पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शल्य

                                  शल्य

अलका पुणतांबेकर

वडोदरा गुजरात।


        नीरजा किचनमध्ये स्वयंपाकात व्यस्त  होती . नितीन हळूच किचन मध्ये आला. त्याच्या हातात फोटो होता . नितीन  म्हणाला आई बघ ना मी काय आणले आहे." काय बाळा " नीरजा  म्हणाली  "बघू , "तिने  उत्सुकतेने नितीन च्या हातून फोटो घेतला आणि न्याहाळू लागली. सहजच उद्गार निघाले, " "सुंदर!! हीच का तुझी तनाया, एकदम पसंत आहे ''. नितीन म्हणाला " हो, आई!! तुला आवडली का तनया? "  " हो बाळा, खरंच चांगली आहे मुलगी. तिला भेटावयाला घेऊन ये घरी. आज बाबा ऑफिसमधून आले की मी बोलते त्यांच्याशी. " नीरजा म्हणाली. नितीन ला एकदम हायसे झाले. कित्येक दिवसापासून तो आपल्या मनाची तयारी करीत होता पण आज धैर्याने साथ दिला आणि आईला आज तनयाचा फोटो दाखवून झाला . निश्चिंत मनाने तो ऑफिसला निघून गेला.
                      नीरजाने निश्चय केला नितीन च लग्न तनयाशीच व्हायला हवं. नाही तर? हा विचार तिच्या मनात आला आणि  ती  भूतकाळाच्या  आगोशात  गेली.
                      ती अठरा वर्षाची, सेकंड इयर ला होती.
 तिच्या  आजीने  नयनचे  स्थळ  तिच्या करता, नीरजाच्या  वडिलांना सुचविले. नयनची  आजी  व नीरजाची आजी  मैत्रिणी होत्या. नीरजाच्या आजीला तिच्या  मैत्रिणीने  नयन  करता  मागणी घातली होती. स्थळ छानच होते,  मोठा वाडा होता त्यांचा, चार-पाच भाडेकरू, समोर दुकाने. नयन पण चांगला शिकलेला व क्लास वन ऑफिसर होता. नीरज्याच्या बाबांना तिचं लग्न इतक्या लहान वयात करायचं नव्हत .तिला त्यांना एम.एस.सी. करवावयाचे होते.तसा त्यांनी वर पक्षाला निरोप धाडला. वरपक्षचे एम. एस.सी. पर्यंत थांबायला तयार  नव्हते. नीरजा  ला पण एम.एस. सी. करायचे होते. सध्या लग्नाचा विचार सुद्धा करावयचा नव्हता. पण ती कांहीच बोलू शकले नाही. ती फार संवेदनशील होती. तिला वाटत होते बाबांना कांहीही  त्रास व्हायला नको.
                        वर पक्षाकडून निरोप आला,' लग्न आत्ताच  करू  या, पण  नीरजा  फायनल  इयर साठी    माहेऱीच राहील. बी.एस.सी. झाल्यावर आम्ही तिला एम.एस.सी.कारवू.' तेव्हा नीरजाच्या वडिलांनी मनावर घेतले. निरीजाची सेकंड इयरची परीक्षा झाली  आणि निर्जन यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या.
                      दोन्ही परिवार एकमेकांच्या परिचयाचे होते. सर्वांना खात्री होती की नीरजा चा  संसार छान  सुखी  होणार. सर्व म्हणत, मुलीनं  भाग्य  काढलं . लग्नासाठी नितीनने  पंधरा  दिवस  सुट्टी  घेतली  होती. सुट्टी संपल्यावर  दोघेही  नाशिक हुन  पुण्याला आले. नीरजा चे सासर पुण्याचे आणि नयन जॉब ला पुण्यात होता.
              पुण्याला आल्यावर  नयने  आपला भूतकाळात नीरजला कथन केला. त्याने सांगितले की तो एका मुलीवर प्रेम करत होता. ती नाशिकलाच असते. त्याच्या घरच्यांना हा संबंध पसंत नसल्याने त्याच्यावर दबाव आणून त्यांनी त्याला नीरजा शी लग्न करावयाला भाग पाडले आहे. घरच्यांना संशय येऊ नये म्हणून तो तिच्याशी  प्रेमाचे नाटक करणार होता. पण तिला  दिलेले वचन पाळणार आणि तिला त्रास होऊ देणार नाही असे तिला म्हणाला . त्याने  त्या मुलीची नयन ला  लिहिलेली  पत्रे  पण  नीरज  ला  दाखवलीत. खरे तर ती पत्रे  त्याने लग्ना आधीच नष्ट करायला हवी होती पण तसे त्यांनी  केले नव्हते . हे  सर्व  जाणून   नीरजा ला  त्यासमोर अंधारी आली. तिला उंच शिखरावरून खाली कोसळल्या सारखे झाले . तिचे भविष्य अंधारात समावले होते. आई-वडिलांना कळले तर त्यांची काय अवस्था होईल याची तिला खंत वाटत होती. नियतीने तिच्याबरोबर क्रूर खेळ खेळला होता. ही तर फसवणूक आहे. त्याने लग्नाआधी हे सर्व सांगितले असते, फक्त तिला,तरी लग्न झाले नसते. पण आता पुढे काय? निर्जला प्रश्न पडला.

                   नयन ने तिला आश्वासन दिले, " काहीही झाले तरी मी तुला त्रास देणार नाही. आणि दिलेले वचन पूर्ण करणार. " तिने  धैर्याने घेतले. वयाने लहान होती पण समजदार आणि हुशार होती. नयन ला काही व्यसन नव्हते ही एक जमेची बाजू होती. तिने सर्व प्रेम पत्र जाळून टाकलीत. हे तिने नयनला सांगितले  पण ह्यावर  त्याची काही प्रतिक्रिया नव्हती.तिला थोडा धीर आला.

              नीरजा  च्या कॉलेज च्या सुट्ट्या संपल्या व ती आपल्या वडिलांच्या घरी नागपूरला आली. कॉलेज चा अभ्यास सुरू झाला. यावर्षी फायनल इयर चे वर्ष होते.तिला आई-वडिलांपासून सर्व घडलेल्या गोष्टी  लपण्याचा सारखा त्रास होत होता. मनात कालवा-कालव चालली होती. अभ्यासात लक्ष लागत नव्हते. तिने  खूप धैर्य  करून  आई-वडिलांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. वर पक्षाने स्वतः मागणी घातली होती. ही तर निव्वळ फसवणूक झाली. नयन  च्या कुटुंबाची सर्व  माहिती असताना हे प्रेम प्रकरण कसे कळले नाही, याचे त्यांना आश्चर्य वाटत होते . नीरजा ची त्यांना काळजी वाटत होती. त्यांनी तिला तळहातावरील फोडाप्रमाणे वाढविले होते. ती त्यांची खुप लाडकी होती.   तिच्यावर हा प्रसंग आला त्यामुळे ते हतबल झाले होते. नीरजा च्या आईच्या  डोळ्याचे  तर पाणी  थांबतच नव्हते. तिला अपराध्या  सारखे वाटत होते, का तिने इतक्या लहान वयात तिचे लग्न केले  .नीरजा च्या आजीला  हे सर्व कळले, ती तिची मैत्रिण, नयन च्या आजीला नाही नाही ते  बोलली. दोष दिला. पण आता काय उपयोग" जब चीडिया चुग गायी खेत ".

 नीरजा च्या आई  वडिलांनी आपल्याला  सावरले.  बराच विचार केल्यावर तिच्या वडिलांनी निर्णय घेतला. ते म्हणाले   "नीरजा जर  तुझी इच्छा  असेल तर आपण डिव्होर्स  घेऊया."

             नीरजला निर्णय घ्यावयाचा होता. तिने विचार केला  डिव्होर्स  घेतला  तर  लग्न  परत  करण्याच आलच.तिला आता परत लग्न करायचं नव्हतं. तेव्हा नयन बरोबरच आयुष्य काढण्याचा निर्णय तिने घेतला.फायनल ईयर ची परीक्षा झाली आणि ती नयन कडे पुण्यास आली.

                त्यांचे संसारिक जीवन दोन समान अंतर रेखे प्रमाणे प्रारंभ झाले. नयन दिवसभर ऑफिसच्या कामात व मित्रांबरोबर गुंफलेला असे. नीरजा चा रिझल्ट आला. ती पास झाली होती आता तिला एम.एस.सी ला ऍडमिशन घ्यायचे होते. दिवसभर घरात एकटे राहून ती कंटाळून जात असे. नयनाला  ती सांगू शकली नाही.  तो   घरात  असला की  चिडचिड करत  असे, लहान लहान  गोष्टी वर  संतापत असे. त्याच्या अशा स्वभावामुळे  एम.एस.सी.च्या  ऍडमिशन  करता तीला, त्याला सांगण्याचे धाडस झाले नाही . तिने आपल्याला भरत काम, विणकाम, आणि तिला ड्रॉइंगच्या आवड होती,त्यात तिने आपल्याला गुंतविले. तिच्या पण आता मैत्रिणी झाल्या होत्या. ती आता मैत्रिणींबरोबर रमली होती

            दिवस,महिने सरू लागले. स्मृतीपटलावरील स्मृती अस्पष्ट  होऊ लागल्या. काळ, भूतकाळ विसरण्याचे एक औषध आहे. त्याने आपले काम केले होते. नयन  आणि  नीरजा  जवळ  येऊ  लागले. त्यांच्यात  मैत्री  निर्माण  होऊ  लागली. एकमेकांशी ते गप्पा मारु लागले.  फिरायला जाणे, सिनेमा बघणे एकमेकां बरोबर वेळ घालवायला लागले, एन्जोय करू लागले. नयन, नीरजा च्या प्रेमात कधी पडला हे त्याचेच त्याला कळलं नाही. गाडी रुळावर आली होती.नीरजा आनंदली होती. पण एम.एस. सी.करायचे तिचे स्वप्न राहून गेले आणि पदरात आईची डिग्री पडली.

             नितीन चा जन्म झाला.   आता तिचे जीवन पूर्णपणे   नितीन मय झाले होते. तिचे विश्व नितीन  मध्ये समावले होते. तिने नितीन ला चांगले संस्कार दिले. सर्वांच्या आवडी-निवडी जपल्या. कुणाला काहीही कमी पडू दिले नाही. घराला मंदिराचे स्वरूप आले होते. नितीन हुशार होता. तो आता  सॉफ्टवेअर इंजिनियर होऊन एका कंपनीत जॉब ला होता.

                    सर्व सुरळीत चालले असताना मधून मधून भूतकाळ डोकं वर काढून डोकावत असे. बरेच वेळा नयन रूम मध्ये अंधार करून एकटाच बसला राही, डोळे मिटुन, विमानस्क असल्या सारखा. नीरजला वाटायचं हा जुन्या आठवणीत  गुंगतला  असणार. ती रूम मध्ये लाईट लावत असे. नयन म्हणायचा "रुमचा लाईट बंद करा,मला डोळे मिटून बसून राहू दे." नीरजा आपुलकीने त्याच्याजवळ जाऊन बसत असे.त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात करायची. पण तो नुसता हं, हुं करून तिला टाळत असे. जर तिने आणखीन प्रयत्न केला तर तिला जोराने ओरडून रूमच्या बाहेर काढीत   असे. नीरच्या च्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागत. कधी कधी कांही कारण नसताना तिला रागवायचा, संतापायचा, चिडचिड करायचा, थोडं शांत झाला की तिला माफी पण मागत असे. ती विचार करायची  पण हे सर्व का? का करतो हा असा? माझे आणि नयन चे संबंध एका सर्व साधारण नवरा-बायको सारखे नाहीत. आमच्या दोघांच्या संबंधात एक शल्य आहे. आणि तेच मला टोचत आहे.

                      नवरा बायको म्हटले तर वाद-विवाद  होणारच. हे  असे वाद विवाद एकमेकांना आणखीन जवळ आणतात. त्यांच्यातले प्रेम वाढते. दोन शिकलेली माणसं असली की त्यांच्या विचारात मतभेद असणारच. हे स्वाभाविक आहे. पण नीरजा आणि नयन  यांचे वाद विवाद नाही, तंटे होत असत. नीरजा खूप संवेदनशील मुलगी असल्याने तिला  सळो की पळो होई. तिचं हृदय तार   तार  होई पण  देवाने  तिच्यात सहनशीलता काठोकाठ   भरली   होती. तिच्या  धैर्याने   व समजुतदारपणा ने हे नाते टिकून होते. नाही तर? तिच्या मनात अनेक विचार येई.  आमच्या संसारात हे शल्य निर्माण झाले यात चूक कोणाची? नियतीची  किंवा शल्यशी  निगडीत व्यक्तींची? तेवढ्यात दाराची बेल वाजली, तिच्या विचारांची श्रुंखला तुटली.

                       नीरजा ने दार उघडले,बघते तो नयन दारात उभा. नयना  आत आला. नीरजा ने विचारले, "नयन  तुमची तब्येत बरी नाही का? आज इतक्या लवकर  कसे  काय आलात ऑफिस  मधून ? " नयनने स्पष्टीकरण दिले.त्याला चार वाजता टूर  वर जावयाचे आहे. दोन दिवससांचा टूर आहे.तयारी करावी लागेल म्हणून तो लवकर आला होता. तो सोफ्यावर टेकला, नीरजा पण त्याच्या बाजूला बसली. नीरजा  ने त्याला सांगितले एक गोड बातमी आहे. तिने नयन ला तनया चा फोटो दाखविला. आणि सांगितले की " ही आपल्या नितीन ची आवड आहे."

                नयने फोटो घेतला आणि बघून म्हणाला ,     " वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले आहे पोराने. नाही का? नीरजा, मुलाची   पसंती ती  माझी नाही आपली पसंती.  हो ना  ? " नीरच्या म्हणाली  "अगदी खरं नयन, तुझ्या आई-वडिलांनी जी  चूक केली ती  आपण परत  करायला  नको." नयन म्हणाला, "अगदी खरं! नीरजा, तो काळ वेगळा होता, तू मला समजून घेतलंस. पण आता? आता नाही हो तुझ्या सारखी मुलगी सापडणार." आणि हसू लागला.

                नीरजा आणि  नयन सुनेच्या  आगमनाची स्वप्ने रंगवू  लागले. नीरजा आनंदली होती . त्यांच्या संसारात जे शल्य निर्माण झाले होते, त्यांना टोचत होते,  तो  वारसा  पुढच्या पिढिला  ते  देणार  नव्हते.

              अलका पुणतांबेकर.                                                  बडोदरा,  गुजरात.

         


                     


       




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू