पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक फुलवेल जाई

*एक फुलवेल जाई*


दारामध्ये स्वागताला
उभी सतत ही जाई
वार्यावर दरवळ
हिचा होतसे प्रवाही॥धृ॥


गंध सदा येत राही
तरी नाव हिचे जाई
हिच्या नावाची वाटते
अशी मला नवलाई॥१॥


गीत हिच्या सुगंधाचे
माझी कविता ही गाई
हिच्या परी कविताही
माझी दर्वळत राही॥२॥


धुंद गंधात सुगंधी
भाव चिंब भिजताही
शब्दरुपे इथे तिथे
किर्ती उधळत राही॥३॥


कळ्या वेलीवर माझ्या
मनी फुलतच राही
हिचे माझें एक जिणे
असे उमगत राही॥४॥


एक फुलवेल जाई
शब्द वेल कविताही
काय सांगावे याहून
काही सांगणेही नाही॥५॥


*--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू