पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ब्लॅक ब्रिफकेस(लघुचित्रपट)

स्टोरी अँड डायरेक्टर:- कार्तिक सिंग

प्रोड्युसर:-विवेक पॉल

ऍक्टर:- मनिष पॉल

'ब्लॅक ब्रिफकेस' 16मि. ची शॉर्ट फ़िल्म. जी लोक चुकीच काम करतात त्या प्रत्येक लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याच काम करणारी फिल्म आहे. लिहिणाऱ्यानी फक्त 16 मिनिटात एका आतंकवादयाची मनोवृत्ती अगदी चोख मांडली आहे. 'ब्लॅक ब्रिफकेस' ची संपूर्ण कथा कथेच्या नायकाच्या विचारांभोवती आणि एका काळ्या ब्रिफकेस भोवती फिरते नायकाचे कुठलेही संवाद न वापरता फक्त मनातील भाव आणी हावभाव वर हा चित्रपट तयार केला गेला आहे आणि हे याच श्रेय ही म्हणावं लागेल नायक बॉम्ब स्फोट करण्याच्या तयारीत आहे त्याचे बॉम्बस्फोटाचे त्याचे विचार त्याचे भाव या चित्रपटात मांडले गेले आहेत. मनीष पॉलच काम हया चित्रपटात अगदी वाखाणण्याजोग आहे कथा आणि दिग्दर्शन कार्तिक सिंग यांच असुन निर्मिती विवेक पॉल यांची आहे. चित्रपटाचा संदेश विचारात पाडण्या सारखा आहे. "दुनिया मे दो तरह के लोग होते है, एक अच्छे और दुसरे बुरे ये तूम्हे तय करना है तूम्हे कौनसा रास्ता चुनना है." संपुर्ण चित्रपट मनाला अस्वस्थ करणारा आहे एवढच की थोडीशी आमीर चित्रपटाची झलक वाटते पण बाकी चित्रपट खूप छान आहे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू