पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दु:ख मोराच्या मनाचं

दु:ख मोराच्या मनाचं


गोष्टी मधल्या काऊचं
होतं घरटं शेणाचं
पाणी पाऊस येताच
पार वाहून जाण्याचं॥धृ||


गोष्टी मधल्या चिऊचं
होतं घरटं मेणाचं
ऐन तापल्या उन्हात
वितळून ही जाण्याचं॥१॥


झाडे नाही नाही घरं
आता राहिलं कुणाचं
बाळ पाखराचं कुठे
आता राहावं गुणाचं॥२॥


नाही घर ना पाखरं
स्वप्न हिरव्या रानाचं
चित्र पाहू चित्रातच
राघू आणखी मैनाचं॥३॥


स्वप्न आता उरणार
कोकिळेच्या ही गाण्याचं
दु:ख आता पुस्तकात
पाहू मोराच्या मनाचं॥४॥


*--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू