पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वादळ गतस्मृतिन्चे

*वादळ गतस्मृतींचे*

*****************

आठविते ते सारे आता

स्मृतींचीही कमाल आहे

गात्रे जरी झाली मलुल

मन , मात्र उत्साही आहे


अनुभवलेले जीवन सारे

जपुन पाऊले टाकित आहे

काय मिळाले अन हरविले

आता विसरून गेलो आहे


घडायाचे ते ते घडूनी गेले

अजूनी काय घडणार आहे

अंतरात वादळ गतस्मृतींचे

आज मात्र घोंगावते आहे


ललाटीच्या त्या रेषा साऱ्या

संचिताचे भगवंती दान आहे

आता व्हावे केवळ अंतर्मुख

विरक्तित खरा आनंद आहे


*रचना क्र.१४२ / २६ - ५ - २०२२*

*©️ वि.ग.सातपुते. ( भावकवी )*

*???? ( 9766544908 )*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू