पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सहज सुचलं म्हणून.......


मोरमुकुटधारी


 श्रीराम जय राम जयजय राम


पितृवचन पूर्ण करणासाठी श्रीराम14 वर्षे वनवासाला निघाले.  जणू त्यांचीच छाया असल्याप्रमाणे लक्ष्मण आणि पतिव्रतेचा धर्म पाळण्यासाठी मैथिली पण त्यांच्या सवे वनवासाला निघालेत.

राजघराण्यात जन्माला आलेले हे विष्णुरुप असले तरी मानव रुपात होते. त्यामुळे सर्वसामान्य मानवासारखेच आलेल्या नैसर्गिक संकटांना पार करत  सुकोमल जानकी, हळव्या मनाचा परी शीघ्रकोपी लक्ष्मणा सवे मजल दरमजल करीत रानावनात भेटलेल्या विभूतींचे दर्शन घेत खडतर प्रवास सुरू होता.

चालतांना  वनात पायात काटे टोचतच होते, कधी राघवाच्या तर कधी जानकीच्या. लक्ष्मण मात्र कशाचीच दखल न घेता फक्त राम सीतेची सेवा करीत मार्ग आक्रमित होता.

पण वनात याचे सवे बरेच प्राणिमात्र होते. विविध पक्षी सुमुधुर गायन करून यांना रिझविण्याचे प्रयत्न करीत तर कधी एखादा क्रूर श्वापदा सोबत दोन हात करावे लागत.

वनातच पक्षांचा राजा मयूर पण होता.त्याला ही रामराजाची सेवा करावी असे वाटत होते. पण कशी?

तेव्हा मयुरास युक्ती सुचली आणि मयूर रामराया समोर उभा राहिला.

"हे रामराजा, तू असा रानावनात चालतो आहेस,सवे जानकी माता आहे, आपल्या या सुकोमल पायात या वनात काटे टोचत आहे. पाय रक्तबंबाळ होत आहे, तेव्हा हे राघवा माझी विनंती आहे की आपल्या वाटेवर माझी मऊ पिसे अंथरतो आपण त्यावरून चालावे म्हणजे आपल्या पायात काटे टोचनार नाहीत."

आणि मयूर स्वतः ची पिसे काढून प्रभू रामचंद्रांच्या वाटेवर अंथरत गेला आणि त्यावरून श्रीराम चालत  मार्ग क्रमण करते झाले.

मोराच्या या सेवेमुळे प्रसन्न होऊन श्रीरामानी त्याला वर दिला, "माझ्या पुढच्या अवतारात मी हे मोरपीस माझ्या मुकुटावर धारण करेल आणि मला मोरमुकुटधारी म्हणून ओळखल्या जाईल.

म्हणून श्रीकृष्णाच्या मुकुटावर मोरपीस आले अशी आख्यायिका आहे.

मनापासून केलेली सेवा त्याचे चरणी रुजू होतेच असं मला वाटतं.....


रसिका राजीव हिंगे


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू