पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लेख

होली के दिन दिल मिल जाते है


शोले सिनेमातील हे गाणे लहानपणापासून मी ऐकत आले आहे. या सिनेमाचे संवाद, वेशभूषा, कथानक, नृत्य, संगीत सगळच काही मनाला भुरळ घालणारे आहे. जय आणि वीरूची जोडी कोणीही विसरू शकत नाही. गब्बरसिंग, बसंती हे कायमस्वरूपी पात्र लक्षात राहतात. होली के दिन दिल मिल जाते है हे गाणे लागले की त्यामधील आनंद पाहून मला देखील खूप आनंद व्हायचा, हा सिनेमा आम्ही संपुर्ण कुटुंब मिळून पाहायचो. माझा चेहरा हेमामालिनीसारखा आहे. असे मला चिडवायचे. लग्नानंतर देखील मिस्टरांसोबत हा सिनेमा बघितला. त्यांना देखील हा सिनेमा आवडतो. विशेषत: त्यामधील एक संवाद बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना हा संवाद त्यांना खूप आवडतो. वडीलांना देखील हा सिनेमा आवडत असे. वडील नेहमी म्हणायचे, आनंद हा आपल्या मनात असते. आनंद आपण व्यक्त केला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद असतो. परिस्थिती कशीही येऊ द्या मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण हा त्यांचा विचार ते सतत बोलून दाखवत. माणसाने आनंदी राहिले पाहिजे. तरच तो आपल्या जीवनात यशस्वी ठरतो. 

वडीलांचे ते वाक्य मी लक्षात ठेवले. वडील वारले त्या दिवशी दुपारी आम्ही शोले सिनेमा पुन्हा एकदा बघितला, जय आणि वीरूची गोष्ट, वडील म्हणाले, वीरू शेवटी सोडून जातो, एकाच्या सुखासाठी दुसऱ्याला जीवाचा त्याग करावा लागतो. शेवटी त्यांची दोस्ती तुटत नाही. मैत्री भावना या संपुर्ण चराचर सृष्टीत सामावलेली आहे. कोणीही या भावनेला पराजय करू शकत आहे. माणूस अस्तित्वात नसला तरी मैत्री भावना कायम स्वरूपी लक्षात राहते. आपल्या आजूबाजूला मैत्रीतरंग कायम फिरत असतात. हे सत्य आहे. हे जग सुंदर आहे. आनंदी आहे. आपण आपल्या विचारांमुळे कुरूप बनू नये. मागील वर्षी रंगपंचमीला वडीलांनी सर्वांना पाण्याने भिजविले होते‌. ती आठवण कायम स्मरणात आहे. मैत्रीभावना म्हणजे निर्मळ प्रेम हे शाश्वत सत्य स्वरूप जगण्याचे आहे. हे वास्तव दर्शन या गाण्याने घडविले. हिरे की कणी है तू मिट्टी से बनी है तू हे या गाण्यातील शब्द प्रेक्षकांना मंत्रमुग्ध तल्लीन करतात. संपुर्ण गाण्यात प्रेक्षक हरवून जातो. एवढी ताकद या गाण्याची आहे. शेवटी आपण आयुष्यात आनंदी रहावे हाच संदेश हे गीत देऊन जाते.

आज वडील अस्तित्वात नाहीत. तरी देखील त्यांच्यासोबत घालविलेले क्षण लाख मोलाचे आहेत. कारण ते क्षण पुन्हा आयुष्यात येऊ शकत नाही. मात्र त्यांनी दिलेली शिकवण जेव्हा जेव्हा सिनेमा आम्ही बघतो तेव्हा तेव्हा आठवणीत येते. आम्ही कृतार्थ होतो कारण त्यांनी कधीही मुलगा मुलगी असा भेद न करता सर्वांना समान वागणूक दिली. प्रत्येकाला समजून घेतले. सतत पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. या देखील जीवनाचा एक सकारात्मक रंग आहे. असे वाटते. पाण्यासारखे निर्मळ माणसाने असावे. हे सत्य आहे‌.

होळी आली की या आठवणी आपसुकच मनात घर करतात.


प्रज्ञा हंसराज बागुल

कसारा ठाणे

8080453480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू