पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आता काहीच नकोसे वाटते.

*आता काहीच नकोसे वाटते*

*************************

आज सारे समजुनी चुकले

आता काहीच नकोसे वाटते

सुखदुःख ओसंडुनी वाहिले

आता काहीच नकोसे वाटते..


जगणे सहजी जगुनी जाहले

भोग भोगणेही संपले वाटते

अर्थ , जगण्याचाही कळला

आता मात्र थांबावेसे वाटते


आकाशाला घातली गवसणी

मनीचे सारे सारे घडले वाटते

ऋणानुबंध ओळखुनी चुकलो

आज कुठे गुंतू नये असे वाटते


क्षणाक्षणाचाही झाला निचरा 

आज काळ किती उरला वाटते

आता कशाला हव्यास करावा

तसे सारे जगणे मृगजळ वाटते


निरवतेत , स्वांतसुखाय जगावे

तोच एक परमानंद असे वाटते

जन्म , एक भ्रमंती गतजन्मांची

दयाघनाने मुक्त करावेसे वाटते

*************************

*रचना  क्र. १४५ / २ - ६ - २०२२*

*©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*

*???? ( 9766544908 )*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू