पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

*डॉ.चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांना “प्रज्ञाभारती पुरस्कार प्रदान”*

 

 

*डॉ.चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांना “प्रज्ञाभारती पुरस्कार प्रदान”*
नागपूर दि. २० मार्च २०२२
*संस्कृत विश्वामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा आणि महत्वाचा मानल्या जाणाऱा,*
*साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवान्वित प्रज्ञाभारती डॉ. श्री. भा. वर्णेकर यांच्या स्मृत्यर्थ दिल्या जाणाऱा,*
*संस्कृत भाषा प्रचारिणी सभा, नागपूर यांच्या सन २०२२ चा,*
*“प्रज्ञाभारती स्मृती पुरस्कार” आज मान्यवरांच्या उपस्थितीत ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांना संस्कृत-भवनम्, नागपूर येथे प्रदान करण्यात आला.*
प्रस्तुत पुरस्कार हा *संस्कृत अध्ययन, संस्कृतातील सृजनशील लेखन आणि संस्कृत प्रचार कार्य* या साठी देण्यात येतो. या प्रसंगी मार्तंडराव वाईकर व्याख्यानमालेचेही आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत उपक्रमाचे हे ३० वे वर्ष आहे.


या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संस्कृत कवयित्री डाॅ. लीना रस्तोगी होत्या. संस्कृत आणि संगणक या विषयातील जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. चंद्रगुप्त श्रीधर वर्णेकर, संशोधिका अनुश्री घिसाड, डाॅ. वीणा गानू यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. रेणुका करंदीकर यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय डाॅ. वीणा गानू यांनी करून दिला.
डाॅ. चंद्रगुप्त वर्णेकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात संस्कृत भाषा प्रचारिणी सभा नागपूर या संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली.
संस्कृतच्या क्षेत्रात अनेक संस्थांचे एक जाळे तयार व्हावे, त्यांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, असे प्रतिपादन डाॅ. चन्द्रहास शास्त्री यांनी केले.


संशोधिका अनुश्री घिसाड यांनी आपल्या भाषणातून अफगाणिस्तानातील भारतीय संस्कृतीच्या वारशांवर प्रकाश टाकला.
डाॅ. लीना रस्तोगी यांनी अध्यक्षीय भाषणात संस्कृतच्या क्षेत्रातील तरुणांच्या सहभागाबद्दल कौतुक केले.
श्री. योगेश गानू यांनी संस्कृत भाषा प्रचारिणी सभा या संस्थेच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली.

माऊली की जय जय श्रीकृष्ण !!!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू