पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जिंदगी एक सफर है सुहाना

 

चित्रपट अंदाज राजेश खन्ना हेमा मालिनी

आवाज -किशोर कुमार

गाणे -जिंदगी एक सफर है सुहाना 

      यहां कल क्या हो किसने जाना।

      हंसते गाते यहाँ से गुजर

      दुनिया की तू परवाना कर

      मुस्कुराते हुए दिन बिताना

      यहां कल क्या हो किसने जाना।

       मौत आनी है आएगी इक दिन

       जान जानी है जाएगी इक दिन

      ऐसी बातों से क्यां घबराना  

       यहां कल क्या हो किसने जाना।

 जीवनाचे दर्शन घडवणारे हे गाणे.मला खूप आवडते.जीवनात प्रत्येक गोष्टीत आनंद कसा घ्यावा याच मार्गदर्शन आहे.सततचा ताण मनुष्याला दुःखी करत आणि त्यामुळे तो आजारी पडतो.त्यापेक्षा हसत सर्व परिस्थितीला

सामोर जाणच योग्य आहे .समोर आलेला प्रत्येक क्षण आनंदाने जगा.आपल्या हातात काहीच नाही. जन्म -मृत्यू हे जीवनचक्र आहे.या जगात जो येतो तो जातोच.त्याची चिंता करू नये.आपल्या मनाला योग्य वाटेल ते कराव ,तस रहावं कोण काय म्हणेल याची पर्वा न करण्यातच सुख आहे त्यापेक्षा आनंदाने जगा आणि आनंद पसरवा.आपल व्यक्तिमत्व दूस-यांना हवस वाटेल असच पाहिजे. जीवन हे खूप सुंदर आहे त्याचा उपभोग घ्या .कधीतरी आपण मरू या चिंतेत आपल आयुष्य घालवू नका.बेफिकीर होऊन जगा.जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य एक दिवस जाणारच.त्याला घाबरून चालणार नाही.

        यावरून मला एक प्रसंग आठवला.आमचे एक मित्र होते.त्यांना कँसर झाला होता.आपले आयुष्य १ वर्षापेक्षा जास्त नाही हे त्यांना माहित होतं .तरी प्रत्येक वेळा आम्ही भेटलो की ते कधीच आपल्या रोगाची चर्चा करायचे नाही. कधी चेह-यावर वेदना दिसायच्या नाही.नेहमी सकारात्मक गोष्टींवर भर असायचा.त्याला कारण त्यांचा स्वभाव. नोकरीत, संसारात जे समोर आल ते नेहमी हसूनच साजरं करायचा त्यांचा स्वभाव होता.शांत चित्त,हसरा चेहरा 

हे त्यांच वैशिष्ट्य .आम्ही नेहमी पिकनिक, बाहेरगावी फिरायला बरोबर जायचो.कधी बाहेर हॉटेल किंवा जेवण मनासारखे नाही मिळाले तर आमची चिडचिड व्हायची .पण ते अगदी शांतपणे समजवायचे ,"अरे उसमें क्या चलता है

कभी अच्छा कभी बुरा अपना मूड खराब नहीं

करना चाहिए" .देवही पहा अशाच लोकांची

परिक्षा घेतो.त्यांना कँसर झाल्याचे कळले तेव्हां आम्ही खूप निराश झालो होतो.परंतु जेव्हा त्यांना व त्यांच्या बायकोला भेटलो तेव्हा कळल की दोघांनीही ते आनंदाने स्वीकारले आहे.दोघांनी आपलं दुःख चेह-यावर दर्शवल नाही. शेवटी शेवटी तर त्या वहिनी मला म्हणाल्या , "आम्ही आतापर्यंत जे जीवन जगलो ते देवाच्या कृपेने चांगलच जगलो .मग देवाने सर्व सुखांबरोबर दुःख ही दिल तर ते भोगलच पाहिजे .हसून भोगा वा रडून आणि मीच जर ह्यांच्यासमोर रडत राहिले तर त्यांची हिंमत खचेल.जीवनातील सर्व कर्तव्य संपली आहेत.मुलं आपापल्या संसारात सुखी आहे.आणखी काय पाहिजे. जास्त लळालोंबा न होता पटकन निघून गेलेलच चांगल.त्यांना जास्त यातना न व्हाव्या येवढीच प्रार्थना मी देवाला करते."त्यांच बोलण ऐकून आम्हांला पण हिंमत आली.कटूसत्य असल तरी यथार्थ जीवनदर्शन होतं.त्यांच्या जायच्या एक महिना पहिले आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो.त्यांनी मला दोन गोष्टींचे अनुवाद दाखवले.एक गोष्ट त्यांनी स्वतः या आजारपणात लिहीलेली दाखवली.आणि हसून मला म्हणाले."लेखिका बाई यांवर आपला अभिप्राय लिहून द्या.आणि चूका असल्यास सांगा बर."मी कथा वाचल्या आणि त्यांना आवडल्या म्हणूनही सांगितले. अभिप्राय वाचून दाखवला.तसे त्यांच्या चेह-यावर हसू आले.एक महिन्याने ते गेले.त्यांच्या चेह-यावर वेदनेचा लवलेशही नव्हता.त्यांचा हसतमुख चेहरा, त्यांचे

बेफिकीर जगणे आजही मला त्या गाण्याची आठवण करून देते.

              सौ.ऐश्वर्या डगांवकर.

                इंदूर. मध्यप्रदेश.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू