पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दारू : वाईट व्यसन

दारू सेवन :

शारीरिक आणि मानसिक हानी करणारे व्यसन...

काल रस्त्यावर दारूच्या नशेत सुन्न पडलेला व्यक्ती पाहून खूप वाईट वाटले आणि कीवही आली.

नशेत चूर झालेल्या त्या व्यक्तीचे शरीर मल मुत्राने माखले होते. अंगावर  घोगांवणाऱ्या माश्या आणि वास घेणारी कुत्रे पाहून त्या माणसाची दया आली.

केवळ व्यसनापायी मनुष्य आपल्या देहाची किती वाईट अवस्था करतो हे डोळ्यांनी बघितले.ज्यांची पैशात किंमत मोजू शकत नाही अशी अवयवे मनुष्य दारूने निकामी करतो.दारू पिणाऱ्या माणसांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की बाजारात जाऊन बघा की रक्त शुद्ध करणारे अवयव मिळते का? हवा शुद्ध करणारा अवयव मिळतो का.?

मेंदू सारखा सुपर कॉम्पुटर कोठे मिळतो का? यकृता सारखा अवयव कोठे मिळतो का? इतके मौल्यवान अवयव फुकट मिळाली असतांना आपण आपल्याच हाताने त्याची वाट लावतो हे किती दुर्भाग्य आहे.


कोणत्याही व्यक्तीने मजा म्हणून घेतलेला दारूचा एक पेग त्याचे व्यसन केव्हा बनते हे त्यालाही कळत नाही.

दारूचे व्यसन लागण्याची खूप काही कारण असतात परंतु मुख्य कारण असत ते म्हणजे आपली संगत !!

आपण कोणत्या मित्रा बरोबर राहतो, कोणत्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपल्या सोबत काम करणारी माणसे व त्याच्याशी येणारा संपर्क हा आपल्याला व्यसन करण्यास भाग पडतो.मग कधी कोणाची मर्जी राखावी म्हणून तर कधी ' नाही ' म्हणू शकत नाही म्हणून.

शेवटी काय तर व्यसन लागायचं ते लागतच. दारू पिणारी व्यक्ती खरतरं इतरांना फसविण्याचा पेक्षा  स्वतःलाच जास्त फसवत असते. ही व्यक्ती आपल्याला लागलेल्या व्यसनाची  स्वतः पाठराखण करते.आपल्याला लागलेल्या  व्यसनाचे समर्थन करते आणि त्यासाठी ती वेगवेगळी कारणे सुद्धा सांगते,जसे की मला रोज पिण्याची सवय नाही मी मागील दहा वर्षापासून पीत आहे परंतु अजूनही मला व्यसन लागलेले नाही किंवा इतर कोणाचे उदाहरण देऊन आज पर्यंत त्याला काहीही झालेले नाही तर मला काय होईल? किंवा मी  फक्त लग्न कार्याला घेतो  किंवा पार्टीमध्ये घेतो आणि तस दारू ही कधीकधी शरीराला आवश्‍यक असते वैगेरे वगैरे..

 जेव्हा आपण दारू पितो तेव्हा आपल्या शरीरात नेमके काय होतं  हे समजावून घेणे खूप महत्वाचे आहे. जो कोणी हे समजेल तो त्याच क्षणी व्यसन बंद करेल आणि ते म्हणजे आपण स्वतः आपल्या हाताने शरीराचे नुकसान करून घेणे आहे.

जसे पेटलेला विस्तव हातात घेतल्यावर जसे आपलाच हात भाजतो तसे !!

दारुमुळे शरीराची जी मुख्य अवयव आहेत तीच निकामी होतात ती म्हणजे मेंदू , यकृत, मूत्रपिंड ,जठर,

ही अवयवे कामातून गेली की मनुष्य जगू शकत नाही.


जेव्हा आपण दारू पितो तेव्हा ती आपल्या मुखाद्वारे सरळ जठरात जाते. एकूण दारू पैकी 20 % दारू जठरातून शोषली जाते आणि  जर जठर रिकामे असेल तर याचे प्रमाण जास्त ही होऊ शकते. ही शोषलेली दारू सरळ आपल्या शरीरातील रक्तामध्ये मिसळते आणि रक्तामार्फत संपूर्ण शरीरात पसरते तिथुनच ती दारू आपल्या  intestine मध्ये पोहोचते. दारू मध्ये अल्कोहोल चे प्रमाण जास्त असते.अल्कोहोल हे शरीरास अतिशय घातक आहे तेच अल्कोहोल संपूर्ण शरीरात रक्ताद्वारे फिरून लिव्हर पर्यंत पोहोचते.अल्कोहोल मुळे तयार झालेले acetaldehyde लिव्हरला सूज आणते. लिव्हर हा आपल्या शरीरातील असा भाग आहे जो एकदा खराब झाला की कायमचा खराब होतो. त्याला दुसरा पर्याय नाही. लिव्हर सि्रोसिस हा गंभीर आजार होतो. तरीही आपण अल्कोहोल घेत राहिलात तर शरीरात फॅट्टी ऍसिड बनायला सुरवात होते. फॅट्टी ऍसिड आपण काही प्रमाणात शरीरात सहन करू शकतो पण फॅट्टी लिव्हर म्हणजे लिव्हर ला सूज येणे किंवा त्याचा आकार वाढणे म्हणजे मृत्यूकडे वाटचाल !!

अल्कोहोल असलेले रक्त हृदयाकडे येते व तेथून संपूर्ण शरीरात पाठवले जाते. हृदयामार्फत जे अल्कोहोल आहे ते लंग मध्ये जाते आणि जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो त्या वेळी आपल्या श्वासामधून तो अल्कोहोल चा वास आपल्याला यायला लागतो आणि हेच कारण आहे की दारू पिलेल्या व्यक्ती बरोबर बोलतांना दारूचा वास येतो.


जेव्हा अल्कोहोल मिश्रित रक्त आपल्या मेंदू पर्यंत पोहचते आणि आपल्या मेंदूच्या कामाला बिघडवून टाकते तेव्हा आपल्या मेंदूचा ताबा सुटतो, मेंदूवरचे नियंत्रण सुटते.मेंदू योग्य पद्धतीने काम करू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या शरीराचा तोल सांभाळू शकत नाही त्याच प्रमाणे बोलतांना उच्चार स्पष्ट येत नाही आणि आपण काय बोलतोय हे कळत नाही.


अति दारूचा सर्वात पहिला परिणाम होतो तो हृदयावर. यामुळे तुम्हाला उच्च रक्तदाब आणि हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा धोका निर्माण होतो. तसंच अति दारू पित असल्यास, हृदयविकाराचा झटका लवकर येण्याची शक्यता असते. हे त्रास होत असताना उच्च रक्तदाब असल्यास, जाणवत नाही आणि त्यामुळे पटकन जीव जाण्याचाही धोका अधिक असतो. त्यामुळे दारूचे नियमित सेवन करत असल्यास, तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला हवे अन्यथा लहान वयात तुम्ही तुमचा जीव गमावू शकता. दारू पिण्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. 


मूत्रपिंड होते निकामी :(Kidney Problem)


हृदयानंतर सर्वात जास्त परिणाम होतो तो यकृतावर. आपण बरेचदा ऐकतो की, किडनी फेल झाली आणि माणसाचा मृत्यू ओढवला. दारूमुळे सर्वात जास्त परिणाम किडनी अर्थात मूत्रपिंडावर होत असतो. जास्त दारू प्यायल्याने जास्त मूत्र निर्माण होते आणि त्यामुळे मूत्रपिंडावर जास्त दबाव पडतो आणि सतत दारूचे सेवन केल्यास, मूत्रपिंड त्याचा भार झेलू शकत नाही आणि काही काळानंतर त्याचा दबाव अति पडून मूत्रपिंड निकामी होते. काम करणे बंद झाल्यामुळे साहजिकच मृत्यू ओढावला जातो. दारू पिण्याचे दुष्परिणाम होण्यात याचा सर्वात मोठा वाटा आहे. 

किडनीवर होणारा परिणाम :

किडनी हा आपल्या शरीराचा खूप महत्वाचा अवयव आहे.हिची कल्पना सुपर कॉम्पुटर शी केलेली योग्य ठरेल. कारण किडनीची रचना खूप अनोखी आहे आणि तिचे कार्य खूप गुंतागुंतीचे आहे.

किडनी शरीरातील रक्त साफ करून मुत्राची निर्मिती करते. शरीरातून मूत्र बाहेर टाकण्याचे काम मूत्रवाहिनी, मुत्राशय व मूत्रनलिका यांच्या द्वारे केले जाते. पुरुष आणि स्त्री दोघांच्याही किडन्याची रचना व स्थान सारखेच असते.


यकृतावरही होतो परिणाम (Liver Problem)

दारूचा यकृतावर प्रत्यक्ष अर्थात डायरेक्ट परिणाम होत असतो. कारण दारू सर्वात पहिल्यांदा पोहचते ती यकृत अर्थात लिव्हरपर्यंत. कारण अल्कोहोलचे अर्थात दारूचे 90% विघटन हे लिव्हरमध्ये अर्थात यकृतामध्ये होत असते. त्यामुळे तुम्ही जितके अधिक दारूचे सेवन करत तितका भार यकृतावर येऊन यकृत पटकन निकामी होऊ शकते. तुमच्या यकृताला दारूमुळे पटकन हानी पोहचू शकते आणि त्यामुळे त्याचा त्वरीत दुष्परिणाम यकृतावर झालेला दिसतो आणि त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. 


रक्तामध्ये साखर कमी होणे: (Pancreas Problem)

रक्तामध्ये नेहमी विशिष्ट प्रमाणात साखरेचे प्रमाण असणे महत्त्वाचे आहे. पण जास्त दारूचे सेवन केल्यास, त्याचा परिणाम शरीरातील रक्तामध्ये साखरेचे प्रमाण कमी होण्यात होतो. ज्याला हायपोग्लाईसेमिया असं म्हटलं जातं. याचा अग्नाशयावर परिणाम हतो आणि साखर कमी झाल्याने तुम्हाला थरथरणे आणि बेशुद्ध पडण्यासारखी समस्या निर्माण होते. इतकंच नाही रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास, मेंदूवरही परिणाम होऊन तुमची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दारूचे अति सेवन करणे हे घातक ठरते.


sex life problem:

सतत दारू प्यायलाने ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि त्याचा प्रभाव सेक्स लाईफवर होतो. यामुळे मुलांमध्ये वीर्य उत्सर्जन (sperm) लगेच होते आणि अशावेळी गर्भधारणा लवकर होण्याची भीती राहते. तर महिलांच्या बाबतीत अति दारू प्यायल्याने सेक्स न करण्याची इच्छा अधिक बळावते. तसंच तुम्ही दारू प्यायल्याने अशा नशेत असता की, सेक्सचा आनंद घेऊच शकत नाही. तुम्हाला नक्की आपलं शरीर आणि मेंदू काय काम करत आहे याचं ताळमेळ राहात नाही. दारू पिण्याचे दुष्परिणाम फारच वाईट सिद्ध होतात. 

दारू प्यायल्याने आपल्या शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होत असतो. काही परिणाम हे त्वरीत होतात तर काही परिणाम हळूहळू होत जातात आणि ते कायमस्वरूपी आपलं शरीर निकामी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. हे परिणाम आपल्या नकळत घडत जातात आणि कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. असे नक्की शरीराच्या कोणत्या भागावर दारू पिण्याचे दुष्परिणाम होतात ते आपण जाणून घेऊया.


प्रतिकारशक्तीसाठी हानिकारक: (Harmful To Immune System)


दारू प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती प्रणाली बिघडते. प्रतिकारशक्ती हे आपल्या शरीराचे सुरक्षा कवच आहे. जे आपल्याला बाहेरील व्हायरस, बॅक्टेरिया या सर्वांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचे असते. पण अत्याधिक दारू सेवनामुळे प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो आणि प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे कोणत्याही रोगाशी लढण्याची क्षमता कमी होते आणि अधिकाधिक रोग शरीराशी जोडले जातात. तसंच त्यातून पटकन बरे होता येत नाही कारण त्या रोगांशी लढण्यासाठी तुमच्यामध्ये प्रतिकारशक्ती शिल्लकच नसते. त्यामुळे त्याचा पटकन परिणाम शरीरावर होतो. 


मानसिक आरोग्य बिघडते :(Mental Health Problem)


दारूचे नित्यनियमित सेवन हे मेंदूवर परिणाम करते. तुमची विचारशक्ती कमी करण्याचे आणि दारूच्या नशेमुळे तुमची स्मरणशक्तीदेखील कमी होते. तुम्ही सतत नशेच्या अंमलाखाली राहून सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता आणि नैराश्याने ग्रासले जाता ज्याचा डायरेक्ट परिणाम हा मेंदूवर होतो. मानसिक आरोग्य बिघडण्यासाठी याचा खूप मोठा हात आहे. नैराश्यामध्ये जाण्यासाठी याचा सर्वात जास्त वाटा असतो तसंच तुमच्यासह मानसिक असंतुलनामुळे काहीही घडण्याची शक्यता असते. कारण दारूच्या नशेच्या अंमलाखाली तुम्ही नक्की कसे वागत आहात याची सारासार विचार करण्याची शक्ती तुमच्यामध्ये राहात नाही.


हाडे आणि मांसपेशीवरही होतो परिणाम : (Harmful To Bones & Muscles)


दारूचे अधिक सेवन केल्यास, कॅल्शियम निर्माण आणि हाडांद्वारे त्याचे अवशोषण होण्याची क्षमता अधिक प्रमाणात होते, ज्याला ऑस्टियोपोरोसिस असे म्हटले जाते. जर गर्भवती महिलांना दारूचे सेवन अधिक केले तर त्यांचे होणारे मूल हे अपंग होण्याची  शक्यता असते. त्यामुळे गर्भवती महिलांना सक्तीने दारू न पिण्याचे सांगण्यात येते. पण आपल्या शरीरातील हाडे ठिसूळ करण्याचे काम दारू करते. त्यामुळे तुम्हाला कुठेही शरीराला लागल्यानंतर ती जखम पटकन बरी होणं शक्य नसते. 


आतड्यावर होतो परिणाम :  (Intestine Problem)


आतड्यांवर दारूचा परिणाम होऊन विटामिन आणि अन्य पोषक तत्वाचे शोषण यामुळे होऊ शकते. अर्थात शरीराला विटामिन पुरविण्यासाठी दारू बाधा निर्माण करते. यामुळे कुषोषण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आतड्यांवर परिणाम होऊन तुमचे शरीर अधिक बारीक होते आणि तुम्ही सुदृढ न राहता हळूहळू तुमची तब्बेत खालावली जाते आणि त्याचा अधिक वाईट परिणाम शरीर अधिक कुपोषित होऊन नष्ट होण्यामध्ये होतो. 


मेंदू आणि मज्जासंस्थेवर होतो परिणाम : (Harmful To Brain & Nervous System)


अधिक दारूसेवनामुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊन माणूस नैराश्याने घेरला जातो आणि त्यामुळे त्याच्या स्मृतींंवरही परिणाम होऊन काही जण वेडेही होतात. यामुळे वेड्याचे झटके येणे आणि मानसिक संतुलन बिघडणे असेही घडलेले दिसून येते. त्यामुळे दारूचे अतिसेवन हे अत्यंत घातक ठरते. कारण एकदा मेंदूवर परिणाम झाला की, संपूर्ण शरीरावर त्याचा दुष्परिणाम होऊ लागतो आणि त्याचा आपल्यासह अन्य आजूबाजूच्या माणसांनाही तितकाच त्रास होतो. परिणाम झालेल्या माणसाला होणारा त्रास हा समोरच्या व्यक्तीला पाहता येणंही शक्य नसतं आणि सहन करणंही शक्य नसतं. अशामुळे आपल्या नात्यांवरही परिणाम होतो हेदेखील तितकेच महत्त्वाचे. 


 दारूची सवय सोडवता येते का?

हो नक्की सोडवता येते त्या साठी लागते इच्छा शक्ती!!

इच्छाशक्ती किती असावी लागते काही मोजमाप आहे का? हो आहे, जर आपले संपूर्ण डोके मानेसकट पाण्यात बुडवले तर ज्या इच्छा शक्तीने तुम्ही ते पाण्याच्या बाहेर काढता ना अगदी तितकी इच्छा लागते मग हे व्यसन सुटू शकते.

तुम्हाला दुसरं कोणी मदत करणार नाही.तुम्हीच तुमची मदत करू शकता.

 दारू पिणाऱ्या माणसाने मनात आणलं तरी ही सवय हळूहळू सोडवता येते. तुम्ही स्वतः ही सवय कमी करू शकता. नाहीतर तुम्हाला आपल्या जवळच्या माणसांची अथवा नशामुक्ती केंद्राची मदत घेऊनही ही सवय सोडवता येते. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेऊनही ही सवय कमी करू शकता. 


©®प्रकाश फासाटे.

मोरोक्को

212661913052

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू