पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पटकथा- तंत्र व मंत्र

पुस्तक आढावा
पुस्तकाचे नाव- पटकथा- तंत्र व मंत्र
लेखक- ए.जी.दिवाण  
प्रकाशक- गमभन प्रकाशन पुणे
फोन- 244 58 141, 30 22 54 22
किंमत- 72 रुपयेे फक्त

          माझ्या मुंबईच्या प्रशांत गाडेकर या मित्राने हे पुस्तक मला माहितीस्तव वाचण्यास दिले. तो एक चांगला स्क्रिप्ट रायटर आहे. आपल्या लेखनीला प्रोफेशनल लूक देण्यासाठी माझ्यासारख्या नवोदित लेखकाला हे पुस्तक एक मार्गदर्शकच म्हणावं लागेल. बऱ्याच माझ्यासारख्या नवोदित लेखकाला आपल्या लेखनाला किंमत असतेेे, हेच मूळात ठाऊक नसते, परंतु आजच्या युगात लेखन हे फक्त छंद न राहता त्यातून मिळकत व्हावी असं ठरवलं पाहिजे. त्यासाठी या पुस्तकाचा उपयोग एक चांगली स्क्रिप्ट लिहिण्यासाठी नक्कीच होईल.
                          एक चांगली स्क्रिप्ट लेखकाच्या सारासार विचार करण्याची प्रवृत्ती व कल्पकता यावर अवलंबून आहेच, पण सोबत मानवी स्वभावाचे आकलन करून घेणे, आसपास घडणाऱ्या, कानांवर येणाऱ्या किंवा वाचनात येणाऱ्या घटनांचे निरीक्षण करणे अशा गोष्टी आवश्यक आहेत.
                     स्क्रिप्ट लेखन हेेे वर्तमान काळात केले जाते. लेखकाच्या म्हणण्यानुसार स्क्रिप्टची तीन प्रमुख अंगे आहेत- 1) कथा 2) पटकथा 3) संवाद.
                कथानकांचा अभ्यास करण्यासाठी लेखकाने चार भाग पुढीलप्रमाणे पाडले आहेत- 1)कथानकांचे प्रकार
2)कथानकांचे विषय
3)कथानकांची निवड
4)कथा लेखन
                     चित्रपट कथानकाचे पुढील प्रमाणे चार भाग लेखकाने पाडले  आहेत-
अ)नायिका प्रधान किंवा स्त्री प्रधान ब)नायक प्रधान किंवा पुरुष प्रधान क)घटनाप्रधान
ड)पूर्णपणे काल्पनिक
                कोणत्याही चित्रपट कथेत  पुढील प्रमाणे चार गुणधर्म अवश्य असले पाहिजेत, असे लेखक आवर्जून सांगतात- 1)संघर्ष
2)उत्कंठा 
3)नाट्य (Drama)
4)विस्तार क्षमता(Potential)
                  कथेची तीन टप्प्यांमध्ये विभागणी करायची असतेेेे, असे लेखक म्हणतात-
 1) आरंभ किंवा सुरुवात (Exciting)
2) मध्य (Interval)
3) शेवट (Climax)
       सुरुवात एक्सायटिंग असली पाहिजे आणि शेवटामध्ये थोडं क्लायमॅक्स असला पाहिजे, असं लेखक सांगतात.
                      पटकथा लेखनाची पूर्वतयारी कशी करावी? याबद्दल मार्गदर्शन करताना लेखक लिहितात
1) प्रथम सेन्सॉर बोर्डाचे नियम लक्षात घ्यावेत.
2) आपल्या लिहिलेल्या प्रसंगांचे
Visualization करावे.
3)पुढे काय होईल? याचा अंदाज प्रेक्षक लावतील, परंतुु तो अंदाज चुुुकावा आणि त्यांची उत्कंठा वाढवणारी स्क्रिप्ट असावी.
4) स्क्रिप्ट चढत्या क्रमाने असावी म्हणजे ती कुठेही थांबल्यासारखी, रेंगाळल्यासारखी वाटू नये.
                   संवाद लेखन खटकेबाज असावे म्हणजेच शहरी आणि ग्रामीण संवाद यांचा अंदाज बांधून तो केला पाहिजे.
               लेखक 'शांता' ही नायिका धरून उदाहरणास्तव एक पटकथा आपल्याला संवादासह लिहून दाखवतात, त्यामुळे आपल्याला स्क्रिप्ट रायटिंग काय असते? याचा नेमका अंदाज लागतो.
            जेेेेे नवोदित लेखक स्क्रिप्ट रायटर होण्यास उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक वाचणे खूपच गरजेचे आहे, असे मला वाटते.
©®-विश्वेेेेेश्वर कबाडे (नवोदित बहुभाषिक कवी, लेखक) अणदूर
भ्रमणध्वनी- 93 26 80 74 80

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू