पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ग्लेशियर

मला न 

तू समुद्राच्या मधोमध उभ्या

त्या शुभ्र पांढऱ्या ग्लेशियर सारखा वाटतो

वरून जेवढा दिसतो तेवढाच नसतो

खोल पाण्यात बुडालेला

कल्पनेचा पलीकडे आहे तुझा आकार

तुझे कर्तृत्व... 

 

कधी कधी मला तू 

विस्तीर्ण सागरासारखा पण वाटतो.. 

तुझ्या उंच उंच लाटांत

वाहून जावेसे वाटते मला... 

तुझ्या अथांग मनाचा ठावच लागत नाही

आणि दूरपर्यंत... 

अगदी कितीही दूर बघितले 

तरी तूच तू दिसतो...... 

 

तू नं माझ्या

अंधाऱ्या आकाशात झळकणाऱ्या

चंद्रासारखा पण आहे... 

दररोज तुझ्या कला बदलतात

कधी पूर्णत्वास जाऊन माझ्या मनाच्या

दाही दिशा उजळून देतो.. 

तर कधी... 

आपल्याच विश्वात हरवून जातो

अन् दिसेनासा होतो... 

 

अन् कधी तर असे वाटते

की तू माझं संपूर्ण आकाश आहे

पांढरा,केशरी, लाल, पिवळा, 

जांभळा, निळा, काळा...

तुझ्या सप्तरंगी छटा घालून

मी सजते , खुलते, बहरते

तुझ्या प्रेमाच्या पावसात 

चिंब चिंब भिजते

आणि स्वत:ला तुझ्यात 

सामावून घेते

नेहमीसाठी....... 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू