पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अवधा रंग श्रीरंग

            रंग माझा वेगळा

            अवधा रंग श्रीरंगांचा   
      आया होली का त्यौहार हुई रंग की बौछार ......
हे गाणं जेव्हा कानावर पडतं तेव्हा जणु जगातील सारेच रंग खरोखर फौव्वा-या च्या रुपे सर्व दूर उडताना दिसत आहे असा भास खरोखर मनाला होतो , आणी नुसत्या त्या आभासां नेच मन आणी शरीर थय थय थिरकायला होतं ,आणी होळी रंगपंचमी च्या दिवशी तर तो खरोखर प्रफुल्लित मनावर ठसे च्या ठसे सोडूनच जातो .
  " रंग " रंगावीण दुनिया शून्य आहे , प्रकृती च्या पर्वणी ला बघता इश्वरा ची किमया दिसून येते किती तरी वेगळे वेगळे रंग आणी तेही अजून विविध शेड ( मिसळ रंग) मध्ये दिसून येतात जणु एखाद्या प्रख्यात प्रवीण कलाकारा ने आपल्या तूलिके ने स्वतः नैसर्गिक रंग पृथ्वी व आकाश भर पसरविले आहेत , अर्थात हा प्रख्यात कालाकार म्हणजे नक्कीच आपला पर्जन्य वर्धक निसर्गच आहे .
कुठं अरुणोदय समयी गोड गाढ झोपेतून उठून गुलाबी रंगा पासून राघववेळी  ची रंगारंग सुरुवात,मग केशरी प्रफुल्लित आनंदित रंग बरोबर सोनेरी सोनसळ्या चा किरणांचा पृथ्वी वर समागम , तो लाल बुंद सुर्य जणू आभाळा वर ठळक कुंववा चा ठसा , हळू हळू  हिरण्यवर्ण  सोनेरी गोल वर्तूळ त्या वर वृत्ता कार मोर पीसी रंग आणी सोनेरी चमचमणाऱ्या त्या सहस्त्र किरण , इतर कोणते मर्म वर्ण ह्या पुढे खरे ठरणार ?
इकडे धरे वर सावळ्या व धवल  रंगा सोबत तांम्बडा रंग प्रति छाये च्या रुपे सरिते सागरे संथ पाण्यावर प्रतिबिम्बित होतोय , त्या सोबत  ताम्बड्या शुभ्र पांढर्‍या सुरेख रंग बेरंगी कलगी असलेल्या व केशरी लाल चोंच असलेल्या कोम्बड्या , उगवत्या दिशे ला पाहून जगभराला उठायची साद देत आहेत , रंग बेरंग्या सुंदर आणी तर्हेवाईक फुल पाखरू , आनंदाने एका फुलावरून दुसऱ्या फुलावर मधुगंध व मधुपराग चा आस्वाद घेत आहे , जणु सुरेख रमणीय रंगबेरंगी , आकर्षक  दोघे , फुलं आणी फुलपाखरु ,  सुप्रभाते महकत चहकत एका मेंकानां कड -कडून मिठी मारताहेत कि काय !
हिरव्या गर्द वृक्षावर हिरवी गार पल्लवे वृक्षा च्या वंशा प्रमाणे छोटी मोठी वेगवेगळ्या आकर्षक आकारची वार्‍या च्या हळूवार झुळके ने सानंदे डौलत आहेत च , पण त्यावर ही अपलीं घरकुले बांधणारी छोटी शी लहान शी सांवळी शी चिमणी , रंगीत टिटवी , कोकीळा, पोपटी राघुमैना , आणी नीळकंठी पक्षी , पांढरी व ढगाळ कबूतरं , काळं शार कांवळ , निरनिराळ्या आकारा चे व रंगतदार लहान सहान पक्षी त्यांचा चिवचिचिवाट , जणू त्यांचे रंगतदार विश्वच त्यां निरनिराळ्या वृक्षांवर असावे,
इकडे हिरवा गार मखमली गालिचा , दव बिंदूं च्या तृणांकुराने भरलेला , आणी आजू बाजू विविध सुंदर व आकर्षक रंगां ची फुल बागा मखमली गालीच्या चा बुटेदार किनार कोट , काय सांगावी ह्यां अप्रतीम निसर्ग सौंदर्य रंगांची जणु रंगपंचमी धरे वर निसर्ग रंग उधळत आहे , पुढं भिन्न विभिन्न वटवृक्क्षां वर प्रत्येका चा प्रकृती आणी नियमित वेळे प्रमाणे विविध रंगांची फुलं उपरांत  धरे वर पेंडूलम सारखी लोंबणारी विविध रंग व आकारां ची खाद्य फळे त्यांचे सौंदर्य तर डोळे भरून पहावे असे नसूत  तर ते पोट भर खाऊन आपली प्रकृती चिरंतर अक्षय उत्तम ठेवावी अशी आहेत ,
आता ह्याचे रंग सांगून काय उपयोग तेच हिरवे :- पपई, आम्बा , पिवळं पपई , आम्बा संत्री , लिंबू  तांम्बड :-, चिकू शेवफळ  लाल , बोरं डाळिंम्ब कलिंगड लाल चेरी आलू बुखारा  कत्थई:- , कौठ जांभूळ अंजीर  जर्दाळू  पोपटी :- , सफरचंद आंवळा द्राक्षं पीच सीताफळ रामफळ किती तरी नांव घ्यावी आणी किती सोडावी अनंत रंगा ची फळं आणी फुलं .
मधोमध वर्तुळाकार निळ्या शार पाण्या चा फौव्वारा अजून त्या वातावरणा ची शोभा वाढवून पांढर्‍या रंगा ची बौछारं / झरंण उडवित आहेच . म्हणजे आपल्या बायांच्या हळद कुंकु सोहळ्यात जणु अंतर आणी गुलाबदाणी शिंपंडण .
निळसर पाणरंगी तळव्या, तलावा व छोट्या वा मोठ्या नदी पाटांवर , पांढरे शुभ्र बगळे त्यांची सोनेरी चोंच तसे च शतूर्मुग इकडे तिकडे फिरत वातावरणाचे सौंदर्य निश्चित आल्हाद दायक करित आहेत . पाण्या च्या आत विविध प्रकार च्या आकर्षक व सुरेख रंगबेरंगी मासोळ्या सळ सळ करित धावत आहेत , ह्यात तर पांढरा सोनेरी लाल गुलाबी हिरवट पिवळट , तांम्बडा काळा , धुरकट कोणते म्हणून रंग सांगावे व सोडावे ? हेच कळत नाही , पुन्हा अजून खाली पाण्या च्या खोल , विविध रंगांचे म्हणजे पांढरे , सावळे ,हिरवे गर्द हिरवे , मातकट कत्थई निरनिराळे शैवाळ , पांढरे ताम्बडे , गुलाबी शंख आणी शिंपल्या विविध रंगांचे इतर सरपट प्राणी, कांसवें इत्यादी समुद्री सौंदर्या ची काय कमी आहे कां ? कांसवा वरून लक्षात आलं रात्री जसे वृक्षां वर प्रकाश पुंज कांजवे असतात तशे पाण्यात ही प्रकाश पुंज कीट असतात .
हे झालं धरा अंबर व नीर ह्यांच्या वर निसर्गा द्वारे उधळले जाणारे रंग .
इंद्र धनुष्य हा आकाशा वरचा एक अप्रतीम रमणीय व नैसर्गिक सोहळाच आहे , क्षणाधार्त सारे शीण क्षीण विसरायला लावणारा , जणू स्वर्गा तून भूवासियां साठी निघालेला एक नवलाचार .
अशे अनेक आणी अनंत रंग आपल्या रोजच्या जिवनांत ही येतात दिसतात आणी अल्हाद देऊन जातात , आपल्या लक्षात ही नसतें , आणी खरं तर त्यामुळेच तर आपलं जगणं निसर्गा बरोबर एका अदृष्य कलर वाइब्रेशन थेरॅपी ने जुडले ले आहे , म्हणून च प्रत्येक जीवा ला जीवन जगण सहज व सोपं जात .
कुठं कुंठे तर कांही प्राणी स्वयं रक्षा करिता आपला रंग नैसर्गिक रित्या आजू बाजूच्या निसर्ग रंगा प्रमाणे बदलून घेतात हे ही रंगा चा एक अजब च संगम आहे .
अजून ही घरघुती कारणे ही खूप से अशे कांही रंग इश्वर व निसर्ग प्रदत्त आहेत जेणे करून आपले जीवन फारच अप्रतीम व सहज सरळ झालेलं आहे , विविध रंग आणी रंग पद्धती एक असा मार्ग आहे , जो निराश झालेल्या व्यक्ती ला पुनर्जिवन देऊ शकतोच आणी साधारण व्यक्ती ला त्याच्या प्रशस्ती चे मार्ग मोकळ करतो .
तर आहे अशी रंगाची किमया ह्यात माझा रंग खरोखर वेगळा असा म्हणावेसे वाटंत नाही ,

       संगळेच रंग माझें , 

       रंगा वीण सारे भंग .


रंग नसते तर फक्त श्वेत व श्यामल दिसले असते , तेथे निसर्गां ने जवळ जवळ पाहाण्यात खाण्यात पिण्यात आणी जिवनात विषेश रंग भरून दिलेत तर या निसर्गां चे किती ही कृतार्थ व्हावे तरि त्यात न्यूनच रहाणार , पूर्ण कृतार्थ कसे व्हावे हा एक मोठा अनंत प्रश्न आहे .
      रंगात रंग भरले श्रीरंगाने ,
          त्यात श्रीरंग रंगात आला ,
             रंगात श्रीरंग कि श्रीरंगात रंग ,                       हेआता कळेनास माला . 

       सौ.सुलोचना बेलापुरकर
             अपराजिता

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू