पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रंग रंग पांडुरंगी रंग

नमस्कार,

मराठी नाटय़ सृष्टी मध्ये सोनेरी समजला जाणारा काळ म्हणजे संगीत नाटकांचे युग!
'अवघा रंग एकची झाला' या नाटकातील 'रंग रंग पांडुरंगी रंग' हे अप्रतिम गाणे मला खूप आवडते. अगदी प्रत्येक पिढीने ऐकावे असे हे
श्रवणीय किर्तन जुनेजाणते गायक
प्रसाद सावकारांनी आणि अमोल बावडेकर ह्यांनी गायले आहे.

या गाण्याची आठवण म्हणजे लग्नाआधी माझ्या मिस्टरानी हे नाटक या गाण्यामुळे
31 वेळा बघितले! व लग्नानंतर मी संगीतनाटक पहिल्यांदा बघितले. यातील सर्वच गाणी इतकी आवडली की नंतर आम्ही परत हे नाटक नातलग आणि मित्र परिवाराला घेऊन तब्बल 6 वेळा बघितले. त्यातीलच हे एक उत्तम गीत.

संगीत सर्वत्र जगभर सारखेच असले, सात सुरांमध्ये गुंफलेले असले तरी
प्रत्येक संगीताचा साज, नाद, लय, ठेका वेगवेगळा असतो. म्हणूनच भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यातील कोणते संगीत सरस आणि श्रेष्ठ आहे ह्या विषयावरचा वडील आणि मुलगा यांच्यातील म्हणजेच 2 पिढ्यांचा तात्विक वाद हा या नाटकाचा विषय आहे. त्यामुळे पारंपरिक किर्तन जर पाश्चात्य चालीत म्हटले तरी ते तितकेच सुरेल व भक्तिभावपूर्ण असू शकते हे सिद्ध करण्यासाठी या किर्तनाला नवीन चाल दिली आहे.

रंग रंग पांडुरंगी रंग रंग
पांडुरंगी रंग रंग पांडुरंगी रंग

दुजा रे गोविंद
मुरारी मुकुंद!
मुरारी मुकुंद
कृष्ण हरी!

पंढरीसी आलो
तुझ्या रंगी ठेलो!
अंतरंगी न्हालो
भीमातीरी!

साध्या सोप्या शब्दांत लिहिलेल्या ह्या ओळी
ऐकत असताना अगदी सहजपणे
पंढरीचा विठोबा डोळ्यासमोर येतो. देवाच्या आठवणीने डोळ्याच्या कडा ओलावतात आणि मन देवाशी संवाद साधु लागते, "हे देवा, ह्या व्यवहारी जगात मी कितीही गुरफटले तरी मी माझ्या विठोबाला विसरले नाही, तुझ्या दर्शनाची ओढ कणमात्रही कमी झाली नाही. आता तुच तुझ्या दर्शनाचा योग घडवून आण." हे किर्तन ऐकले किंवा म्हटले तरी आपल्या भावना देवापर्यंत नक्की पोहोचत असतील असा विश्वास वाटतो.

प्रज्ञा मनिष पंडित
ठाणे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू