पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई

आई


आत्मा आणि ईश्वर यांच्या आद्याक्षराने बनलेला
शब्द म्हणजे 'आई '.आईशी आपल नेमकं नात काय असत.ती आपल्याला जन्म देते. नऊ महिने पोटात बाळगते आणि आपल्या जन्माच्या वेळी जणू तिचा दूसरा जन्मच होत असतो .हे सर्वांना माहितच आहे. पण अशा आईकरता आपण काय करत असतो एकदा मनाशी विचार करून पहा बरं.
संसारात तिला कायम सर्वजण गृहित धरून चालतात. कधी तिच्या काय इच्छा-आंकाक्षा आहेत,तीचं काय म्हणणं आहे हे कधी जाणून घेतो का आपण . आई म्हणजे आपल्या सर्वांना एक भोकंजा किंवा भोज्जा म्हणा हव तर वाटत असते. बाहेरून कुठूनही आल की तिने आपल्यासाठी चहापाणी करावं काहीतरी खायला बनवून द्यावं असच वाटत असत.पण घरात काम करून तीही दमत असेल याचा विचार कुणाच्या मनातही येत नाही. बदलत्या काळानुसार आईचं जगण आणखी कठिण होत आहे. पूर्वी मुलांची लग्न झाल्यावर बायका मोकळ्या होत .थोडी सवड मिळायची.आता सुनाही नोकरी करत असल्याने त्यांच्याही सासूकडून अपेक्षा वाढत आहेत.त्यांच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आपसूकच आईवडिलांवर येते.त्यातून आईवर जास्त. बरं सांभाळ तर करायचा पण तो सूना म्हणतील तसा .मनाने काही करून खाऊ घालण्याच स्वातंत्र्य तिला नसत.नोकरीवरून घरी आल्यानंतर दिवसभर सासूने मुलांना काय काय खाऊ घातले याची उलटतपासणी होत असते. जस आईने मुलांना वाढवलच नाही अशा थाटात त्या बोलत असतात. अशावेळी आईच्या मनाला किती क्लेश होत असतील याची थोडीदेखील जाणीव सूनेला तर नाहीच पण मुलाला पण नसते.आई म्हणजे एक चुपचाप न बोलता सर्वकाही सहन करणारी एक व्यक्ती.
मुलीसुद्धा बहुतेक वेळा आपल्या आईवडिलांचा थोड्याफार प्रमाणात असाच उपयोग करत असतात त्यातून विदेशात असतील तर मग पहायलाच नको.आईदेखील पहिले उत्साहाने सर्व करत असते.पण अखेर तिचे वय बोलायला लागते.तिलाही आराम हवा असतो. परंतु होते काय आईकडून काम होत
नाही म्हटल्यावर सूना नाकतोंड मुरडायला लागतात.सतत स्वतःच्या आईची तुलना सासूशी करत रहातात. मुलांनाही आईची बाजू घेऊन बोलणे शक्य होत नाही. कारण अखेर बायको त्यांच्या खांद्याला खांदा लावून कमावत्या असतात. त्यामुळे आईलाच एडजेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. काही वर्षांनी आई नकोशी होऊ लागते.मग हळूहळू मुल आपल्याच संसारात मग्न होत जातात.मग आईपाशी बसून तिची विचारपुस करणं तर दूर पण चार प्रेमाचे शब्द बोलायला पण जड जातं.
मग अशी ही आई जी सर्वांसाठी आयुष्यभर झटणारी,स्वतःच्या इच्छाआकांक्षांना मारणारी,स्वतःच अस्तित्व विसरून जाणारी.
तिच्या वाटेला पाश्चात्यांचे अनुकरण करून वर्षातून केवळ एकच दिवस ' मदर्स डे 'म्हणून साजरा करण कितपत योग्य आहे ?त्यापेक्षा रोज जाता येता तिच्या खोलीत डोकावून प्रेमाचा
एक कटाक्ष जरी टाकला तरी ती धन्य होईल.ती म्हणतच नाही की तुम्ही तिच्यासाठी खूप वेळ काढा किंवा तिला बाहेर घेऊन जा .तिच्या अवतीभवती रहा.पण जी आई आपल्यासाठी रात्रंदिवस झटली.आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी खपली. आपल्या आजारपणात आपल्याला बरं वाटाव म्हणून देवाला पण साकडं घालणारी आणि वादळवा-याला मुलं घरी सुखरूप घरी परतेपर्यंत तू थांब अस विनविते.सूर्याला त्याची
प्रखरता कमी करायला सांगते,सा-या जगाशी वेळ पडल्यास मुलाला न्याय मिळावा म्हणून देवाशीही भांडायला तयार होते. अशा या आईचे आपण कशाप्रकारे पांग फेडतो हे देखील तितकेच महत्त्वाचे नाही का ?पहा वेळीच आपले वागणे तपासून पहा आणि कुठे चुकत असाल तर रोजच मदर्स डे साजरा करा,जी आपली भारतीय परंपरा आहे.आपल्या भारतमातेला पारतंत्र्याच्या बेडीतून मुक्त करण्यासाठी हजारो लोकांनी प्राणाचे बलिदान दिले .मग आपण आपल्या आईशी चांगले वागून
तिची विचारपूस करून तिच्या अस्तित्वाचा सन्मान तर करूच शकतो ना !


सौ ऐश्वर्या डगांवकर.
इंदूर मध्यप्रदेश.
मो. नं 9329736675.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू