पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

घनमेघ

*घनमेघ*

********

बरसत , बरसत ये रे घना

चिंब चिंब भिजव रे मना

आसक्त ,अधीर प्रीतभाव

बरसत , बरसत ये रे घना


सांग कसे , मीच रे सावरुं

हे निळ्या सावळ्या घना

तुझ्यात रे स्पर्षतो सावळा

बरसत , बरसत ये रे घना


हेच गगन , हीच वसुंधरा

उताविळ , मिलना रे घना

तूच रे , चैतन्य या सृष्टिचे

ये सजवित ब्रह्मांडा रे घना

*********************

*रचना क्र. १४८ / ७ - ६ - २०२२*

*©️ वि.ग.सातपुते ( भावकवी )*

*???? ( 9766544908 )*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू