पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एकांताच्या गुढ किनारी.

*एकांताच्या गुढ किनारी*

*********************

एकांताच्या गुढ किनारी

वादळ आठवांचे घोंगावते


आयुष्य सारे सारे हिशोबी

अलवार अंतरात उलगड़ते


क्षणाक्षणांचे स्मृतीकारंजे

भारूनी नभांगणा सजविते


नीरव , नि:शब्दी  नीरवता

मन , मनान्तराला सावरीते


सृष्टिचे रूप सुंदर मनोहारी

लोचनातुनी अविरत तरळते


लडिवाळ , लहर प्रीतरंगली

शब्दागंधल्या गीतास गुंफिते


एकांताच्या या गुढ किनारी

मुग्धगीत मनांतरा भुलविते

**********************

*रचना क्र. १४४ / २८ - ५ - २०२२*

*©️ वि.ग.सातपुते. ( भावकवी )*

*???? ( 9766544908 )*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू