बाप
#बाप
लई सकाळी बाप माझा
तालूक्याला गेला व्हता
गाडीमंदी चुंगड टाकून
माल बाजाराला नेला व्हता
छोट्या चिंगीला फराक अन्
मला नवं दप्तार घेणार व्हता
ठिगळ गाठीच माय च लुगड
तिला नवी नाटी आणणार व्हता
यापार्यान लिलाव केला
कवडी मोलाचा भाव आला
आता पैका नाही ,परवा देणार व्हता
गळालं आवसान पायातलं
#बाप हिरमुसला झाला व्हता
घरादाराच्या सपनांचा आज
लिलाव झाला व्हता
लिलाव झाला व्हता .....
अरविंद कुलकर्णी
पिंपरखेडकर