तुला, आता स्वतंत्र भारतमातेच्या रक्षणाचे व्रत घेतलेल्या "ऐका नौसैनिकांने" आदराने वंदन केले.त्याचवेळी वाऱ्याची ऐक मंद झुळूक मला स्पर्शुन माझ्या कानात कुजबुजली,                            "ते बघ तिकडे समोर"!                              समोर बघितलं तर, पांढरी झालर असलेले निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या आपल्या असंख्य मस्तीखोर मैत्रिणी {White Horses} सोबत घेऊन तुझी 'स्वारी' समोरून येत दिसली. तुझे निळे डोळे माझ्यावर रोखत तु मला प्रश्न केलास् !
"माझ्याशी मैत्री करायला निघालायेस?          पण माझ्यासारख्या वरून शांत पण आतमध्ये तुफान दडुवुन असलेल्या मित्राशी मैत्री करायला सिंहाची छाती पाहिजे हां !" तुझ्या शब्दांत आव्हान होतं. नेव्हीकँम्प मधल्या पंधरा महिन्याच्या ट्रेनिंगने मला जिगरबाज केलेलचं होतं .तु विचारणा करताच मीही खिलाडू व्रुत्तीने हात पुढे केला, ऐका फेसाळलेल्या पांढऱ्याशुभ्र लाटेने ऊंच ऊडी घेतली आणि ती मला भिजवून गेली. तुझ्या साम्राज्यातली स्वागत करण्याची "ती" पद्धत मला खुप आवडली. एका विशाल ह्रुदयी सम्राटाने त्याच्या राज्यात प्रवेश देऊन मला त्याच्या हृदयात जागा दिल्याची पावती होती ती! त्या दिवसापासून माझ्या मनात तुझ्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला आणि मी तुझ्या निळ्या रंगाच्या प्रेमात पडलो. त्यानंतरच्या काळात वस्तू असो की कपडे ते निळ्या रंगाचेच वापरायला लागलो. ईव्हन "After shaving lotion" सुद्धा "ice blue" कलरचं वापरत होतो.
त्या प्रवासाला निघताना मुंबई भोवती पसरलेल्या अरबीसागर नावाने ओळखल्या जाणाऱ्या तुझ्यासोबत  निघून पुढे "तांबडा  समुद्र म्हणून  ओळख असलेल्या तुझ्या पाण्यात तयार केलेला जगप्रसिद्ध" सुवेझ कालवा" पार करून आम्ही "भुमध्यसागर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुझ्यापाण्यातून आफ्रिका खंडातल्या घाना, नैजेरिया, लिबिया, ट्युनेशिया वैगेरे  देशाच्या तुझ्या किनाऱ्यांना भेटी देत सुरू असलेल्या आमच्या प्रवासात "sea shore"च्या ठिकाणी तु brounish"रंगाचा दिसून आला. युरोपातील जिब्राल्टरची  सामुद्रधुनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुझ्या पाण्याचा रंग  " iceblue" दिसला .तर कुठे जास्त प्रमाणात हरीत द्रव्य असणाऱ्या वनस्पतीमुळे तुझा रंग हिरवट दिसला. ग्रिक आणि टर्की या दोन देशाच्या मध्ये असलेल्या खाडी म्हणून ओळख असलेल्या तुझ्या निळ्या रंगाच्या पाण्यातून प्रवास करत आम्ही "काळा  समुद्र" अशी ओळख असणाऱ्या तुझ्या पाण्यात  प्रवेश केला. त्या भागात तुझी  "काळा समुद्र"   म्हणून ओळख असली तरी  तुझे पाणी मात्र निळेच होते.त्यातुन प्रवास करत आमचे जहाज रशियाच्या "ओडेसा" बंदरात पोहचले. चार महीन्याच्या तुझ्या सोबतच्या प्रवासात अनेक   रंगात तु आम्हाला भेटलासं. परतीच्या प्रवासात पुन्हा काळा ,भुमध्य, तांबडा व शेवटी अरबी असा प्रवास करत आम्ही मुंबईच्या बंदरात येऊन पोहचलो.   कोकणपट्टीच्या किनाऱ्यावर तुझा रंग तिथल्या चिखलामुळे ब्राऊनीश दिसतो.पेट्रोलिंग करण्यासाठी आम्ही भारताच्या किनारपट्टीवर जहाजातून फिरत असताना अंदमान च्या द्विपसमुहा भोवताली असणाऱ्या तुझ्या स्वच्छ निर्मळ पांढऱ्या पाण्यात विहरणारे रंगबिरंगी सागरी जीव स्पष्ट दिसतात.या भारत भुमीला वेढा घालून असणाऱ्या, पुर्वेकडे अरबी सागर,दक्षिणेकडे हिंदमहासागर ,आणि कलकत्त्याला बंगालचा ऊपसागर म्हणुन ओळख असलेल्या तुझ्या पाण्याचे वेगवेगळे रंग कन्याकुमारीला त्रिवेणी संगमाच्या रूपात ऐकत्र मिसळुन भारताच्या अखंडतेची साक्ष देतात.
१९६८साली व त्यानंतर १९७० साली रशियातील सैबेरियाच्या भागात  मुक्काम असताना,  तिथल्या मायनस 30डिग्रीच्या थंडीत तुझे किनारे पांढऱ्या शुभ्र बर्फात रूपांतरित झालेले पाहीलेय मी.
 अमेरिकेसारख्या देशातील तुझ्या त्या गडद निळ्याशार पाण्याची तर गोष्टच न्यारी,योग आला होता तिथे तुझ्या भेटीचा. पण खरं सांगू  दिवसा तु जितका सुंदर दिसतोस  त्याहीपेक्षा रात्रीच्या काळोखाने गडद निळ्याशार  झालेल्या तुझ्या रंगावर जेव्हा चंद्राची रूपेरी किरणं पडतात ,तेव्हा तु एखाद्या रूपगर्वितेचे सारखा भासतोस! 
अटलांटिक व प्रशांत महासागर म्हणून वेगवेगळ्या रंगानी ओळखले जाणारे तुझे पाणी अलास्काच्या खाडीत एकत्र येते ,परंतु ग्लेशियर म्हणजे बर्फाचा पहाडामधून येणाऱ्या पाण्यात कमी क्षार असुन ते गोडे असते त्यामुळे त्याचा रंग हलका निळा दिसतो तर समुद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महासागरातील तुझ्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने ते गडद निळे दिसते.पाण्याच्या वेगवेगळ्या घनतेमुळे ते ऐकमेकात न मिसळता अलास्काच्या खाडीत तुझे रंग स्पष्टपणे वेगवेगळे ओळखायला येतात.                                              
  " हे नौसैनिका! सारे जग फिरून येऊन तु माझं मलाच माहीत नसणाऱ्या माझ्या रंगाची ओळख करून दिलीस, कौतुक केलसं माझं,पण 1971साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात तुम्हा सैनिकांच्या बहादूरीचा रंग ,मी ही जोखलाय!"

  "आज जवळजवळ ऐक्कावन वर्षानंतर तु आठवण करून देतोयेस त्या घटनेची.अरे, ज्यावेळी मी नुकताच ईंडीयन नेव्हीत भरती झालो होतो ,त्यावेळी माझ्या वाचणांत John,f,Kennedy यांच ऐक वाक्य आलं होतं ,"ask not what your country can do for u , ask what u can do for your country. "  
"आई आणि मात्रुभुमीला पर्याय नसतो सागरा! आजही आठवते मला ती काळरात्र ! आम्हा नौसैनिकांना वडीलकीच्या छत्राचा आधार देत तु ही आमच्या बरोबर होतास  !"

               " होय!आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी तळहातावर प्राण घेऊन निघालेल्या तुम्हा सैनिकांना बघून त्यावेळी माझाही जोश अनावर झाला होता"

              " अनुभवास आले होते ते त्यावेळी
आम्हाला. आमच्याप्रमाणेच तुझ्यातही देशभक्ती उचंबळून आल्याने तू शत्रूवरचा रोष प्रकट करण्यासाठी तुफानाचे रूप धारण केलेस. त्या उंचच उंच उसळलेल्या लाटांनी आमची छोटीशी बोट हेलकावे खाऊ लागली होती,  

                 " तरीही माझ्या रौद्ररूपाला न घाबरता तुम्ही शिवाजी महाराजासारखं शत्रुच्या हद्दीत गनिमीकाव्याने प्रवेश केला ,शत्रु गाफील पाहून कराची बंदर उद्ध्वस्त केलं , त्या काळ्याकुट्ट अंधारात पिवळ्या केशरी रंगाच्या प्रचंड ज्वाला ऊसळु लागल्या.

                " अरे,वेळ कुठे होता आम्हाला ते बघायला.पण आमचे काम फत्ते होताच तु मात्र शांत झालेला दिसलास.

                 "त्यावेळी तुम्हा नौसैनिकांच्या नसानसात भिनलेला तो देशाभिमान, आपल्या मातृभूमीसाठी दिसणारी तुमच्यातली बलिदानाची वृत्ती बघून माझा ऊर अभिमानाने भरून आला होता.तुमच्या कामगिरीत माझा सहभाग देऊन क्रुतक्रुत्य झाल्यासारखे वाटले होते.

"होय! आम्ही भारताच्या हद्दीत पोहचेपर्यंत तु प्राचीच्या सोनेरी किरणांच्या थाळीत उगवत्या सूर्याची ललाटी घेऊन ऊभा होतास!आम्ही मिळवलेल्या विजयाच कौतुक करतांना ती ललाटी आमच्या भाळी लाऊन  पित्याच्या रूपाने आमचं स्वागत केल होतसं!"

" हं !पारतंत्र्याच्या काळोखातून भारतमातेला  बाहेर काढणारे वीर सावरकरांसारखे स्वातंत्र्यसैनिक आणि देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्राणाची बाजी लावणारे स्वतंत्र भारताच्या तिन्ही दलाचे तुम्ही सैनिक ,खरोखरच या भारत देशाची शान आहात. पण सैनिका ,स्वातंत्र्य मिळविणे जेवढे कठीण होते, तेवढेच ते टिकवून ठेवणे किंबहुना त्याहूनही जास्त जोखमीचे झाले आहे"

 "होय! म्हणुनच तर १९६२च्या युद्धानंतर या देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या शत्रुला आम्हा सैनिकांनी सडेतोड ऊत्तर दिले आहे. हे सागरा ! रंगहिन असणारा तु, कुठल्याही रंगात मिसळला गेला की, आपला रंग बदलतो, पण या भारत मातेच्या सुपुत्राला ऐकदा चढवलेला देशसेवेचा भगवा रंग त्याच्या जीवात जीव असेपर्यंत  तसाच कायम स्वरूपी रहातो त्याच्या अंतापर्यंत!"
भारत माता की जय!                                   जय हिंद!

            " हे सैनिका , महाप्रलयाची ताकत ठेवणारा मी, प्रत्येक युगाचा अंत करताना माझ्या गर्भात संपूर्ण सृष्टीला सामावून घेतो आणि पुन्हा असाच रंगहीन होऊन निर्विकारपणे ऊभा असतो त्या महातेजस्वी सुर्याच्या ऊगवत्या मावळत्या रंगाच्या  वेगवेगळ्या रंगछटेने रंगत, पुन्हा एकदा रंगबिरंगाने नटलेल्या नव्या सृष्टीच्या उगमतेची वाट बघत " !!!!  

(समाप्त)


 *******************************************  

 

 

 

 

      

 

 

 

 

 

 

 

   

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू