पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई थोर तुझे उपकार.

                          " प्रेमा स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई " माधव जुलियन यांची लिहिलेली व  लता मंगेशकर यांनी मधुर स्वरात गायलेली, हृदय स्पर्शी, प्रत्येकाच्या डोळ्यात आसवे आणणारी  कविता, सर्वांच्या स्मरणात असेलच. "आई प्रेमाचे मूर्तिमंत स्वरूप आहे, वात्सल्याचा सागर आहे . " जगातील  सर्व श्रेष्ठ, आदर्श, ममतामयी, स्त्री  म्हटलं कि मानस चक्ष्यू समोर  आईचे रूप असते. प्रत्येकाला  आपली आई म्हंटले की विश्वात ती एक मात्र असते, तिच्यासारखे  दुसरे कोणी असूच शकत  नाही . हेच जाणवत असते.
"माझी आई संपूर्ण जगात सर्वांत चांगली. तत् सम इस धरतीपर दुजा न कोई." माझी पण आई अशीच आहे,
 सर्वात प्रेमळ, सर्वश्रेष्ठ,तिच्या तुलनेत या अवनीवर कुणीच नाही.
                              जन्म घेतल्यावर बाळाला बोलता येत नसते, पण आईला, त्याला केव्हा भूक लागली, केव्हा झोप येते आहे, केव्हा त्याची तब्येत बरी नाही, हे सर्व न सांगताच कळत असते. का बरं ? कारण तिचं
 आपल्या बाळाकडे इतके बारीक लक्ष असतं, तिचं  अंतर्मन त्याच्या हालचाली च सूक्ष्म आलेखन करीत असत  आणि  ती  त्याच्यातच  समावलेली  असते. नर्सरीतील रोपे बागवान जशी जोपासत मोठी करीत असतो  तशी आई बाळाला वाढवत असते. तिला त्यात काहीं ही अवरोध आले ती त्यांना बाजूला सारून खूप आनंदाने त्याचे संगोपन करीत असते व त्याची प्रगती
 बघून प्रफुल्लित होत असते. तिचे संपूर्ण विश्व तो मोठा होई  पर्यंत, आपल्या  बाळातचं  समावलेले  असते
            
                   ती बाळाला चालावयाला बोलावयाला शिकवते, त्याला चांगले संस्कार देते आणि परिपक्वता देऊन चांगला माणूस घडविते. माझ्या आईने पण मला घडविले. खूप कष्ट घेऊन आम्हा भावंडांना मोठे  केले आणि चांगले  संस्कार  दिले.
            
                        मला आठवते तिच्या शिकवण्याची पद्धत. त्या पद्धतीने जर शिकवले, किंवा ती पद्धत जाने आत्मसात केली त्याला बी एड करण्याची आवश्यकता पडणार नाही. पाचवी पर्यंत आम्हा चार ही भावंडांना तिनेच घरी शिकविले त्यासोबत हे ही शिक्षण दिले  की प्रत्येक   विषयाचा अभ्यास कसा करावा आणि त्याची पुनरावृत्ती कशी करावी. त्यामुळेच पाचवी नंतर आम्ही  कुणाच्या मदती शिवाय अभ्यास करू लागलो. प्रत्येक विषयाची पुनरावृत्ती करून  परीक्षा देऊ लागलो आणि उत्तम मार्काने पास   होऊ लागलो.                       तिची गणित शिकवण्याची पद्धत इतकी प्रभावित करीत असे की कुणालाही गणिताची गोडी लागेल. म्हणूनच आम्ही सर्व भावंडांनी  गणित विषय घेऊन पुढचे शिक्षण घेतले. मी केंद्रीय विद्यालयात गणेत शिक्षक म्हणूनच जॉब मध्ये लागले,

                              ही त्या वेळची हकीकत आहे, माझे लग्न झाले होते आणि  माझा एक मुलगा  दुसरीत शिकत असे, दुसरी मुलगी नर्सरी मध्ये होती. मी अतिशय आजारी झाले. पहिले दहा बारा दिवस डॉक्टर चे औषध घरी च चालले होते. फरक पडे  ना म्हणून  हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. पंधरा दिवस मला दवाखान्यात राहावे लागले मी पूर्ण पणे अंथरूणावर  खिळाले  होते.
 त्यावेळेस माझ्या आईने च  माझ्या मुलांना सांभाळून, माझी सुश्रुषा करून, मला उभे केले.घरची सर्व कामे आटोपून ती १० ते सायंकाळ ५ पर्यंत माझ्या जवळ दवाखान्यात असे. माझं जेवण, वेणीफणी सर्व करून देई. माझे मिस्टर आले कि मग ती घरी जाई. घरची सर्व कामे आटोपून रात्री साडेआठ पर्यंत परत माझ्याजवळ झोपावयाला दवाखान्यात येत असे.पहाटे लवकर उठून सहा वाजेपर्यंत, माझे मिस्टर आल्यावर ती घरी जात असे. अतिशय धावपळ करून उतरत्या वयात तिने मला आजारातून बाहेर काढले. पंधरा दिवसांनी मला डिस्चार्ज मिळाला व मी घरी आले.पण अतिशय अशक्तपणा असल्यामुळे ती मला आपल्या घरी घेऊन गेली. तिथे ही  तिने  माझी सेवा सुश्रुषा केली. मी पूर्णपणे बरे झाले आणि माझा संसार सांभाळला.


                            जरी डॉक्टरच्या औषधाने आपण बरे होतो, तरी  शुश्रूषा  करणारा जर व्यवस्थित रुग्णाला सांभाळणार नाही वेळेवर जेवणखाण, औषध देणार नाही आणि रुग्णाची काळजी घेणार नाही तर सर्व व्यर्थ
असते. मी बरे झाले याचे श्रेय मी आईला च देते. ( अर्थात डॉक्टरांचे औषध आणि मिस्टर आलेच.) माझे स्वास्थ्य त्यावेळेस अत्यंत नाजूक होते. तिने अत्यंत जिव्हाळ्याने आणि अतिशय कष्टाने माझी सुशृषा करून मला आजारातून बाहेर काढले. कधी कधी विचार येतो
" तिने मला  जन्म  तर  दिलाच, पण माझ्या कुटुंबाला सांभाळून,मला  मोठया दुखण्यातून वाचवून जीवनदान पण दिले आहे. " मी कधीच त्यामधून उतराई होऊ शकणार नाही. "आई थोर तुझे उपकार".                

            अलका पुणतांबेकर 
.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू