पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तशी येगं सरसर

*तशी येगं सरसर*


सरी बाई तुझी सय
येते बघ सरसर
तशी याविस वाटते
सदा तुही सरसर॥धृ॥


बालपण ची आठवे
एक झोक्याचीही सर
गेले बालपण तरी
नाही पडत विसर॥१॥


सय तिची येते पण
पुन्हा येईना ती सर
तिच्यापरी भावते ग
तूच पावसाची सर॥२॥


वाट पहायला पण
नको लावूस तू बरं
तरसली तुझ्यासाठी
बघ सांगते मी खरं॥३॥


तुझ्या विना कवितेला
माझ्या कुठला बहर
सृष्टी बहरता येतो
बघ तिला ही बहर॥४॥


जशी कविता येते ग
नित्य माझी सरसर
तशी येगं येगं सर
तुही पावसाची सर॥५॥


*-- निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
* शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड,एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
::::::::::::::::::::......○......::::::::::::::::::::

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू