पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मराठी कौटुंबिक मालिका : वास्तव रूप


*मराठी कौटुंबिक मालिका : वास्तव रूप *



मराठी मालिका मराठी संस्कृतीला कोठे घेऊन चालल्यात?


आज कोणतीही मराठी मालिका घ्या, बहुतांश मालिकामध्ये घरगुती कलह, सासू सुनेचा विकोपाला गेलेला वाद, नणंद,भावजय यांच्या मधील शाब्दिक युद्ध, भावाभावातील भांडण आणि द्वेष,दोन जावांची शिगेला पोहचलेली ईर्षा, नवऱ्याचे किंवा बायकोचे विवाहबाह्य संबंध, 

आणि इतर खूप काही बघायला मिळत.

खरोखर जरा विचार करा, आपण काय बघतोय, कश्यासाठी बघतोय? त्यातून आपल्याला काय फायदा होतोय ?हे खरोखर मनोरंजन आहे की नकारात्मक विचार करण्याची प्रक्रिया.

आपण आपला अमूल्य वेळ या मालिका बघण्यामध्ये का वाया घालवतोय?


अश्या  मालिका बघणे म्हणजे एखाद्या घरातील काल्पनिक भांडण बघण्यासारखे आहे ज्यातून निष्पन्न तर काहीच होत नाही मात्र फायदा होतो तो निर्मात्याचा कारण आपण आणि आपले सगळे कुटुंब त्या मालिकेचा TRP वाढवण्यास हातभार लावतो आणि त्याचा एक हिस्सा बनतो.


मराठी काय किंवा हिंदी काय सर्वच मालिका निर्मात्यांनी प्रेक्षक वर्गाला नेमक काय हवं आहे याचा चांगला अभ्यास करून हेतूपुरस्कुत कथा बनवलेल्या असतात. त्यांचा मूळ उद्देश असतो तो TRP.

त्या साठी ते वाट्टेल ते करतील.

या कथा निर्मात्यांसाठी सर्वात आवडीचा चांगला विषय असतो तो म्हणजे कौटुंबिक कलह !!


आपण जे काही बघतो, ऐकतो ते एका पारड्यात टाकून नेहमी तोलल जात . हा मानवी मनाचा स्वभाव आहे. त्यामुळे आपण जे पाहतो ते सकारात्मक आणि नकारात्मक किंवा चांगले आणि वाईट, आवडीचे आणि न आवडीचे अश्या पारड्यात टाकून मोकळे होतो,जे पारडे जेवढे जास्त भरेल त्या बाजूने आपल मत मांडलं जात.

मालिकेतील आपण कोणत्या पात्राशी जुळले जातोय, ते पात्र आपणच आहोत असा समज करून त्या पात्राप्रमाणे आपल्या मनात आपण इतर लोकांबद्दल आपले मत बनवतो.

हया मालिका म्हणजे जाणूनबुजून रचलेल्या खोट्या भंपक कथा असतात. अगदी पद्धतशीरपणे भांडणाच्या स्क्रिप्ट लिहल्या जातात आणि प्रसिद्धी मिळवली जाते. आजकाल पैसे कमवण्याचा हा धंदा झालाय हा किती लोकांना समजणार?

पण आपण मात्र अगदी आवडीने वेळ काढून या मालिका बघतो.

मुळात यात निर्मात्याचा काहीच दोष नाही, त्यांच्या साठी एक मालिका आणि तिचे भाग हे खरं तर एक प्रॉडक्ट असत, आणि बघणारे सर्व ग्राहक!!

मग ग्राहकाला काय अपेक्षित आहे तर त्याच्या घरगुती नात्यातील वाद दाखवले तर ग्राहक खूष होतो असे त्यांचा सर्वेक्षण रिपोर्ट सांगतो.

कारण मालिका बनवतांना प्रत्येक पात्र लक्षात घेतले जाते.दोन वेगवेगळी स्वभाव असलेल्या व्यक्ती

एक चांगली एक वाईट. कोणी कपटी कोणी धोखेबाज तर कोणी प्रेमळ तर कोणी रागीट अशी बरोबर पात्रांची माळ विणली जाते.


बारकाईने बघितले तर  तुमच्या लक्षात येईल आपल्या घरातील प्रत्येक पात्र हे मालिकेमध्ये दिसते आणि आपण जेव्हा मालिका बघतो तेव्हा घरातील प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या पात्राशी जोडला जातो.

आपण ज्या मालिका बघतो त्यात पद्धतशीर पणे उन सावल्यांचा खेळ चाललेला असतो, कधी भांडण दाखवणार तर कधी गोडी,कधी आश्चर्य तर काही गूढ,मात्र ते त्यांचा उद्देश या ना त्या मार्गाने सफल करत असतात तो मात्र आपल्यासारख्या सामान्य आणि मालिकांच्या अधीन झालेल्या प्रेक्षकांना कधीच समजणार नाही.

मराठी कौटुंबिक मालिका मधून प्रत्येक घरात स्लो पोईसनिंग होतय अस तुम्हाला नाही का वाटत?

काय दाखवलं जात यामध्ये ,


1.नात्यामधील वाद विवाद.

2. सर्वांनी गमावलेली विश्वासहर्ता

3. सासू सुनेचा वाद, अशांतता 

4. संशय

5. आरोप प्रत्यारोप

6. कट कारस्थान

7. विघ्नसंतोषीपणा

8. एकमेकांनी गमावलेला आदर

9. कुरघोडी करणे

10.भामटेपणा,लबाडी

11. विश्वासघात.

12. स्वार्थीपणा.

13. राजकारण

14. बदला,सूड उगवणे.

15. दुसऱ्याच्या संसारात विष कालवणे.

ह्याच गोष्टी आपण न कळत आत्मसात करतो. विशेष म्हणजे जेव्हा अश्या मालिका आपण आपल्या मुलांसोबत बघता तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा परिणाम होत असतो. त्यांचा घरातील लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.

सारखे वेगवेगळ्या मालिका बघणे ह्याला एक व्यसनच म्हणावे लागेल आणि हे प्रमाण महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.

सतत मालिकेच्या सुरु होण्याची वाट बघणे, झालेल्या भागावर पुन्हा पुन्हा चर्चा करणे, पात्राबद्दल आपले मत मांडणे किंवा राग व्यक्त करणे, हातातील महत्वाची कामे सोडून आपला वेळ हा मालिकांसाठी देणे ही खरी तर या व्यसनाची लक्षणेच म्हणावी लागतील.

प्रत्येकाने स्वतः मध्ये झोकून या गोष्टी बघितल्या पाहिजेत.


ज्या मालिका बघून आपले नकारात्मक विचार वाढत असतील, नात्यामधील दुरी कमी होण्याऐवजी वाढत असेल तर अश्या मालिका काय कामाच्या?

मालिका आपल एक व्यसन

बनन्या पासून आजच स्वतःला सावरा. आपला आणि आपल्या मुलांचा अमूल्य वेळ दुसऱ्या गोष्टीकडे वळवा.

अश्या मालिकापेक्षा विनोदी, ज्ञानात भर टाकणाऱ्या मालिका जरूर बघा.

- प्रकाश फासाटे.

   मोरोक्को.

212661913052

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू