पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अस्तित्व

*आठवांचा पाझर*

मी अजूनही तुझ्याच आठवात दंगतो

बेजार , प्रीतभावनांनाही  कुरवाळीतो...


मिटलेल्या  पापणीतही अस्तित्व तुझे

तरीही , साऱ्या चराचरी तुला शोधितो...


गुलाब ,जाईजुई ,बकुळ ,मोगरा चाफा

तुझ्याच स्मृतीतुनी ,अजूनही दरवळतो...


सृष्टीत साऱ्या हिरवळलेले चैतन्य तुझे

पाहता , भावनांचा बहार उमाळून येतो...


निर्झर ,तुझ्या अवखळ ओल्या स्मृतींचा

या माझ्या भाबड्या अंतरातुनी पाझरतो...


आज सामोरी झाकोळलेले हे नभांगण

तरीही , मी तुझ्याच आठवासंगे जगतो...

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

*रचना क्र. १७ / ७ - ६ - २०२२*

*©️ वि.ग.सातपुते ( भावकवी )*

*???? ( 9766544908 )*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू