पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जपून ठेवलेली आठवण

*जपुन ठेवलेली आठवण *


आज निवी (निवेदिता) छोट्या परीला घेउन परीवारासह आपल्या घरी पोहचली सुद्धा !
रावीने दोन दिवसात घर आवरून घेतले होते, आता दोघे ही आप -आपल्या रुटीनवर आले होते. आज रावी निवीशी फोन वरून झालेल्या संभाषणाचा विचार करून अजुन ही तिथेच बसून होती. लेण्डलाईन फोनच्या खुर्ची वर!

फोन कधीचा येउन गेला, तरी रावी अजुन ही तिथेच बसली आहे हे पाहून राजने तिला आवाज दिला, "काय? आता कोणाचा फोन अजुन यायचा आहे ,आता उठ तेथुन, परत ये आपल्या नेहमीच्या रुटीन वर !" ती काही रोपटे जे आपल्या जावाई बापूनी आणुन ठेवली आहेत न, ती अंगणात कुठे लावयची आहेत माळी विचारत होता, म्हणून उद्या रोपांची लागवण करुन घे तुझ्या मना सारखी ,चल ये न आत , तुझ्या अहिल्याबाई सिरियलची वेळ होत आली आहे... "

रावी आत आली पण टीवी ऑन केला नाही. "थोड बसा न इथे ,माझ्या मनाची फार विचित्र अवस्था होत आहे त्यामुळे मन फार बेचैन आहे..कशात ही लक्ष लागत नाहीए" तिच्या जवळ बसलो, "हं! मग सांग कश्या मुळे तुला असं वाटत आहे?"

रावी माझा हात धरून बसली आणि तिचे डोळे भरून आले. म्हणाली, "परीला खुपच लवकर घेउन गेलेत नं आताशी कुठे थोडी हसायला लागली होती ती, हात पण समजत होता हो तिला, निवीला झोप लागायची अणि परी उठली की मी तिला हातावर हालवायची तर ती झोपून जात होती , पहायलं नं तुम्ही? आपण निवीची झोप होऊ दे म्हणुन किती सांभाळून घेत होतो की नाही?"

मी मधेच तिला थांबवत म्हणालो, "तर तुला याचा त्रास होत आहे, अग रावी आपण परीच्या प्रत्येक हालचालींनां पाहुन निवीचीच तर लहान पणाची उजळणी करत होतो नं? त्याच आठवणी आपण परीच्या हालचालीत पहात होतो , मग त्यात काय, निवी येइल न परत भेटायला, नचिकेतने प्रॉमिस केले आहे आपल्याला. इथेच तर आहेत. हवे तर दोन दिवसांनन्तर आपण भेटून येऊ. "

"अहो तस नाही मला वाटतं आपली निवी आता आपल्याला विसरत आहे. बघा !"

"का कही झाले का तुम्हा दोघींन मधे !"

"नाही काही झाले नाही पण मला सगळं फ्लेशबेक होत आहे आपण निवीचे डोहाळजेवण किती छान केले नं , आणि मग परीचे बारसे पण थाटातच केले, नचिकेतने पण तेव्हा दोन दिवस रजा घेउन मला मदत केली ,मी केलेला सगळा बाळंतविडा त्यांनीच किती छान सजावट करून रचून ठेवला, विशेष म्हणजे त्यांनी मी जितक्या वस्तु माझ्या हातांनी करून ठेवल्या होत्या त्या अगदी समोरच दिसण्यास येतील असे नियोजित करुन ठेवले होते ,मालतीताई (निवीच्या सासूबाई)नां तर खुपच आवडलं ,आणि म्हणाल्या माझ्या साठी तर काही करायला शिल्लकच नाही ठेवले तुम्ही ,खुप छान जय्यत तैयारी केली बरं ! हे सगळ तुम्ही स्वतः केल हे खुप कौतुकास्पद आहे, अगदी विणकाम, भरतकाम, लोकरीचे पक्षी, तर फारच सुरेख केलेत.." इतके बोलुन रावी थांबली .

मी लगेच बोललो, "मग त्यांनी तुझे एवढे कौतूक केले, आणि ते सगळे अगदी प्रसन्न होऊन आनन्दाने आपल्या घरी सुखरुप पोहचले आहेत ,रोज विडिओ वर परी ची भेट आपण घेत असतो, मग तुला इतके बेचैन होण्याचे कारण ?"

"कारण असे आहे की आपण जी परी साठी अटैची आणली होती न ,ती मी व्यवस्थित भरली होती ,परीच्या एकुणएक सर्व बाळंतविडाचे सामान, कपडे, स्वेटर्स, तिची खेळणी , या शिवाय आपण निवीच्या लहान पणीच्या काही निवडक आठवणीच्या विविध वस्तु म्हणजे निवीचे पहिले झबले, टोपी,पिपंळपानाचे दुपटे , जरीची झूल, लहानसे गोकर्ण, सहाण, वाटी चमचा सुद्धा आठवणीनी ठेवले, पण हे लोक जेव्हा निघुन गेले त्या नंतर मी घर आवरले तेव्हा मला खुप वाईट वाटले कारण निवीने तिच्या लहानपणच्या सगळ्या लहान मोठ्या वस्तू , कपडे , खेळणी अटैचीतुन काढून परत ठेवून दिल्यात , फक्त परीचे सर्व नवीन वस्तु चांदीचे वाटीचमचा, कपडे स्वेटर्स, ते सगळे नेलेत बरोबर! ती गेल्यापासून माझे मन काही स्थीर रहात नव्हते म्हणून आज मी फोनवर तीला विचारले, तू हे सगळ सामान का नाही घेउन गेलीस? तूच तर कधी पासुन म्हणत होतीस न की माझ्या लहानपणच्या सगळ्या वस्तू मी माझ्या बाळासाठी बरोबर घेवुन जाणार , आणि मग परत का ठेउन गेलीस तुझ्या सर्व वस्तू ? परी साठी वापरायलाच बरोबर दिले होते न मग तू का सोडून गेलीस? तर ती काय म्हणाली माहीतए ! आई साॅरी मला दुखवायच नाहीए तुला पण या साऱ्या वस्तू आईंनी पण नवीन आणल्या आहेत आणि मला प्रत्येक वस्तू खुप उत्साहाने बाजारातुन घरी आल्यावर वाट्सएप वर दाखवायच्या गं!
तू दिलेल्या या सर्व वस्तू माझ्या साठी जीवापाड जपण्यासाठीच आहे आणि मला त्या हव्याच आहेत पण आई मला नचिकेतच्या आईंच्या प्रेमाचे , कौतुकाचे पण सांभाळ करायचे आहे न! कारण तूच मला रागवली होतीस ,आठव नं आपण इथे डोहाळजेवणाची तैयारी करत असतानां आईंनी आपल्याला ते एक छोटसं चांदीच गोकर्ण दाखवलं होत माझ्या फोन वर ,तेव्हा मी त्यांना म्हटले की आई अस तर आहे परी कडे ,परीला रोज त्यानेच तर घुटी देत असते आई. आठवले नं तेव्हां ,तू मला किती रागवली की त्यांची ही पहिलीच नात आहे , नचिकेत नन्तर आता कुठे इतक्या वर्षांनी लहान बाळ आलं आहे त्यांच्या घरी त्यांनी केलेल्या सगळ्या कौतुकाचे तुला तेवढेच महत्त्वाचे असायला हवे जितके तुला माझे महत्त्वाचे वाटतं, म्हणुन जेव्हा निघतांना मी परीच्या सर्व वस्तु ठेवल्या की नाही हे चेक करत असतांना मी त्या माझ्या सगळ्या आठवणी परत तुझ्या जवळ ठेउन आले आहे. आई माझ्या या सगळ्या आठवणी, आणखी काही वर्ष साभांळून ठेव नं प्लीज तुझ्या लाडक्या परीला हे प्रेम समजण्या इतकी मोठी तर होऊ दे ,मग बघ जेव्हा तू तिला माझ्या या सगळ्या आठवणी दाखवशील न ! तेव्हा ती स्वतःच तुझ्या कडून हक्कानी सगळ्या वस्तू मागून घेवून जाईल न! तेव्हां तुला आनन्दाश्रू येतील..हो न! मी या वस्तुंचे महत्व काय आहे याची जाणीव परी ला देईन , मी हे वचन देते अहो ती जे मला सांगत होती त्या वरुन मला आपल्या निवीचा खुप अभिमान वाटत आहे , फोन ठेवून ती तर आपल्या संसारात रमली आहे पण मला हे स्वतः ला का नाही जाणवले याचा मला खुप त्रास होत आहे"

मी रावीला उभे केले, हात धरुन बैठकीत आलो आणि सोप्यावर बसवले. आता रावी शांत होती, ये बसू आता इथे आपण अण बारशाचा सोहळा परत पाहुया आपण , आज दुपारीच ते कामत देउन गेले विडिओ मला. आम्ही दोघेही पुन्हा आमच्या निवी अणि तिच्या परीचे विडिओ पहात होतो, पण मी मधुनच पाॅज करुन आमच्या छोट्या निवीच्या बारशाच्या गोड आठवणींची उजळणी ही करत होतो.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू