झाड लावा , झाड जगवा .....
*~झाड लावा , झाड जगवा !*~
आज परसात माझ्या
मी , झाड एक लाविले
जगविन, वाढविन मी तयास
वचन त्यास मी दिले ॥१॥
ऊनवारा - वादळ
वा असो अतिवृष्टी , तरि
जोपाशिन त्यास मी खतपाणी , आडोसा देऊनि॥२॥
होईल डेरेदार वृक्ष तयाचा
येईल बहरून हिरव्या पर्णांनी
शितल छायेत विसावतिल
पांथस्थ
शमविण्या जिवाची काहिली ॥३॥
चिमणी, कावळा,भारद्वाज,
कोकीळ
विहंग कितीतरी घेतिल आश्रय
पारावर जमतिल ग्रामस्थ निवांत तरुतळी कपिला करतिल रवंथ ॥४॥
मधुर , रसाळ फळे गोमटी शमवतिल तृष्णा न् क्षुधा सर्वांची
खुशाल खावी फळे कुणीही
मात्र रूजवुनी बी वाढवावा वृक्ष असाच त्यातुनी ॥५॥
अशिच झाडे जर वाढतिल सर्वत्र
पर्यावरण मग येइल बहरून
कशास कमी पडेल प्राणवायु
कुणाला
येऊनि मेघराजहि जातिल
बरसुन ॥६॥
प्राणवायुसाठी गेले जिव कित्येक
संपले जिवन कुणाचे पाण्यासाठी तडफडुन
टळेल नामुष्की , टळेल संकट पुढच्या पिढीचे
लावुन जगवाल असेच झाड एक एक ॥७॥
........ प्रदिप राजे
रोहा
o ५ / ०६ / २ ० २ २