पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जागतिक योगदिन

जागतिक योगदिन विशेष

जगातील एकमेव योग विद्यापीठ म्हणवणारे बिहार स्कूल ऑफ योग, मुंगेरचे प्रशिक्षक, प्रचारक श्री योगचित्तम सरस्वती ह्यांनी जे प्रशिक्षण दिले त्यानुसार आपणास काही माहिती देऊ इच्छितो.

  वर उल्लेखित संस्थेचे संस्थापक स्वामी सत्यानंद सरस्वती प्रमाणे "योग आजचा युगाची सर्वाधिक अमूल्य वस्तू ,अनिवार्य आवश्यकता आणि येणाऱ्या काळाची संस्कृती आहे।"

योग आमच्या व्यक्तिमत्वाच्या शारीरिक, प्राणिक, मानसिक,भावनात्मक, अध्यात्मिक, सर्व पैलूंना प्रभावित करतो. 

स्वामी योगचित्तम प्रमाणे योग अर्थात जोडणे,मिळवून घेणे. समरूपाने देवाजवळ रहाणे अर्थात योग. त्यांनी सांगितले की महर्षी पतंजली यांनी आपल्या योगसूत्रात योगची एक निश्चित, एकीकृत, आणि व्यापक परिभाषा देऊन योगविधेला एक संहितेचे स्वरूप दिले असून त्याला *अष्टांगयोग* म्हणतात।

 ह्या मध्ये-

यम

नियम

आसन

प्राणायाम

प्रत्याहार

धारणा

ध्यान

समाधी

असतात

ह्या पैकी पहिले 7 सामान्य माणसासाठी आणि 8 वा प्रकार संत महात्मा यांच्या साठी असतो. 

   योग कितीतरी रोगांना दूर करण्याचे साधन आहे,पण त्यात नियमितपणा गरजेचा आहे। मग योग म्हणजे जादू किंवा चमत्कार पण नाही की आसन, प्राणायाम करताच व्याधी उडन-छू... 

   बहुतेक सर्व योग विषयक साहित्यात आवर्जून लिहिले आहे की टीव्ही, रेडिओ, आणि पुस्तक वाचून योग न करता योग्य आणि उत्तम प्रशिक्षित व्यक्तीचा निर्देशनात योग करावा. 

   योग साठी काही आवश्यक निर्देश असे आहे-

*1.श्वास/प्रश्वास* -श्वास नेहमी नाकाने घ्यावा. आसन विवरणानुसार श्वासाला आसनाशी जोडावे. 

*2.सजगता* - शारीरिक हरकती, आसन अवस्था, श्वास नियंत्रण, शरीरात होणारी संवेदना, ह्या कडे सावध लक्ष आवश्यक आहे. 

*3.शिथिलीकरण*- आसनचा अभ्यास करताना थकवा वाटल्यास शवासन करावे. 

*4.वेळ*- योग करण्यासाठी योग्य वेळ अर्थात ब्रह्म मुहूर्त (सूर्योदयाच्या 2 तास अगोदर)

*5.स्थान*- हवादार जागा किंवा बगिच्यात करावे. जो पर्यंत असह्य गर्मी नसेल, विजेच्या पंख्याखाली करू नये. 

*6.परिधान* - हलके ,आरामदायी वस्त्र धारण करावे।(फिट ड्रेस टाळावा)

*7.स्नान*- शक्यतोवर गार पाण्याने स्नान करून योग करावा. 

*8.पोटाची अवस्था* - योग रिकाम्या पोटी करावे. 

*9 वार्म अप* - योग करण्या पूर्वी सूक्ष्म व्यायाम (warm up) करावे. 

   शास्त्रात तर 84 लक्ष योगासनाचा उल्लेख आहे,पण आज येथे पवन मुक्तासन विषयी माहिती बघू. 

    शरीरात तीन प्रकारचे आवश्यक दोष असतात- *कफ,वात आणि पित्त*. ह्याचा शरीरात प्रमाणही निश्चित असतो. तिघांपैकी एकाचेही प्रमाण गडबडले की माणूस आजारी पडतो. 

 सर्वात आधी आपण 

*पवन मुक्तासन भाग-1* बघू. 

हे आसन कमरेचा खालच्या भागाचे असतात. वात रोग,अर्थराईटीस, उच्च रक्तदाब, हृदय विकारात हे आसन गुणकारी आहे. 

*1.पादांगुलीनमन*-

    दोन्हीं पाय ,स्पायनल कॉड,सरळ ठेवून,दृष्टी सरळ,डोळे बंद करून दोन्हीं पायाचा बोटांना अगोदर समोर(श्वास सोडतांना) आणि मग आपल्या बाजूला(श्वास घेऊन) करायचे। (8-8वेळा)

*2.गुल्फ नमन* -

    बैठक स्थिती पूर्ववत. टाचेच्या वरचा पाय बाहेर(श्वास सोडून)आणि आत (श्वास घेवून) करावा. 

*3.गुल्फ चक्र-*

     टाचेला स्थिर आधार करून,पूर्ण पाऊल डावीकडे, समोर (श्वास सोडून) उजवीकडे ,मागे चेहऱ्याकडे (श्वास घेऊन) क्लॉकवाइज आणि एंटी क्लॉकवाइज, 6-6 वेळा करावे. 

*4.जान्हूनमन -*

     जान्हू अर्थात गुड़घा. हे आसन केल्यास गुडघ्याचे दुखणे नाहीसे होते. गुडघ्याच्या पेशी (मसल्स) अतिशय कमजोर असतात. त्यामुळे चाळीशी उलटली की सामान्यपणे गुडघेदुखी सुरू होते. 

    दोन्हीं पाय सरळ, दोन्हीं हाथांचे बोट आपसांत संबद्ध करून गुडघा आणि माण्डिचा मधे धरायचे. त्या नंतर श्वास घेऊन ,जमीनी वरुन अंदाजे 3-4 इंच वर करुन आपल्या छातीशी लावावे. 

 (श्वास सोडून) असे 8 वेळा करावे. 

 

*5.जान्हूचक्र-*

    प्रथम दोन्हीं पाय सरळ ठेवून,नंतर एक पाय छातीशी लावावा. पायाचा खालून हाथ घालून दोन्हीं हातांनी विपरीत कोपरे धरावे. नंतर फक्त गुडघ्यांना क्लॉकवाइज आणि एंटी क्लॉकवाइज करायचे. 

*6.अर्ध तितली आसन (HBF)-*

    अगोदर दोन्हीं पाय सरळ करून,मग एक पाय गुडघ्या पासून मोडून मांडी वर ठेवावा. आता एका हातानी खालून पायाचा पंजा धरून, दुसऱ्या हातानी मोडलेल्या पायाचा गुढघा दाबून वर खाली चालना द्यावी

 

*7.पूर्ण तितली आसन (FBF)-*

     दोन्हीं पाय सरळ ठेवून ,गुढघ्यापासून मोडावे. दोन्हीं तळपाय जोडून शक्य होईल तो पर्यंत शरीराकडे आणावे. दोन्हीं हातांनी पंजे धरून 30-40 वेळा गुढघे वर खाली करावे. 

*नोट - सायटिका आणि कंबरदुखणाऱ्या माणसांनी वरील आसन करू नये*

 

*पवन मुक्तासन भाग-2*

(वरील आसनाचा उच्च रक्तदाब, आर्थरायटीस,चर्मविकार, जोडदुखी,मध्ये लाभ मिळतो)

   सर्वप्रथम वज्रासनात बसावे. 

 शरीरात 72000 नाड्या असतात. त्यातूनही 4 अर्थात ईडा, पिंगला, सुषुम्ना आणि वज्रनाडी प्रमुख असतात. 

  वज्रनाडीचा पोट आणि पाचन क्रियेशी सरळ संबंध असतो. जेवणानंतर 8-10 मिनिटं वज्रासन मधे बसल्याने गॅस,अपचन, कब्जविकार होत नाही. 

   नाभी खालील भागाला *पेल्विक एरिया* म्हणतात. वज्रासनने ह्या भागाचा मसल्स मजबूत होतात. पाठदुखी, स्लीपडिस्क, स्पॉंडीलायटीस, सायटिका,

पाईल्सचा त्रास होत नाही।

  *वज्रासन*

 

  गुढग्यांचा आधारावर उभे राहून, दोन्हीं पायांचे अंगठे जोडून टाचांना *V* आकारात पसरवावे आणि त्यावर बसावे।

*1.मुष्टिकाबंधन -*

    वज्रासन मधे दोन्हीं हाथ जमीनीचा समांतर सरळ ठेवावे. अंगठा आत दाबून मुठ्ठी खोला आणि बंद करा (8-8 वेळा)

*2.मणीबंधनम (Wrist Bending)-*

    दोन्हीं हाथ सरळ,त्यानंतर श्वास घेतांना बोटांचे टोकं आकाशा कडे,आणि शेवटी श्वास सोडतांना बोटांचे टोकं जमीनी कडे. 

*3.मणीबंध चक्रम (Wrist Rotation)-*

    बैठक पूर्ववत अर्थात वज्रासनात, मुठ्ठी बांधून फक्त मनगट क्लॉकवाइज आणि एंटीक्लॉकवाइज फिरवावे. 

*4.कुहनी नमन (Elbo Bending)-*

   दोन्हीं हाथ सरळ ,जमिनीचा समांतर ,तळहात आकाशा कडे,नंतर हाथांचे कोपर वळवून बोटांनी आपल्या खांद्याला स्पर्श करावा. आणि त्या वेळेस कोपर आकाशा कडे असावे. 

(हे आसन केल्याने पाठदुखी, स्पॉंडीलायटीस मध्ये लाभ होतो)

*5.स्कंध चक्र -*

   खांद्यावर बोटांचा स्पर्श करून दोन्हीं कोपर जोडावे, कानाला स्पर्श करतांना कोपर(elbo) आकाशा कडे करून डावी -उजवी कडे करून पूर्ववत स्थिती वर आणावे. असे 6-6 वेळा क्लॉकवाइज आणि एंटीक्लॉकवाइज करावे।

   हे आसन करण्याने पाठदुखी, स्पॉंडीलायटीस,खांधेदुखी मध्ये फायदा होतो)

योग करा आणि स्वस्थ राहा

दीपक कर्पे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू