पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वेडी आशा

*वेडी आशा*

***********

रात्र काजळी काळोखाची

मी अव्याहत चालतो आहे


रात्रीच्याच किर्र रंगमहाली

मीच प्रकाशा शोधित आहे


बंद लोचनी , नक्षत्र चांदणे

मी , अलवार वेचितो आहे


अधिर ही , व्याकुळ स्पंदने

शब्दातुनी मी गुंफितो आहे


आसमंत हे सारेच भारलेले

सर्वत्र तुझेच प्रतिबिंब आहे


हा जीवही तुझ्याच प्रतिक्षेत

बघ अजुनही थांबलेला आहे


जे जे घडले , ते ते घडून गेले

तरी , वेडी आशा जागते आहे

**********************

*रचना क्र . १४९ / ९ - ६ - २०२२*

*©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*

*????( 9766544908)*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू