पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तुम्ही लेखन करता का?

तुम्ही कथा लेखन करता का? अस विचारण्या पेक्षा खर तर तुम्हाला कथा लिहिता येतात का अस इथे विचारल पाहिजे खर तर लेखन करण्याची आवड ही सगळ्यांनाच असते आणि आपापल्या परीने प्रत्येक जण लेखन करतो ही पण नेमकं सविस्तर पध्दतीने लेखन कस करावं हे आधी समजून घेतलं पाहिजे आता फक्त कथा लेखनाचा विचार केला तर कथा कशा लिहायच्या कथा लेखनाचे किती प्रकार आहेत  ते कोण कोणते आहेत याचा विचार नवोदित लेखकाने नक्की करावा तसेच लेखनाची भाषा ही कथेला सुसंगत असावी वाचणाऱ्याला आपण या कथेचा एक भाग आहोत अशी जाणीव झाली पाहिजे वाचकाला कथा आपल्या आयुष्याचा एक भाग वाटली पाहिजे पण मग अशी कथा लिहायची कशी हे ही महत्वाचं आहे . तर सगळ्यात महत्वाचा असतो तो कथेचा प्रकार म्हणजे तुम्ही तुमची कथा कुठल्या प्राकारात लिहिणार आहेत जस तुमची कथा बालकथा आहे सामाजिक कथा आहे की स्त्री-प्रधान आहे याचा विचार करा एकदा तुम्ही प्रकार निश्चित केला की मग त्या प्रकाराला अनुसरून कथेचा विषय निवडा त्यानंतर कथेतील स्थान म्हणजे कथेत नेमक्या कुठल्या जागा दाखवायच्या आहेत याचा विचार करा जस एखाद जंगल घर हवेली स्थान नेहमी कथेचा अर्थ दर्शवत असतात त्यामुळे त्यांचा नीट विचार करा नंतर नंबर येतो तो पात्रांचा कथेत किती पात्र ठेवायची ती कोणती असावी त्यांची पार्श्वभुमी काय असायला हवी यांचा विचार करून मग कथा लिहायला सुरुवात करावी आता थोडा कथा प्रकारांचा ही विचार करूत कथांचे तस बरेच प्रकार आणि उपप्रकार पडतात त्यातील काहीचा विचार करूत


1)बालकथा:-

बालकथामध्ये सर्व प्रथम लहान मुलांचा विचार करावा. लहान मुल ही नेमकी कोणत्या वयातील आहेत आपण लिहिलेली कथा त्यांना आवडेल का हा विचार जरूर करावा कारण आत्ताचा जमाना हा सुपर हिरोज चा आहे असं असताना त्यांना परीकथा आवडणार नाहीत पण तरी सुद्धा आपल्यात आपल्या कथांमध्ये इतके सामर्थ्य नक्कीच असावे की मुलांना परीकथा आवडु लागतील पण मग अशी कथा लिहायची कशी तर पाहिले सांगितल्या प्रमाणे कथेतले वातावरण पात्र यांचा विचार करून मग कथा लिहा. उदा. लाकुडतोड्याची गोष्ट

2)व्यक्तिविशेष कथा:-

या कथांमध्ये एखाद्या व्यक्तीचे वर्णन केले जाते त्यांचे गुण शौर्यत्व दोष इ. यांचा उपयोग करून व्यक्तिविशेष कथा लिहिल्या जातात उदा. शिवाजी महाराजांच्या गोष्टी

3)प्रेमकथा:-

हा विषय साधारणता सगळ्यांचा आवडीचा विषय असतो या प्रकारात अनुभव कॉलेज विश्वातील पाहिले प्रेम वैवाहिक जीवन अश्या विविध प्रसंगातुन कथा मांडल्या जातात. 

कथालेखनात ह्या गोष्टींचा विचार करून मगच कथा लिहिल्या जातात आता कथा लिहिताना ह्याचा विचार करून कथा लिहायला सुरुवात करा




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू