पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विवंचना.

*विवंचना*

*********

जन्म जरी हा सुखात जगला

तरीही कुठेतरी विवंचना आहे


अंतरंगातही नेहमीच उलघाल

कळेचनां , काय शोधतो आहे


मन अगदी वेडेच , वेडे अतृप्त

आजही लालसेत गुंतले आहे


सारी भौतीक सुखाचीच आंस

सात्विक विचारांचे दुर्भिक्ष आहे


जगण्याचेच अर्थ इथे वेगवेगळे

अविचारी मनमानी रुजली आहे


बीज स्वार्थाचे सर्वत्र इथे रुजलेले

प्रीतवात्सल्य भावनां संपली आहे


अंती कधीतरी जागतो अंतरात्मा

कळते इथे सारेच क्षणभंगुर आहे

**************************

*रचना क्र. १४६ / ३ - ६ - २०२२*

*©️ वि.ग.सातपुते ( भावकवी )*

*???? ( 9766544908 )*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू