पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संगमी सांगता

*संगमी सांगता*

**************

शांत , शीतल गर्द किनारा

संथ लहरी प्रवाही सरिता 


खळाळते प्रतिबिंब नभाचे

मनी उचंबळते प्रीतसरिता


आठवांची , झालर झुलते

थकली जरी ही गात्रे आता


अंतरी , स्मृतींची गंगायमुना

अखंड वाहते पावन सरिता


निर्मोही भावनांची भावगंगा

जागविते , हॄदयी भावगीता


भावप्रीतीचे , सरोवर सुंदर

मिलना , आतुरलेली सरिता


तृप्ततेचा साक्षात्कार लाघवी

सागरसरिता , संगमी सांगता

**********************

*रचना क्र. १५० / ११ - ६ - २०२२*

*©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*

*???? ( 9766544908 )*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू