पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

छेडीलीस तू तार मनाची

काव्य लेखन---- छेडलीस तू तार मनाची!


अवचित तार छेडीली कुणी? 

पहाता तो दिसली स्वप्न दर्पणी

स्वप्न सुंदरी लाघवी  नृत्यांगना

कमनीय बांधा नार देखणी


छेडलीस तू तार मनाची

वाढे धडधड स्पंदनांची

ह्दयातुन मधुर झंकार

उमटली सुरेल तान प्रीतीची


ही छुमछुम नुपुरे वाजती

तालावरी पदन्यास ठेका

नजाकतीची हस्तमुद्रा

कमनीय कमरेला झोका


मुद्राभिनयी झुकल्या ग!

कमलनयनपाकळ्या कोमल

लावण्यखणी,तुझी मोहक अदा

नृत्य शिल्प भासले शामल


धुंदावले नादावले तनमन

मन उडू उडू जाहले

मम"रंगीन" मन पाखरू

तुज भोवती भिरभिरू लागले


आनंद चांदणं वर्षावाचा

भुकेला ग  मी चकोर

तृषा शमवी  ग  माझी

 तुज सवे नाचू दे मनमोर.


सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर

बावीस एप्रिल २२

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू