पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शेंगोळे

शेंगोळे.....

लहानपणी आमच्या आई(माय)वेगवेगळी पदार्थ बनवायची. दररोज काही तरी नवीन असायचं. दिवसभर शेतात काम करून रात्री मात्र मस्त रुचकर जेवायला द्यायची.कधी शेंगोळे,कधी धिरडे,कधी धपाटे,कधी शाबू उसळ,तर कधी पोहे,मुरमुरा चिवडा, रस पुराणपोळी, आंब्याचा रस-पुरी, बुंदीचे लाडू, करंज्या, लाडू, शेवया गोड व तिखट, शिरापुरी डाळीतले फळे, खोबर लाडू, शेंगदाणे लाडू, डिंक लाडू....

अशी अनेक प्रकारची पदार्थ खाण्यात मजा काही वेगळी होती.

यापैकी आज एक पदार्थ शेंगोळे कसे बनवावे या विषयी थोडेसे.....

गव्हाचे पीठ,चना डाळीचे पीठ, थोडे ज्वारीची पीठ कोरडे घेऊन त्यात मीठ,फिकी चटणी, हळदी,जिरे पूड लसुण पूड इत्यादी टाकून पीठ कुसरून एक कणिक करायचे. ५ ते १० मिनिटे थांबायचे.तो पर्यंत एक पातेल्यात कांदा, लसूण, जिरे,मोहरी इ घालून फोडणी द्यायची. झाकण ठेवून त्याला उखळी येऊ द्यायचं. इकडे पिठाचे कणिक छ्यान प्रकारचे भिजत असायचे अन ते हातावर घेऊन त्याची लहान लहान वर्तुळ टाइप गोल गोल आकार देत त्या उखळी आलेल्या पातेल्यात सोडा.

१० मिनिटे त्याला शिजू द्या ....

एक एक प्लेट मध्ये काढा आणि मस्त एक चव लहानपणीची मिळवा....

आमची आई स्वयंपाक करीत असताना मी चुलीजवळच बसून पहायचे.कारण आम्ही ग्रामीण भागात रहायचे.१९७०-७५,७८ चा काळ असेल.आज जवळपास ५९ वर्ष झाली असतील वरील पदार्थ खाऊन पण अजून चव गेली नाही.पण आमचे दुर्दैव वरील पदार्थ बनविणारे दोघेही (आई-वडील राहिले नाहीत)फक्त न फक्त त्यांच्या हातची चव आता नाही मिळणार..

      आजकाल गॅस आला, लाईटवर चालणारी शेगडी आली अन चूल मात्र लुप्त झाली.

      बनवणारी माणसे ही बदलली ..अवीट चवीची गोडी ही संपली.

      आला आहे आता फक्त वडा पाव 

      वरील रेसिपी कधी ना मिळणार राव ....

      पांडुरंग कोकुलवार

      नांदेड

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू