पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हॅपी मदर्स डे

*हॅप्पी मदर्स डे*


*आज जागतिक मदर्स डे*... आईची आठवण काढण्याचा दिवस.. आईच्या आठवणीचा  एकच दिवस कसा असू शकतो ना.. आई हे असं दैवत आहे ज्याला कुठल्या डे ची गरज नसावी... पण तरीही मदर्स डे हा भारतातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.. आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.. 


*स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे उगाच म्हणत नाही... आई ही मुलाचा पहिला गुरू असते... आई मुलासाठी सर्वस्व असते.. आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी *मदर्स डे* साजरा केला जातो... 


*आई माझा गुरू, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी... आई ही अशीच असते... मुलांवर चांगले संस्कार करणारी.. सर्व सुख जरी आपल्या पुढ्यात उभी असली तरी पाठीवर फिरणारा आईचा हात त्या सौख्याची पुर्तता करतो... *आई ह्या शब्दाची फोड करतांना आपण आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर असाच अर्थ आपण काढतो ना*...


*आई म्हणजे मूल उदरात असल्यापासून ते जीवात जीव असेपर्यंत आपल्या मुलांवर अपार प्रेम करणारी दैवी कलाकृती म्हणजे आई होय.. *समुद्राची शाई जरी केली तरी आईची महती लिहून पूर्ण होत नाही... आईचे प्रेमाचे ऋण कधीच फेडता येणार नाही.. सर्व मातांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे *मदर्स डे*.. त्याचे महत्त्व काय हे जाणून घेऊया...


*मदर्स डे* साजरा करण्याची सुरूवात मूळात अमेरिकेत झाली.. अमेरिकेतील सामाजिक कार्यकर्त्या एना  जार्व्हिस यांचे आपल्या आईवर नितांत प्रेम होते... आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी या दिवसाची सुरुवात केल्याचे सांगितले आहे... ९मे १९१४ रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा संमत करून घेतला.. या कायद्यानुसार मे महिन्याचा दुसरा रविवार मदर्स डे म्हणून साजरा करण्यात येवू लागला... भारतामधेही  मदर्स डे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो..


*दु:खाचा डोंगर कोसळला*

*सुखाचा वर्षाव हा झाला*

*लुकलुकणारे तारे बघता*

*आई तुझा आठव आला*.. 


आई असतांनाच तीची किंमत करा.. तिला त्रास होणार नाही असे वागा.. 

म्हणजे ती गेल्यानंतरही तुम्हाला एक आत्मिक समाधान लाभेल कि आपण आपल्या आईचा आत्मा दुखावला नाही.. मग तुम्ही *मदर्स डे* साजरा केला तरी हरकत नाही... 


सौ. अलका माईणकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू