पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रानफूल

रानफुल


सुवर्णचंपक काननी फुलता

परिमल त्याचा दरवळतो,

अंगणी माझ्या तो फुलावा

ध्यास किती हा मज छळतो।


काननी अवघ्या शोधुनी दमले

परि ना घावे,मज ना ठावे

स्थान दिव्य ते असे कुठे?

गंधाने मन होई खुळे

हृद्स्पंदे ती ताल ही धरती

आठवणी त्या तुझ्यासवे।


प्रीत तुजवरी अपार जडली

रानफुला तु असशी कुठे?

तुझ्याविना हे जीवन अवघे

व्यतित करु मी कसे कुठे?



©️ डाॅ.श्रीकांत औटी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू