पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई माझे यशोधन

आई माझे यशोधन


किती हार पुष्पगुच्छ
किती स्विकारु सन्मान
आई तुझ्या आशिर्वादे
झालं जीवनाचं गाणं॥धृ॥


गाण्या वाचून जीवन
नाही याचं आलं भान
आई तुझे हे संस्कार
आलं त्यातून हे ज्ञान॥१॥


झाले यशस्वी हे यश
तुझ्या आशिषाचे धन
केले तुझियाच नावे
आई माझे यशोधन॥२॥


माझ्या यशाचं ग गाणं
सार्या ऐकलं जगानं
कुणी केलासे सन्मान
कुणा वाटे अभिमान॥३॥


पण ऐकवू कसं ग
आई तुला माझं गाणं
माझ्या यशाचं हे गाणं
आई माझे यशोधन॥४॥


*--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू