पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वीर सावरकरांची ऐतिहासिक उडी

.........वीर सावरकरांची ऐतिहासिक

           समुद्र उडी.....

 

8 जुलै 1910.... याच दिवशी सावरकरांनी अथांग समुद्रात घेतलेली उडी त्रिखंडात गाजली.भारतात आणि भारताबाहेर देखील अनेक क्रांतिकारकांना त्यामुळे प्रेरणा मिळाली.

सावरकर म्हणजे स्वातंत्र्याचे धगधगते अग्निकुंड !!!

सावरकर म्हणजे मातृभूमीसाठी अर्पण केलेले जीवन...!!

 

 दिवस होता रविवार,13 मार्च 1910

 

  वीर सावरकरांना ब्रिटीश सरकारने राजद्रोहाच्या आरोपाखाली लंडनच्या पोलिसांकरवी व्हीक्टोरिया रेल्वे स्टेशनवर अटक केली.

भारतात गणेश राव सावरकर यांनी 1909 च्या मार्ले मिंटो सुधारणा विरुद्ध सशस्त्र बंड पुकारले होते. भारतीय इंपिरियल पोलिसांनी सावरकरांना गुन्ह्याचा कट रचल्याचा आरोप करून तपासामध्ये  गोवले आणि लंडन मध्ये अटक झाली .

सावरकरांना याची कुणकुण आधीच लागली होती.त्यावेळी ते फ्रान्स ला मॅडम कामा यांच्याकडे गेले होते परंतु पुन्हा ते इंग्लंड आले. त्या वेळी मात्र त्यांना अटक झाली.

सावरकरांचा कायद्याचा अभ्यास खूप दांडगा होता. आंतरराष्ट्रीय कायदे,त्या मधील बारकावे, त्रुटी या सर्वांचे ज्ञान त्यांना होते... नाशिक मधील भगूर सारख्या छोट्या गावात जन्मलेले व लहानपणापासून अतिशय ज्ञानी,हुशार असलेले सावरकरांनी खूप कमी वयात हे ज्ञान प्राप्त केले.

 

त्यांच्यावर अनंत कान्हेरे या  क्रांतिकारकाला सावरकरांनी चतुर्भुज अमीन यांच्याकरवे नाशिकचा कलेक्टर जॅक्सन त्याच्या हत्येसाठी ब्राऊनिंग पिस्तूल पुरविल्याचा संशय होता. 

 

 न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा खटला भारतात चालवण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार इंग्रजांनी सावरकरांना ‘ एस. एस मोरिया ' हया एका ब्रिटिश व्यापारी जहाजाने 1 जुलै 1910 रोजी भारताकडे रवाना केले.

 

सावरकरांना लंडनच्या ब्रिक्स्टन तुरुंगात ठेवण्यात आले होते, त्या काळात  त्यांच्या अनेक सहकाऱ्यांशी  भेटी झाल्या होत्या. या अटकेतून पळून जाण्यासाठी त्यांनी त्यांचा जवळचा सहकारी व्ही व्ही अय्यर यांच्यासोबत योजना आखली. सावरकरांना पळून जाणे सोपे व्हावे म्हणून अय्यर फ्रान्सच्या किनाऱ्यावर गाडी घेऊन थांबतील अशी त्यांची योजना होती.

सावरकरांबद्दल इंग्रजांना नेहमीच भीती वाटत होती कारण त्यांना हे माहित होते की,सावरकरांचा आपल्या मायदेशी परत जाण्याचा हा नेहमीचा मार्ग आहे आणि या मार्गात ते काही तरी योजना आखू शकतात,त्यामुळे इंग्रज सरकारने बोटीचा तिचा नेहमीचा मार्ग न घेता, बिस्केच्या उपसागरातून प्रवास करणार असल्याचे ठरले. मात्र, बोटीत काही बिघाड झाल्याने 'मार्सेलिसच्या 'बंदरातून मार्ग काढणे आवश्यक झाले.,

 

अखेरीस,  7 जुलै, 1910( रविवार ) 'एस एस मोरिया' बोट ही मार्सेलिस(फ्रान्स हया देशातील एक बंदर )च्या बंदरावर आली. मोरिया जहाजाला खोल समुद्रात नांगर टाकावे लागला कारण त्याचा आकार मोठा होता.त्यानुसार, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी सावरकरांचे फ्रेंच बंदरामार्गे भारताकडे प्रत्यार्पण करण्याबाबत फ्रान्सला माहिती दिली. मुंबईतील इन्स्पेक्टर पारकर आणि एक पोलीस हवालदार सी जे पवार आणि इतर अधिकारी सावरकरांवर बारीक नजर ठेवून होते. त्यांच्या अवतीभोवती कडक पहारा होता.कारण भारतीय स्वातंत्र्यसैनिक त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतात असा त्यांचा अंदाज होता.

 

त्यांना शौचाला जातांना सुद्धा दरवाजा आतून बंद करण्याची परवानगी नव्हती. सतत दोन पोलीस त्यांच्या वर लक्ष ठेवून असायचे.

त्यांना ठरवून दिलेल्या वेळेतच जहाजावर शौचाला व डेक वर फिरायला नेलं जायचं.

सावरकर बाहेरून जरी अतिशय शांत आणि संयमी दिसत असले , पण त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या विचारांच्या प्रचंड लाटा त्यांनाच माहीत होत्या. त्यांचा निर्धार पक्का होता त्यांनी बोटीतून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

 

बोटीतून समुद्रात उडी मारणे हे सोपे काम नव्हते परंतु खरे आव्हान होते ते समुद्रात उडी मारून सुरक्षित किनारा गाठणे!! ना पाण्याच्या खोलीची कल्पना,ना पाण्यातील जलचरांची भीती, ध्येय फक्त एक इंग्रजांच्या तावडीतून सुटून मातृभूमीसाठी प्राण देणे कारण एकदा की भारतात पोहचले की मग इंग्रज सरकार खूप कठोर शिक्षा करणार हे त्यांना माहित होते.नाशिकच्या गोदावरी नदी मध्ये बालवयात घेतलेले पोहण्याचे शिक्षण आणि क्षमता सावरकरांना या वेळी कामी आली.

 

समुद्रातून पाण्यात उडी मारण्याची आणि पलायन करण्याची योग्य वेळही त्यांनी ठरवली होती.

उडी मारल्यानंतर मृत्यूही होऊ शकतो हा विचारही त्यांच्या डोक्यात आला, तसेच त्यांनी हाही विचार केला की उडी मारल्यानंतर आणि पोहल्यानंतर, जर त्यांना फ्रान्सच्या किनाऱ्यावर मदत मिळाली नाही, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? कदाचित त्यांना इंग्रज पुन्हा ताब्यात घेतील आणि  छळ करतील !!

समुद्रात उडी मारण्यापूर्वी त्याचे मन प्रचंड विचारांशी झुंज देत होते आणि सर्व शक्यतांचा विचार करत होते.

 

८ जुलैच्या सकाळी, सावरकर एका असामान्य निश्चयाने जागे झाले. 

" मला शौचाला जायचे आहे ". सावरकर नम्रपणे म्हणाले.परंतु मनात सगळा डाव अगोदरच रचला गेला होता.

"अधिकारी यांना शौचाला घेऊन जा." इन्स्पेक्टर ने हुकूम सोडला..

या वेळी सावरकर दरवाजा आतून लावून घेण्यात यशस्वी झाले आणि अधिकाऱ्यांनी ही बाब थोडी सहज घेत हलगर्जीपणा केला आणि त्याचाच फायदा त्यांनी उठवला.

 

सुटकेचा ऐतिहासिक क्षण जवळ आला .सैनिकांनी प्रसाधनगृहाच्या दरवाजाबाहेर पहारा देत असताना, सावरकरांनी दरवाजा आतून बंद केला आणि काचेच्या खिडकीवर आपली बनियान झाकून ठेवली ज्यामुळे सैनिक सहजपणे आत पाहू शकत नव्हते .  टॉयलेटच्या वरच्या बाजूला एक पोर्टहोल होता.सावरकरांना आधीच खिडकीतून बाहेर पडता येईल की नाही याबद्दल शंका होती, म्हणून आदल्या दिवशी त्यांनी खिडकीच्या रुंदीचे मोजमाप करण्यासाठी आणि खिडकीतून जाता येईल का हे तपासण्यासाठी त्यांच्या "पवित्र धाग्याचा" - "जनेयू" चा वापर केला .  त्यांनी पोर्टहोलचे काचेचे दार उघडले आणि भारतमातेला आदरांजली अर्पण करून, सावरकरांनी धैर्याने अरुंद पोर्टहोल मधून त्यांचे शरीर बाहेर काढले आणि विशाल समुद्रात उडी मारली.

आणि हीच त्यांची ऐतिहासिक उडी ठरली.

 

पोर्टहोल मधून सुटण्याचा प्रयत्न करताना सावरकरांना अनेक जखमा झाल्या. समुद्राचे खारट पाणी त्याच्या जखमा अधिकच वेदनादायक आणि असह्य करत होत्या , पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. त्यांना फक्त इंग्रजांपासून स्वातंत्र्य हवे होते.

सावरकर पोर्टहोल मधून बाहेर पडत असताना रक्षकांच्या ते लक्षात आले आणि ते कमालीचे अस्वस्थ झाले. बोटीवर एकच गोंधळ उडाला. एवढी कडेकोट सुरक्षा असूनही, निश्चयी स्वातंत्र्यसैनिक सावरकर त्यातून निसटले कसे ???

 

इंग्रजांच्या जवानांनी पाण्यात पोहणाऱ्या सावरकरांवर गोळ्यांचा वर्षाव सुरू केला, सावरकरांना समजले की आता जलद गतीने पोहायला हवे,कारण सैनिकांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली होती, पण सुदैवाने यापैकी एकही गोळी त्यांना लागली नाही. 

सावरकरांनी आपला वेग वाढविला.

मोठ्या संघर्षानंतर सावरकरांनी अखेर मार्सिंलीस चा किनारा गाठला आणि समुद्र किनाऱ्याची ९ फूट उंच भिंत ओलांडण्याचा प्रयत्न सुरु केला , पहिल्या प्रयत्नात त्यांना यश आल नाही,दुसऱ्या प्रयत्नात मात्र ते यशस्वी झाले  आणि त्यांनी भिंतीच्या पलीकडे उडी मारली.

सावरकरांनी लहानपणीच क्रांतीची शपथ घेतली होती. एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाला किती शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो, हे जाणून त्यांनी नियमित व्यायाम करून त्यानुसार शरीर तयार केले होते. ते पोहण्याचा, भिंतींवर चढण्याचा आणि जंगलात उघड्यावर झोपण्याचा सराव करत असे.

 

आधी ठरल्याप्रमाणे सावरकरांच्या सुटकेसाठी अय्यर फ्रेंच भूमीवर आले होते. पण, सावरकरांना ते कुठेच दिसले नाही, म्हणून सावरकर

मार्सेलिसच्या रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत धावू लागले. विचार करा, एक ध्येयाने वेडे झालेले वीर पुरुष आपल्या देहाची,कपड्यांची फिकीर न करता फ्रेंच पोलिसांच्या ताब्यात जाण्यासाठी प्रयत्न करू लागले त्याच वेळी त्याची नजर एका फ्रेंच पोलिसावर पडली. सावरकर फ्रेंच पोलीस कर्मचाऱ्याकडे गेले आणि त्यांना जे काही थोडेसे फ्रेंच येत होते तितक्या भाषेत  त्याला म्हणाले ",

मला जवळच्या ठाण्यात  घेऊन

जा ".

 याच वेळी जहाजावरील ब्रिटीश पोलीस घटनास्थळी पोहोचले. ब्रिटिश पोलिसांनी फ्रेंच पोलिसांशी बोलणी करून आणि त्यांना थोडी लाच देऊन सावरकरांना पुन्हा अटक करून ताब्यात घेण्यात  यश मिळवले.

" फ्रान्स मध्ये आश्रय मिळणे हा फ्रान्स च्या घटनेने मान्य केलेला कायदेशीर अधिकार आहे हे त्यांना त्या वेळी ठाऊक होत आणि जर आपण फ्रान्स च्या भूमीवर उतरलो तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इंग्रज आपल्याला काही करू शकत नाही कारण आपण फ्रान्स मध्ये काही गुन्हा केलेला नाही " हे ही त्यांना ठाऊक होते.याचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता.आणि म्हणूनच ही ऐतिहासिक उडी होती.

 

इंग्रज अधिकाऱ्यांनी सावरकरांना पुन्हा बोटीवर पकडून आणले थोड्याच वेळात व्हीव्ही अय्यर आणि मॅडम कामा कारने तेथे पोहोचले, पण खूप उशीर झाला होता.

कडेकोट बंदोबस्तात सावरकर जहाजातून पळून गेल्याने ब्रिटीश पोलीस अधिकारी हैराण झाले होते.सावरकर आणि त्यांच्या भाषणातून अनेकांनी प्रेरणा घेतली, त्यामुळे सावरकरांच्या पलायनाची घटना प्रसिद्ध होईल आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ब्रिटीशांना उत्तरदायी बनवेल या विचाराने ब्रिटीश पोलिस घाबरले. हे ब्रिटिश साम्राज्याला नक्कीच लांच्छनास्पद ठरेल असे त्यांना कळून चुकले होते.

इंग्रज अधिकारी सावरकरांना शिवीगाळ करून मारहाण करू लागले,त्यांना उत्तर देताना सावरकर म्हणाले, “माझ्या भारत मातेला तुमच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी मी माझे घर खूप पूर्वी सोडले आहे. मी कधीच स्वतःची काळजी केली नाही, पण तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसोबत राहायचे असेल तर मला हात लावू नका. सावध व्हा! जर तुम्ही मला मारहाण केलीत तर लक्षात ठेवा, मी तुमच्यापैकी एकाला नक्कीच इजा करू शकतो.सावरकरांच्या उग्र शब्दांनी हैराण झालेल्या अधिकाऱ्यांनी नंतर मग शिवीगाळ करणे बंद केले.

 

आता सावरकरांची पळून जाण्याची योजना अयशस्वी झाल्यामुळे पुढे काय होणार?

 एक तर फाशी  किंवा किमान ‘आजीवन कारावास’ याची त्यांना स्पष्ट कल्पना होती. ‘आत्मबल’ या कवितेतून त्यांनी आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त केल्या आहेत.

 

सावरकरांच्या मार्सेलीस मधील घटनेचा राजकीय प्रभाव :

 

सावरकर इंग्रजांच्या तावडीतून पळून जाण्यात अयशस्वी झाले असले तरी या घटनेने भारत आणि ब्रिटनमध्ये मोठी खळबळ उडाली. या घटनेची बातमी जगभर पसरताच भारताचा स्वातंत्र्यलढा चर्चेत आला. यातून ब्रिटीशांनी भारतीयांवर केलेल्या अत्याचाराचे कठोर वास्तव समोर आले. ब्रिटीशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्यानंतर मार्सेलिस मध्ये सावरकरांनी केलेल्या महाकाय सुटकेची पहिली बातमी

 ' डेली मेल ' च्या पॅरिस आवृत्तीत ११ जुलै १९१० रोजी प्रकाशित झाली होती.

 

12 जुलै 1910 रोजी प्रकाशित झालेल्या पॅरिसमधील ‘ले मतीन’ या वृत्तपत्राला सावरकरांच्या काही सहकाऱ्यांनी या घटनेची सत्य बातमी दिली.

इतर अनेक फ्रेंच वृत्तपत्रांनी हे प्रकरण कव्हर केले आणि त्यांनी हे हायलाइट करण्यास सुरुवात केली की फ्रेंच भूमीवर एखाद्या व्यक्तीला इतर कोणत्याही देशाद्वारे अटक करणे बेकायदेशीर आहे.त्यामुळे फ्रेंच मानवाधिकार चळवळही पुढे आली. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रकरण नेण्याची मागणीने मग जोर धरला.

 

इंग्लंडमधील " हेराल्ड ऑफ रिव्हॉल्ट" या वृत्तपत्राचा तरुण संपादक  आल्ड्रेड याने सावरकरांच्या सुटकेसाठी मोहीम सुरू केली. त्यासाठी त्यांनी एक समिती स्थापन करून इंग्लंडमधील लोकांमध्ये मोठी जागृती केली. त्याचबरोबर स्पेन, पॅराग्वे आणि पोर्तुगाल या देशांनीही या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आणि सावरकरांना फ्रान्सकडे सोपवण्याची मागणी केली.

 

डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे सप्टेंबर 1910 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सावरकरांना फ्रान्सला परत पाठवण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

तोपर्यंत सावरकरांना येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले होते.

त्याने त्यांच्या सुटकेबद्दल तपशीलवार विधान केले आणि गुप्तपणे त्यांच्या सहकाऱ्यांना पाठवले. वेळ न घालवता त्यांचे विधान जगभरातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसारित झाले. जगभरातील अनेक वृत्तपत्रांनी बातम्या प्रकाशित करण्यास सुरुवात केली,

आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्यावरील लेख, सावरकर आणि त्यांचा स्वातंत्र्यलढाही प्रकाशित केला.

 

‘सावरकर’ हा सगळीकडे एक चर्चेचा विषय ठरला. भारत आता जागतिक व्यासपीठावर केंद्रबिंदू बनला होता . भारत आणि त्याच्या स्वातंत्र्यलढ्याने आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेतले. संपूर्ण प्रकरणाने स्वातंत्र्यलढ्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते.

अखेर ब्रिटनला त्यांच्यावर वाढवलेल्या आंतरराष्ट्रीय दबावाला बळी पडावे लागले आणि या मुद्द्यावर कारवाई करणे भाग पडले.

 

25 ऑक्टोबर 1910 रोजी ब्रिटन आणि फ्रान्स यांनी एका करारावर स्वाक्षरी केली आणि हे प्रकरण हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 या न्यायव्यवस्थेतील सदस्य राष्ट्रे अतिशय कमकुवत होती आणि त्यांच्यावर ब्रिटनचा दबाव होता. न्यायाधिकरणाला एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. तथापि, केवळ आठ दिवसांत त्यांनी ब्रिटनच्या बाजूने निकाल दिला.

 

ब्रिटनने आपल्या कारकिर्दीत लोकशाही आणि स्वातंत्र्याचा उदय झाल्याची फुशारकी मारली आणि दुसरीकडे सावरकर प्रकरणात ते सर्व पायदळी तुडवले.

 

या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने  दिलेल्या तथाकथित ‘न्याया ’वर जागतिक स्तरावर टीका झाली.

 

"एखाद्या व्यक्तीला परदेशात आश्रय घेण्याचा अधिकार आहे. " मॉर्निंग पोस्ट, डेली न्यूज (इंग्लंड) आणि पोस्ट (जर्मनी) या वृत्तपत्रांनी या प्रकरणात सावरकरांचे अधिकार नाकारण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली.

 

त्यावेळी, कामगारविरोधी धोरणासाठी कुप्रसिद्ध असलेले फ्रान्सचे पंतप्रधान अ‍ॅरिस्टाइड ब्रायंड यांनी पक्षपाती भूमिका घेऊन ब्रिटनला उघडपणे पाठिंबा दिला होता.

 

सावरकरांच्या सुटकेसाठी मोहीम चालवणाऱ्या आल्ड्रेडने आपल्या संपादकीयात म्हटले आहे की, पूर्वी फ्रेंचांचा विश्वासघात करणाऱ्या एका माणसामुळे (फ्रेंच पंतप्रधानांचा संदर्भ देऊन) सावरकरांनी आपले उर्वरित आयुष्य भारतातील एका अंधाऱ्या कोठडीत घालवणे दुर्दैवी आहे. ब्रायंड यांच्यावर घणाघाती टीका झाली.फ्रान्सचे सार्वभौमत्ववार पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झाले.

 

एका आघाडीच्या वृत्तपत्राने ब्रिटनला फटकारले. वृत्तपत्राने म्हटले की, इंग्लंडचे कुप्रसिद्ध साम्राज्य हे रक्तपात, क्रूर दडपशाही, पद्धतशीर अत्याचार आणि बळजबरी यावर आधारित आहे. हे संपादकीय त्यावेळी इतके गाजले की इतर काही वृत्तपत्रांनीही ते प्रसिद्ध केले. युनायटेड स्टेट्स, इटली, जर्मनी आणि फ्रान्समधील अनेक वृत्तपत्रांनी हेगमध्ये दिलेल्या निकालावर टीका केली.

 

जागतिक स्तरावर होत असलेल्या टीकेमुळे फ्रान्सचे पंतप्रधान इतके निराश झाले होते की, हेग न्यायाधिकरणाच्या निर्णयानंतर अवघ्या तीन दिवसांनी त्यांनी राजीनामा दिला.

 

सावरकरांची मार्सेलीसमधील धाडसी उडी इतकी खळबळजनक होती की, त्याने ब्रिटिश आणि फ्रेंच साम्राज्यांना हादरवून सोडले.

ब्रिटीशांनी याचा बदला  सावरकरांवर भारतात काढला,त्यांच्यावर खटला दाखल करून तो वेगवान करण्यात आला. खटल्याचा निकाल सर्वांनाच माहीत होता. एकच प्रश्न उरला होता की शिक्षा काय होईल?

 

निकाल लागला.....

 

 सावरकरांना अंदमानात ५० वर्षांची शिक्षा (दोन जन्मठेपेची )शिक्षा सुनवण्यात आली.

पहिली पंचवीस वर्ष यासाठी की ब्रिटिश सरकारच्या विरोधात असे कागद वाटले ज्या मध्ये हत्यारे बनवण्याची पद्धती लिहल्या होत्या आणि त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्या झाल्या होत्या. दुसरी पंचवीस वर्ष ही यासाठी की, कलेक्टर जॅक्सन याच्या हत्त्येसाठी आपल्या साथीदारांना भडकावलं. त्या वेळी त्यांची संपूर्ण संपती जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्यावर मुंबईत विशेष न्यायालय भरवले गेले होते ज्यात फक्त तीन जज होते आणि आरोपीला अपील करायचा अधिकार नव्हता.

 

 कुप्रसिद्ध, भयानक “काळे ​​पानी”.

इंग्रजांनी सावरकरांना एकाच जन्मात दोन जन्मठेपेची सर्वात मोठी शिक्षा सुनावली. ‘काळे पानी’ ही शिक्षा इतकी तीव्र होती की, पोलादाचा नसा असलेला माणूसही देखील थरथर कापायचा. अत्यंत अमानुष अंधारकोठडीत ५० वर्षे सेवा करण्यासाठी सावरकरांनी २७ जून १९११ रोजी बोटीवर पाय ठेवला.

आणि विनायक दामोदर सावरकर हे अंदमानकडे निघाले त्यावेळी त्यांचे वय अवघे २८ वर्ष होते...!!

 

 

- प्रकाश फासाटे..

(हया लेखामधील मूळ माहिती ही internate वर उपलब्ध करणाऱ्या लेखकांचे खूप धन्यवाद.)

 

(  शब्दांकन गूगल /विकीपीडिया, वेबसाईट वरून.)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू