पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रिये चहा

आज जागतिक चहा दिवस आहे।
आज आमचा चहा प्या।

जन्मभर चव विसरणार नाही याची गॅरंटी ! 


प्रिये चहा .....
चाल - प्रिये पहा ( नाट्यगीत )
----------------------------------
प्रिये चहा , प्रिये चहा
देना मज गरम गरम
स्फूर्तिदायी जो महा ।।

थंडी किती पडली बघ नं
लिप्टनचा कडक पिऊन
आळस हा जाइ निघुन
शक्ती अंगी ये पहा ।। प्रिये चहा..

कपबशी किण किण करत
वाफा वरवरच उडत
मरगळ ही पळुन जात
तरतरी ये मग अहा ।। प्रिये चहा...

सुस्तिस झणी पळवुनिया
नेतो हा शीण लया
किती गाऊ महिमा म्या
करित सर्व वाहा वाहा ।।प्रिये चहा..

विडंबनकार -- कवी अनिल शेंडे।

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू