पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आढावा कवितासंग्रह गिरविता येत नाही कुठलीच लिपी

नाही गिरवता येत कुठलीच लिपी : जगणे शिकवणारा कवितासंग्रह 


डॅा. सौ. स्मिता पाटील मोहोळ सोलापुर येथील कवयित्री यांचा कवितासंग्रह नाही गिरवता येत कुठलीच लिपी जगणे शिकवणारा कवितासंग्रह आहे. स्त्रीजीवनातील वास्तव वेदना वास्तव संघर्ष अधोरेखित करणारा कवितासंग्रह आहे. डॅा. द. ता. भोसले यांची प्रस्तावना कवितासंग्रहाला मिळाली आहे. सत्तर पेक्षा अधिक कविता संग्रहात आहेत. विविध विषयाला स्पर्श करणार्या कविता आहेत. 

जन्मापासून मृत्यूपर्यंत

दोघींच कुळमूळ एकच


नदी कठोर जहर उदरी वाहते

बाई कष्टप्रद शृंखला अनुभवते

(पृ. २)

बाईच्या जगण्याची तुलना कवयित्री नदीसोबत करते. युगानुयुगापासून स्त्रीची घुसमट या कवितेत व्यक्त केली आहे. स्त्रीच्या अंतरंगी पेटणारा वणवा कवयित्रीने व्यक्त केला आहे. 

तिचा ठाव या कवितेत कवयित्री लिहीते,

हर एक डाव उमटवून जातो

पराभवाचा घाव

हरवून टाकतो तिच नाव

तिचा गाव

काळाच्या भल्या मोठ्या

पटलावर तिला कधीच

गवसत नाही तिचा ठाव

(पृ.९)

स्त्री जीवनातील वास्तव चित्रण नाकारता येत नाही. हेच मूल्यमापन प्रभावीपणे रेखाटले आहे. स्वत:च्या अस्तित्वाची जाण आणि भान या कवितेतून रेखाटले आहे.

जोतिबा तूच विसरून जा

तूझ्या आसुडाला

इथ प्रत्येक हात

पक्षापाताने शक्तीपात झालेला

आणि अखेरची घरघर

हरेक श्वासाला

(पृ.१५)

स्त्री पुरूष समानता यामध्ये प्रखरतेने मांडली आहे. नीतीमूल्य प्रत्यक्ष जीवनात जगले जात नाही. हे भयानक वास्तव कवयित्रीने मांडले आहे.

ती चालवते तलवार

स्वत:वर अगदी

सफाईने

जीव जात नाही

पण वेदना मात्र

धारदार


तिच्या या हट्टापुढे

हतबल

उगवणारा प्रत्येक सुर्य

(पृ.१७)

स्त्री स्वत: तिच्या आयुष्याची शिल्पकार आहे. ती सतत घडत असते. स्वत:ला घडवत असते. तिच्या यातना तिच्या वेदना तिचा संघर्ष हा तिच्याच कर्माचा परिपाक ठरत असतो. असे पारदर्शक चित्रण कवयित्रीने केले आहे. घोषणा ही कविता देखील उत्तम आशयसंपन्नता देणारी आहे.

मी थकलोय घोषणा देऊन

मी थकलोय पालखी वाहून

मी थकलोय खोटे जाहिरनामे वाचून

मी थकलोय मिरवणूकीत नाचनाचून

(पृ.२३)

मानवी स्वभाव प्रवृत्तीचे दर्शन या कवितेमध्ये आहे. 

स्वीकार ही कविता मानवी मूल्यांचे उच्च शिखर गाठणारी आहे.

माथ्यावर प्रचंड ओझं

घेऊन ते चालत आहेत

मोठ्या हौसेने

चुकीच्या दिशेने

ते हसतात, गातात

उगवतीच्या आशेने

न उगवणारा सुर्य

ठाऊक असूनही

(पृ.२९)

कुठलीही तक्रार न करता अज्ञान आणि अंधश्रध्देच्या गुलामीत जीवन जगणारे लोक कवयित्रीने या कवितेत रेखाटले आहे. 

नाही दूर भिरकावून टाकता येत

ती जीर्ण लक्तरे

नाही गिरवता येत

कुठलीच लिपी

आपल्याच बोटांवर

ठेवून त्यांची बोटं!

(पृ.३१)

वरील ओळीतून कवयित्रीची प्रगल्भ विचारक्षमता अधोरेखित होते. परंपरागत आणि सनातनी विचारांच्या श्रृंखला तोडत मुक्तपणे श्वास घेणारी मुक्तपणे संचार करणारी स्वतंत्र कविता शेली ही गुणविशेषता या संग्रहाची आहे. 

तरारत जाते वेदनेची लहर

रक्तातल्या प्रत्येक थेंबाव

काळीज कवीचे

चिरतरूण यातनेचे

माहेरघर

(पृ.३६)

कवीमनाला अगदी समर्पक उपमा कवयित्रीने दिली आहे. 

न रोखले हे विषाक्त वारे

आज अजूनही

तूच जाशील गुदमरूनी

ऊठ पृथे नको पाहूस

आता मागे वळूनी

(पृ.५३)

पृथ्वीसारखी सहनशील असणारी स्त्री गुलामीचे विषाक्त वारे रोखू शकत नाही. तो आत्मविश्वास या कवितेतून पेरण्याचे काम कवयित्री करत आहे. सर्वच कविता स्त्री जीवनाला अधोरेखित करणार्या आहेत.

धिक्कारून सारे

तेच स्वीकारले

त्याने असे आवळले पाश

गुदमरला ज्ञानाचा प्रकाश

जाळा हजारो स्मृती

त्याला फिकीर नाही

आता घरोघरी फक्त 

मनूच जन्मास येतात

(पृ.६८)

डॅा. स्मिता पाटील यांची कविता नदीसारखी मुकृतपणे वाहत राहते. समतेच्या मुल्यांचा आग्रह करतांना परंपरा नाकारून समतावादी नवी व्यवस्था अधोरेखित करते म्हणून ही कविता महत्वाची आहे. असे मत डॅा. महेंद्र कदम यांनी मांडले आहे.

समिधा, गंमतगाणी हे काव्यसंग्रह आणि शोध सुखाचा हा ललितलेखसंग्रह ही तीन पुस्तके कवयित्रीची प्रकाशित आहेत. अनेक पुरस्कार प्राप्त कवयित्री आहेत.

पुसृतकाचे नाव

नाही गिरवता येत कुठलीच लिपी

कवितासंग्रह

कवयित्री डॅा. सौ. स्मिता पाटील

9860932270

ग्रंथाली प्रकाशन

मूल्य १५०₹

पृ.१०२

समिक्षण

प्रज्ञा हंसराज बागुल

कसारा ठाणे

8080453480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू